"नांदेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
काही सुधारित माहिती जोडली
छोNo edit summary
ओळ १३०: ओळ १३०:


===हवाई===
===हवाई===
नांदेड हे हवाई मार्गाने [[दिल्ली]], [[मुंबई]], [[हैदराबाद]], [[अमृतसर]] आणि [[तिरुपती]] या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी [[गो एअर]], [[स्पाईस जेट]] आणि [[एअर इंडिया]] या कंपन्यांच्या विमानांनी नान्देडला जाता येते.
नांदेड हे हवाई मार्गाने [[दिल्ली]], [[मुंबई]], [[हैदराबाद]], [[अमृतसर]] आणि [[तिरुपती]] या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी ट्रुजेट आणि [[एअर इंडिया]] या कंपन्यांच्या विमानांनी नान्देडला जाता येते.


===स्थानिक वाहतूक===
===स्थानिक वाहतूक===

१५:०१, २७ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

  ?नांदेड

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: नांदेड - वाघाळा
—  शहर  —
[[चित्र:
नांदेड येथील गुरूद्वारा
सचखंड गुरूद्वारा
|235px|none|]]
Map

१९° ०९′ ००″ N, ७७° २०′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६३.२२ चौ. किमी
• ३६२ मी
अंतर
लातूर पासून
परभणी पासून
यवतमाळ पासून

• १३५ किमी नैर्ऋत्‍य दिशा (रत्नागिरी - नागपूर महामार्ग)
• ७० किमी पश्चिम दिशा (नांदेड - परभणी महामार्ग)
• १९२ किमी ईशान्य दिशा (नांदेड - नागपूर महामार्ग)
जवळचे शहर अर्धापूरमुदखेड लोहा
प्रांत मराठवाडा
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] औरंगाबाद
जिल्हा नांदेड जिल्हा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
५,५०,४३९ ([[List of most populous cities in India|२ रा मराठवाडामध्ये आणि ८० वा भारतामध्ये]]) ([[इ.स. २०११|२०११]])
• ८,७००/किमी
९४२ /
६५ %
भाषा मराठी
महापौर सौ.मोहिनी विजय येवनकर
आयुक्त सुनील लहाने
आमदार  • बालाजीराव कल्याणकर(ना. उ.)
 • मोहनराव हंबर्डे (ना. द.)
विधानसभा (जागा) महाराष्ट्र विधानसभा (६)
संसदीय मतदारसंघ नांदेड
तहसील नांदेड तालुका
महानगरपालिका नांदेड-वाघाळा महानगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१६०१
• +०२४६२
• MH - 26
संकेतस्थळ: आणि www.nanded.nic.in

नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.[१]

नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब (पहा हुजूर साहिब नांदेड) आहे. काही वर्षांपूर्वी २००८ येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरूग्रंथास धर्मगुरुचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पण्डित आणि वामन पण्डित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यीक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णुपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह १६ तालुके आहेत त्यांची नावे पुढीप्रमाणेनाव = मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोलीयवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.

वाहतूक व्यवस्था

पारंपारिक वाहतूक

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मण्डळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.

रेल्वे

हुजूर साहेब नान्देड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे आणि दिल्ली,मुम्बई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, बंगळूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नान्देडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.

हवाई

नांदेड हे हवाई मार्गाने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अमृतसर आणि तिरुपती या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी ट्रुजेट आणि एअर इंडिया या कंपन्यांच्या विमानांनी नान्देडला जाता येते.

स्थानिक वाहतूक

स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नान्देडमध्ये आहेत.

संस्कृती

या शहरात प्रामुख्याने हिंदू,मुस्लिम आणि महत्वाची म्हणजे शीख धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू संस्कृती अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरु गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरूद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे.

भाषा

नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी भाषा आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक तेलुगू, कन्नडदखनी उर्दू भाषेत सुद्धा बोलतात. गोरमाटी भाषा अनेक वस्ती, तांड्यावर बोलली जाते.

परंपरा

माळेगावची जत्रा,सोनखेड येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह, हिन्दूशीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे अत्यन्त छान असतात. रावण दहन, दीपावली, सन्दल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, शिवजयन्ती,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयन्ती, बुद्ध पौर्णिमा, गणेश उत्सव हे दिवसही उत्साहाने साजरे होतात.

माध्यमे

स्थानिक वृत्तपत्रे

नान्देड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -

  • दैनिक गोदातीर समाचार
  • दैनिक प्रजावाणी
  • दैनिक भूमिपुत्र
  • दैनिक लोकपत्र
  • दै.उद्याचा मराठवाडा
  • दैनिक सत्यप्रभा

इलेक्ट्रॉनिक मीडिया

उद्याचा मराठवाडा, गोदातीर समाचार, प्रजावाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ ही मराठी वृत्तपत्रे आणि इण्डियन एक्सप्रेसटाइम्स ऑफ इण्डिया या इंग्रजी वृत्तपत्रांचा नान्देडमध्ये अधिक खप आहे.[ संदर्भ हवा ]. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे. नान्देडमध्ये आकाशवाणी, रेडियो सिटी ही रेडियो केन्द्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आयबी एन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत[ संदर्भ हवा ]. अनेक हिन्दी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था अन्तरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्‌एन्‌एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कम्पन्या आहेत[ संदर्भ हवा ].

शैक्षणिक

नान्देड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नान्देडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे.

विद्यापीठ

इ.स. १९९४ साली नान्देड विद्यापीठाची (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.व तसेच यशवन्तराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे विभागिय केन्द्र नान्देड येथे आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालये

वैद्यकीय महाविद्यालये

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
  • श्यामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालय

पारंपारिक महाविद्यालये

सैनिकी प्रशिक्षण संस्था

  • राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी ता. बिलोली येथे आहे. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी या सैनिकी शाळेसाठी आयुष्य वेचले.

प्राथमिक शिक्षण संस्था

  • केंब्रिज विद्यालय
  • प्रतिभा निकेतन
  • पीपल्स हायस्कूल
  • म. फुले विद्यालय
  • शाहू विद्यालय

राजकारण

नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहीत असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे चालवत आहेत. त्यांनी मुख्यमत्र्यांच्या दोन कालावधीत हे पद ग्रहण केले आहे. महाराष्ट्रातील पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे.

भाग

अबचलनगर

शिवाजीनगर

श्रीनगर

चौफाळा

चैतन्य नगर

विष्णुनगर

भाग्यनगर

राहुलनगर

राहुल नगर महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका वसलेले नगरचा भाग आहे. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शेवटचे टोक महानगर पालिका अंतर्गत नगराचा विकास झाला आहे राहुल नगर च्या बाजूला नांदेड मधील M.I.D.C एरिया असुन लोकचा मुख्यता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नगराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार १४०० आहे. एकूण लोकसंख्या १४०० स्त्रिया ७३० पुरुष ५२० 0ते6 वयोगटातील लोकसंख्या १५० लिंग गुणोत्तर १०००/९४२ 0ते6 वयोगटातील लिंग गुणोत्तर १०००/९२३ शैक्षणिक साक्षरता ६५% राहुल नगर मधे सांची स्तूप येथील बुद्ध विहारा सारखी रचना केली बौद्धविहार प्रसिद्ध आहे.विहारातील बुद्धमूर्ती येथून थायलॅंड येतून आणली आहे.राहुलनगरास नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयातील पाण्याचा पुरवठा केला जातो. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राची पावर हाउस राहुल नगर येथे आहे. राहुल नगर हे नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील निसर्गरम्य वातावरणात डोंगर भागात वसलेले वस्तीस्थान आहे राहुलनगर पिनकोड 431603 तीन महानगरपालिका अंतर्गत करण्यात आली आहे येथील महिलावर्ग एमआयडीसी मध्ये कामाला जातात तर पुरुष मंडळी वाहन चालक आहेत राहुल नगर मध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून मोठ्या खदानी निर्माण केले आहेत भावनगर मध्ये ग्रामपंचायत नसून महानगरपालिका आहे त्या अंतर्गत चार नगरसेवक पासून नगर बौद्ध चळवळीची ठिकाण म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी .

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "भाग दोन नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास". १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.