"सहस्रकुंड धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
done some edits
done some edits
ओळ १: ओळ १:
'''सहस्रकुंड धबधबा ''' हा [[नांदेड|यवतमाळ]] जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्यांपैकी एक धबधबा आहे.
'''सहस्रकुंड धबधबा ''' हा [[नांदेड|n]] जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्यांपैकी एक धबधबा आहे.


==ठिकाण==
==ठिकाण==

१६:३५, २६ जुलै २०२१ ची आवृत्ती

सहस्रकुंड धबधबा हा n जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्यांपैकी एक धबधबा आहे.

ठिकाण

यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे १२५ कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ’इस्लापूर पाटी’पासून ५ कि..मी., तर किनवटपासून सुमारे ५० कि.मी .अंतरावर आहे.[१]

माहिती

नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. नदीच्या अलीकडील पात्रात कोसळणार्‍या धारेचा हा सर्वांत मोठा धबधबा आहे. मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणार्‍या पैनगंगा नदीवरील हा धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. अंदाजे ३०-४० फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रोद्र रूप धारण करतो ते ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो. .हा धबधबा अगदी १५-२० फुटावरून पाहता येतो . खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे असले तरी थोडी काळजी घेतली तर खडकावरवर बसून पाण्याचे तुषार झेलत अंग ओलेचिंब झालेलेसुद्धा कळत नांही. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र ४ -५ अप्रतिम धबधबे पहावयास मिळतात. त्या बाजूला जाण्यासाठी उमरखेड -किनवट मार्गावरील बिटरगावहून आत जावे लागते. धबधब्याजवळ छोटासा बगीचा असला तरी पर्यटकांसाठी आवशक सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे अतिशय नयनरम्य, नितांत सुंदर परिसर लाभूनही हा धबधबा दुर्लक्षित राहिला आहे.

इतर पर्यटन स्थळे

दोन दिवसांची सवड काढली तर येथून जवळच असलेल्या माहूर येथील रेणुका मातेचे दर्शन, दत्त शिखर, अनसूया मातेचे मंदिर आणि परिसरातील हिरवाईने नटलेल्या डोंगर-दर्‍यापण पाहता येतील. सहस्रकुड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. बागेत विविध रंगाची फुलपाखरे पर्यटकांची मने मोहून टाकीत आहेत. धबधब्याजवळ असलेल्या पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे.

संदर्भ

  1. ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/sahastrakund-waterfall-overflow-1265764/