"घुमर नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
# WPWP घुमर नृत्य छायाचित्र जोडले
ओळ १: ओळ १:
[[File:Ghhoommar.jpg|thumb|घुमर नृत्य]]
'''घुमर''' हे [[राजस्थान|राजस्थानातील]] एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://nroer.gov.in/5645d28d81fccb60f166681d/file/5877090e472d4a7bf5360292|title=NROER - File - घूमर नृत्य राजस्थान|website=nroer.gov.in|access-date=2020-06-05}}</ref>घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.

१६:३५, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती

घुमर नृत्य

घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. [१]घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.

नृत्य पद्धती

गोलाकार उभे राहून वेगवेगळ्या प्रकारे गिरक्या घेत हे नृत्य केले जाते. खाली वाकून टाळ्या वाजवून तर कधी टिचक्या वाजवत केले जाणारे हे नृत्य अतिशय लोभसवाणे आहे. दोन दोन स्त्रियांच्या समोरासमोर जोड्या करून लांब जाऊन परत जवळ येत तर कधी स्वतःभोवती चक्कर घेत हे नृत्य केले जाते. गाणे जसे पुढे सरकते तशी गाण्याची लयही हळूहळू वाढत जाते. गोलाकार नाचत असताना अतिशय सुंदरतेने एकमेकांमधील अंतर समान राखत हे नृत्य केले जाते. कधी कधी हातात टिपऱ्या किंवा लाकडी तलवारी घेण्याची प्रथा सुद्धा आहे. क्वचित प्रसंगी स्त्रिया व पुरुष मिळून हे नृत्य सादर केले जाते.

वेशभूषा

घागरा हे या नृत्यातील प्रमुख आकर्षण असते. घागरा-चोळी किंवा चनिया- चोळी आणि ओढणी अशी वेशभूषा केली जाते. हे घागरे रंगीबेरंगी असतात व त्यावर आरसेकाम केलेले आढळते. विविध प्रकारचे चकचकीत दागिने व बांगड्या परिधान केल्या जातात.

वाद्ये

ढोलक, मंजिरा, झालर, एकतारा वगैरे वाद्यांचा वापर या नृत्यात केला जातो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "NROER - File - घूमर नृत्य राजस्थान". nroer.gov.in. 2020-06-05 रोजी पाहिले.