"घाटगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४३: ओळ ४३:
<references group="घाटगे घरण्याचा कुलवृत्तान्त-लेखक नितीन घाडगे" />
<references group="घाटगे घरण्याचा कुलवृत्तान्त-लेखक नितीन घाडगे" />
<references />
<references />
मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात आढळते.
घाटगे हे आडनाव फक्त [[महाराष्ट्र]] राज्यात आढळते.


मलवडी, बुुध, डिस्कळ, राजापूर, मोळ या [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्ह्यातील गावांत घाटगे/घाडगे यांचे वास्तव्य आहे.<ref>इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे मुसलमानी अमदानीत मराठे सरदार हे पुस्तक</ref>
मलवडी, बुुध, डिस्कळ, राजापूर, मोळ या [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्ह्यातील गावांत घाटगे/घाडगे यांचे वास्तव्य आहे.<ref>इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे मुसलमानी अमदानीत मराठे सरदार हे पुस्तक</ref>

१६:००, ८ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

मराठी आडनाव घाटगे किंवा घाडगे हे एकच आहेत. काळाच्या ओघात घाटगे या आडनावाचा अपभ्रंश होऊन, ट अक्षराचा ड होऊन घाडगे असे झाले, कारण मोडी लिपीतील ट हे अक्षर देवनागरी लिपीतील ड या अक्षरासारखे दिसते. (साफ खोटे.! मोडीतला ट हा इंग्रजी जे सारखा दिसतो आणि ड मराठी ड सारखा!!!). महाराष्ट्रातील ठरावीक मोठ्या मनसबदार सरदार घराण्यापैकी राजे अशी पदवी लावणारे हे राजे-घाडगे किंवा राजे-घाटगे होते.

मनसबदार, वजीर, जहागीरदार, संस्थानिक,आणि सरदारांमध्ये राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहेत. हे मूळचे मलवडीचे. बहमनी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू बहमनी" यांनी कामराज घाटगे यांचे वडिलोपार्जित वतन १६ व्या वर्षी देऊन कामराज घाटगे यांना मनसबदार केले व जुने जहागिरी वतन कायम करून दिले. कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते. कामराज यांच्या काळात दुर्गादेवी दुष्काळ पडला होता. हेच कामराज घाटगे घराण्यात जन्माला आलेल्या व ज्ञात असलेल्यांपैकी एकमेव पुरुष आहेत.

प्राचीन काळमुख वंशात, राठोड राजपूत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगे उर्फ घाडगे घराण्याच्या शाखा आहेत. कोल्हापूरकर राठोडवंशी शाखेचे आहेत व तसेच त्या शाखेआधी महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत. हे पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मांडलिक संस्थांनी (इसवी सनाचे १२००वे शतक) राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.

घाटगे उर्फ घाड‌‌‌गे हे नाव कसे पडले ?

सूर्यवंशीय क्षत्रिय घराण्याच्या एक शाखेचा मूळ षुरुष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमी कारकीर्द गाजवली. फेरिस्ता इतिहासकाराने म्हटले आहे, की कामराज ह्या पुरुषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेली घंटा ही कोलांट्या उड्या मारीत वाजवली होती. बेदर व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशूराला ती घंटा वाजवता आली नव्हती, अशी ती अतिउंच असलेली अजिंक्य घंटा (घाट) कामराज ह्या पुरुषाने पराक्रमपूर्वक वाजवून दाखवली. त्यामुळे बादशहाने खुश होऊन त्यास "घाटगे" ही पदवी देऊन गौरव तर केला आणि उच्च प्रतीची मनसब त्यास बहाल केली; वंशपरंपरागत "सैन्यात उच्च अधिकारी "असा अधिकार बहाल केला.

कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.अनेक युद्धांत आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता. बहमनी संस्थापक हसन गंगू बहमनी ह्या बादशहाने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.

ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महाल होते.

मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी झाला होता. हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले. मनसबदार कामराज घाटगे यांना सहा पुत्र होते. जैतपाळनाक, बगडनाक, लोकनाक, नयननाक, लोहनाक, परसनाक ही कामराज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे आहेत. ह्या सहा मुलांपासून पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे घराणे विस्तार पावले. ह्या सर्वांचा मूळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हा होय. यांच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जहागिरी, वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.

ह्या सहा पुत्रांपासून महाराष्ट्र देशातील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराणे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभागले. जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहिमांच्या निमित्ताने दूर दूर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, इंदूर, बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले. तरी हे मनसबदार कामराज राजेघाटगे यांचे वंशज आहेत.

शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणि महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्कृत रूप आहे. १] शिवभारतातील अध्याय ४ मधील श्लोक ३१ " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतत्रपणे करून घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे. यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कवीस अभिप्रेत आहे.

२] तसेच१1ल्या अध्यायातील श्लोक ४३मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भूमिप हेच पद लावले आहे. विशेष करून बहमनी काळातील राजेघाटगे बलाढ्य मराठा घराणे होते. राजेघाटगे यांनी शत्रूशी झुंज दिली म्हणून त्यांनी "झुंझारराव' हा किताब देण्यात आला.

मलवडीच्या राजेघाटगे यांनी शत्रूवर बाजी मारली म्हणून त्यांना बाजीराव हा किताब दिला. राजेघाटगे यांनी किल्ला सर केला म्हणून त्यांना सर्जेराव हा किताब देण्यात आला. झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.

घाटगे उर्फ घाडगे घराणे :-

  • देवक :- सूर्यफूल
  • वंश :-सूर्यवंश
  • गोत्र : कश्यप,
  • गुरु :-वसिष्ठ,
  • वेद :-यजुर्वेद,
  • कूळमंत्र :-गायत्री मंत्र.
  • सिंहासन आणि चिन्ह : - दोन रंग(लाल व पांढरा)
  • घोडा : - पांढरा, फ्लॅगपोलवर चंद्र
  • विजयशस्त्र :खडा
  • सिंहासन साम्राज्य :-अयोध्या (उत्तरप्रदेशात), खटाव देश (मूळ पुरुष कामराज राजेघाटगे)
  • कूळ निशाण :-सूर्य
  • कुळ देवता : - प्रभाकर उर्फ सूर्य
  • कुळदैवत :- जोतिबा, महादेव व महादेवाचे अवतार चंद्रसेन(किल्लेवसंतगड)खंडोबा
  • कुलस्वामिनी :-पार्वती देवीचे आवतार तुळजाभवानी.(तुळजापूर)जानाई देवी,निवखण


घाटगे हे आडनाव फक्त महाराष्ट्र राज्यात आढळते.

मलवडी, बुुध, डिस्कळ, राजापूर, मोळ या सातारा जिल्ह्यातील गावांत घाटगे/घाडगे यांचे वास्तव्य आहे.[१]

छ.राजर्षी शाहू राजेभोसले हे मुळचे घाटगे होत. शाहूंना घाटगे घराण्यातून दत्तक देण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानने घेतला होता.

विशेष सूचना

[मोडी लिपी|मोडी लिपीतील]] ट हे अक्षर देवनागरी लिपीतील ड या अक्षरासारखे अजिबात दिसत नाही, त्यामुळे घाडगेचे घाटगे होण्याचे कारणच नाही.... (चर्चा) १५:४२, ८ एप्रिल २०२१ (IST)

  1. ^ इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे मुसलमानी अमदानीत मराठे सरदार हे पुस्तक