"माहूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
done some edits
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
done some edits
ओळ ७८: ओळ ७८:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.


'''माहूर''' हे [[देवीची साडेतीन पीठे|देवीच्या साडेतीन पीठांपैकी]] एक असून येथील पीठाची देवता [[रेणुकादेवी]] आहे. रेणुकादेवी तसेच [[दत्तात्रेय]] आणि [[परशुराम]] यांचीदेखील प्राचीन मंदिरे [[माहूर|माहूरगडावर]] आहेत. येथे मंदिरासमोरच एक [[दुर्ग|किल्ला]] आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.
'''माहूर''' हे [[देवीची साडेतीन पीठे|देवीच्या साडेतीन पीठांपैकी]] एक असून येथील पीठाची देवता [[रेणुकादेवी]] आहे. रेणुकादेवी तसेच [[दत्तात्रेय]] आणि [[परशुराम]] यांचीदेखील प्राचीन मंदिरे [[माहूर|माहूरगडावर]] आहेत. येथे मंदिरासमोरच एक रामगड (माहूर) [[दुर्ग|किल्ला]] आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.






१७:३५, १६ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

  ?माहूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका

चौकट  —

महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१९° ५०′ ५२″ N, ७७° ५५′ २६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर किनवट
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील माहूर तालुका
पंचायत समिती माहूर तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१७२१
• +०२४६२
• MH26


माहूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक रामगड (माहूर) किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.


प्रेक्षणीय स्थळ प्रभु रामचंद्राचे निवासस्थान पांचाळेष्वर मौजे वानोळा पासून तीन किलोमीटर अंतरावर स्व़ देवीसिंह बदु चव्हाण लाविडया संस्थापक श्री राम मंदिर संस्थान.

भौगोलिक स्थान

माहूर येथील रेणुकादेवीचा मुखवटा - सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते।
मंदिराचे आतील दृष्य
माहूर येथे मंदिरासमोर असलेल्या माहूरगड किल्ल्याचा एक बुरूज

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.

श्रीक्षेत्र माहूर हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.

दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-

एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.!! तसेच कालांतराने माहूर ला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आई चे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे "माहूर " असे संबोधले जाऊ लागले ,

कसे जायचे

  • नांदेडपर्यंत - नांदेड हे लोहमार्गानुसार दक्षिण मध्य रेल्वे वर येते. मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते.
  • माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्‌‍टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे.
  • माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
  • नागपूर ते माहूर हे अंतर (वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे २२० किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.

राहण्याची व्यवस्था

==माहूरगड==

रेणुकादेवी मंदिर

दत्तात्रेय मंदिर

पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.

माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.

माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X १२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.

या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.

परशुराम मंदिर

वस्तुसंग्रहालय

गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे. त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.

हेसुद्धा पहा

प्रेक्षणीय स्थळ प्रभु रामचंद्राचे निवासस्थान पांचाळेष्वर मौजे वानोळा पासुन तीन किलो मीटर अंतरावर स्व़ देवीसिंह बदु चव्हाण लाविडया संस्थापक श्री राम मंदिर संस्थान

नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका