"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
स्थानांतरण
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८९: ओळ १८९:
* [[सावरकरांच्या कविता]]
* [[सावरकरांच्या कविता]]
-->
-->
<!--
=== सावरकर साहित्य ===
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, [[निबंधकार]], जीवनदर्शन घडविणारा [[नाटककार]], राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, [[ग्रंथकार]], [[इतिहासकार]], [[भाषाशास्त्रज्ञ]] ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ चा उठाव]] हे बंड नसून हा एक स्वातंत्र्यसंग्राम होता.<ref name=":0" />

सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा [[फटका]]. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.

सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला [[अमिताभ बच्चन]] यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, [[स्वप्नील बांदोडकर]], [[शंकर महादेवन]], [[सुरेश वाडकर]], [[साधना सरगम]] आणि [[वैशाली सामंत]] यांनी गायल्या आहेत.
-->

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या [[साहित्य संमेलने|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.{{संदर्भ हवा}}
:
:



१७:१३, ६ मे २०२१ ची आवृत्ती

स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर

सावरकरांचे छायाचित्र
जन्म: २८ मे १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६
दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज[ संदर्भ हवा ], जोसेफ मॅझिनी
प्रभावित: अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळ ठाकरे, राज ठाकरे, शेषराव मोरे
वडील: दामोदर विनायक सावरकर
आई: राधाबाई दामोदर सावरकर [१]
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर (माई)[२]
अपत्ये: प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास


विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धीलिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.[३][४]

चरित्र

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.[५] त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला.[६] सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.[७]

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.[८] इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.[९]

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय.[१०] हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०).[११] ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.[१२] पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले.[१३] हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.[१४] ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

सावरकरांचे जात्युच्छेदन

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१५]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.[१६] स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.[ संदर्भ हवा ] जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले.[१७] या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.[१८] सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.[१९]

गाय हा एक उपयुक्त पशू

‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.

एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल.[२०] पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

सात बेड्या

सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.[ संदर्भ हवा ]

जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.[२१]

हिंदू महासभेचे कार्य

रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.[ संदर्भ हवा ]

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.[ संदर्भ हवा ]

सावरकरांची खोली आणि स्मारके

  • पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
  • सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
  • पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
  • गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)[ संदर्भ हवा ]

संस्था

सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

  • नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
  • वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
  • वीर सावरकर मित्र मंडळ ()
  • वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
  • समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
  • सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
  • सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
  • स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.[ संदर्भ हवा ]

मृत्युपत्र

‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.[ संदर्भ हवा ]...

ग्रंथ आणि पुस्तके

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते",[२२] "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.[२३][२४]

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

  1. अखंड सावधान असावे
  2. १८५७ चे स्वातंत्र्यसमर
  3. अंदमानच्या अंधेरीतून
  4. अंधश्रद्धा भाग १
  5. अंधश्रद्धा भाग २
  6. संगीत उत्तरक्रिया
  7. संगीत उ:शाप
  8. ऐतिहासिक निवेदने
  9. काळे पाणी
  10. क्रांतिघोष
  11. गरमा गरम चिवडा
  12. गांधी आणि गोंधळ
  13. जात्युच्छेदक निबंध
  14. जोसेफ मॅझिनी
  15. तेजस्वी तारे
  16. नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
  17. प्राचीन अर्वाचीन महिला
  18. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  19. भाषा शुद्धी
  20. महाकाव्य कमला
  21. महाकाव्य गोमांतक
  22. माझी जन्मठेप
  23. माझ्या आठवणी - नाशिक
  24. माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
  25. माझ्या आठवणी - भगूर
  26. मोपल्यांचे बंड
  27. रणशिंग
  28. लंडनची बातमीपत्रे
  29. विविध भाषणे
  30. विविध लेख
  31. विज्ञाननिष्ठ निबंध
  32. शत्रूच्या शिबिरात
  33. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
  34. सावरकरांची पत्रे
  35. सावरकरांच्या कविता
  36. स्फुट लेख
  37. हिंदुत्व
  38. हिंदुत्वाचे पंचप्राण
  39. हिंदुपदपादशाही
  40. हिंदुराष्ट्र दर्शन
  41. क्ष - किरणें


इतिहासविषयावरील पुस्तके

कथा

कादंबऱ्या


सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]

चाफेकरांचा फटका

१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा०

  • ’निनाद’तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
  • दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
  • वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
  • टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार[ संदर्भ हवा ]

सावरकरांवर लिहिलेली पुस्तके

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:

  • अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
  • अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
  • अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
  • ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
  • आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
  • आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
  • उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
  • उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
  • ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
  • करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
  • करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
  • करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
  • --?--१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
  • कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
  • कानिटकर, सचिन. माझे सावरकर
  • किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
  • कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
  • कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
  • केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
  • खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
  • गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
  • --?--१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
  • गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
  • गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
  • गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
  • घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
  • चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
  • जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
  • जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
  • जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • --?--१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • --?--१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
  • दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
  • देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
  • देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
  • देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
  • नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)[२५]
  • परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
  • पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
  • फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
  • बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
  • बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
  • बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
  • भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
  • भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
  • भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
  • भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
  • भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
  • --?-- (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
  • भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
  • मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
  • मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
  • मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
  • मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
  • मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
  • रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
  • रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
  • वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
  • वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
  • वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
  • --?--१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
  • शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
  • शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
  • साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
  • साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
  • सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.
  • सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • --?--१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • --?--१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • --?--१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
  • --?--१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • --?--(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
  • सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
  • सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
  • सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
  • सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
  • हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
  • क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
  • श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
  • --?--१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
  • --?--१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
  • १९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
  • १९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • १९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
  • १९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
  • १९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
  • सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)

सावरकरांवरील मृत्युलेख

सावरकरांच्या निधनानंतर "दैनिक मराठा" मधे आचार्य अत्रे यांनी सावरकर यांच्या कारकीर्दीबद्दल अणि कार्याबद्दल चौदा लेख लिहिले होते.[ संदर्भ हवा ]

सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम

  • अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
  • मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
  • यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
  • व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)

मराठी पारिभाषिक शब्दांसाठीचे सावरकरांचे योगदान

भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.[२६]

अधिक वाचन

  • ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
  • शोध सावरकरांचा - य.दि. फडके
  • क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
  • सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
  • सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
  • रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
  • हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
  • सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
  • सावरकर चरित्र - धनंजय कीर
  • सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
  • सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
  • दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
  • गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Arya, Rakesh Kumar (2016-12-16). Gandhi & Savarkar: गांधी और सावरकर (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5261-670-1.
  2. ^ Goyal, Shiv Kumar. Kranti Kari Savarkar (हिंदी भाषेत). Subodh Pocket Books. ISBN 978-81-87961-18-5.
  3. ^ हिंदी विश्वकोश (हिंदी भाषेत). नागरीप्रचारिणी सभा. 1960.
  4. ^ "It's time to revisit facets of Savarkar's life and work which can guide us today". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-05-28. 2021-02-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Who was Veer Savarkar and how he contributed in National Freedom Struggle Movement?". Jagranjosh.com. 2020-02-24. 2021-03-03 रोजी पाहिले.
  6. ^ ऑनलाईन, सामना. "लेख : सावरकर घराण्याचे क्रांतिकार्यातील योगदान | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  7. ^ March 31, Dipankar De Sarkar; March 31, 1989 ISSUE DATE:; October 23, 1989UPDATED:; Ist, 2013 10:41. "Plaques of Gandhi, Patel, Tilak and Savarkar put up in London". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  8. ^ "अभिनव भारत". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-03-03 रोजी पाहिले.
  9. ^ "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - Webduniya Marathi". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  10. ^ Sankalit (2017-01-01). Veer Savarkar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-84414-78-8.
  11. ^ "ऐतिहासिक उडीची शताब्दी!". Maharashtra Times. 2021-03-09 रोजी पाहिले.
  12. ^ Saavarkar, Vinayak Damodar (2007-01-01). Mera Ajivan Karavas (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-648-9.
  13. ^ "गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व... | eSakal". www.esakal.com. 2021-02-26 रोजी पाहिले.
  14. ^ "BBC News मराठी".
  15. ^ ":: Swatantra veer Savarakar Smarak ::". www.savarkarsmarak.com. 2018-04-04 रोजी पाहिले.
  16. ^ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले
  17. ^ "वीर सावरकर के आदर्शों पर चलने का लिया गया संकल्प, पुण्यतिथि पर दी गई श्रद्धांजलि". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  18. ^ "10 Interesting facts about VD Savarkar". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-10-19. 2021-02-26 रोजी पाहिले.
  19. ^ "सावरकरांचे समाजकारण | eSakal". www.esakal.com. 2021-03-17 रोजी पाहिले.
  20. ^ "सावरकरांचा हिंदू (भाग ४)". www.mahamtb.com. 2021-03-13 रोजी पाहिले.
  21. ^ जात्युच्छेदक निबंध भाग दोन सावरकरस्मारक डॉट कॉम वेबसाईट २९/०७/२०१२ रात्री दहा वाजता पाहिल्याप्रमाणे[मृत दुवा]
  22. ^ "Tarun Bharat : जयोस्तुते श्रीमहन्मंगले… : स्वातंत्र्यदेवतेची आरती". Tarun Bharat. 2021-03-17 रोजी पाहिले.
  23. ^ "'ने मजसी ने'ची शतकपूर्ती". Maharashtra Times. 2021-03-17 रोजी पाहिले.
  24. ^ "वीर सावरकरांनी 'हे' शब्द मराठीला दिले". My Mahanagar. 2021-03-17 रोजी पाहिले.
  25. ^ Palsule, Gajanan Balkrishna (1998). Vaināyakam: svātantryavīra Vināyaka-Dāmodara-Sāvarakara ityeteṣāṃ jīvanagāthā (संस्कृत भाषेत). Śāradā Gaurava Granthamālā.
  26. ^ "सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द -Maharashtra Times". Maharashtra Times. 2008-05-28. 2018-04-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे