"सिअ‍ॅटल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1700041 by निनावी on 2019-08-23T04:51:03Z
छो →‎हेसुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ ४९: ओळ ४९:
== सरकार व राजकारण ==
== सरकार व राजकारण ==
== शिक्षण ==
== शिक्षण ==
== हेसुद्धा पाहा ==
== हेसुद्धा पहा ==
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==



०५:५५, १८ मार्च २०२१ ची आवृत्ती

सिअ‍ॅटल
Seattle
अमेरिकामधील शहर


सिअ‍ॅटल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सिअ‍ॅटल
सिअ‍ॅटल
सिअ‍ॅटलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 47°36′35″N 122°19′59″W / 47.60972°N 122.33306°W / 47.60972; -122.33306

देश Flag of the United States अमेरिका
राज्य वॉशिंग्टन
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ १४५.२ चौ. किमी (५६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५२० फूट (१६० मी)
किमान ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,०२,०००
  - घनता ७,१३६ /चौ. किमी (१८,४८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.seattle.gov


सिॲटल (तथा सियाटल) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडाच्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे.

सिॲटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये आर्थर डेनी होते जे नोव्हेंबर १३, १८५१ ला सिॲटलला पोचले. १८५३ साली, डॉक मेनर्ड यांने मुख्य वसाहतीला "सिॲटल" नाव द्यावे असे सुचविले. २००६ साली मुख्य शहराची लोकसंख्या ५,८२,१७४ होती व अख्या परिसराची लोकसंख्या साधारणतः ३३ लाख होती. सिॲटल परिसराला 'प्युजेट साउन्ड' असे सामान्यत: म्हटले जाते, ज्यात टकोमा, बेलव्ह्यू आणि एव्हरेट ही शहरे सुद्धा मोजली जातात. १८६९ ते १९८२ पर्यंत, सिॲटल 'क्वीन सिटी' (राणी शहर) म्हणून ओळखली जायची. सिॲटल हे आता 'एमरल्ड सिटी' (पाचू शहर) या उपाधीने ओळखले जाते. हे नाव १९८० च्या दशकात एका स्पर्धेत ठरवले गेले आणि ते ठेवण्याचे कारण आहे सिॲटल भवतालच्या प्रदेशातली वर्षभर हिरवी राहणाऱ्या झाडांची जंगले. सिॲटलला 'गेटवे टू अलास्का' (अलास्काचे प्रवेशद्वार), 'रेन सिटी' (वर्षा शहर), 'जेट सिटी' या नावांने सुद्धा ओळखले जाते. सिॲटलच्या रहिवास्यांना 'सिॲटलाइट्स' म्हटले जाते.

सिॲटल हे 'ग्रंज' संगीतप्रकाराचे जन्मस्थळ मानले जाते व सिॲटलचे लोक खूप कॉफी पीतात अशी त्यांची ख्याती आहे. सिॲटल मध्ये अनेक कॉफी कंपन्या सुरू झाल्या किंवा स्थापन झाल्या आहेत, जसे की 'स्टारबक्स' व 'सिॲटलस् बेस्ट कॉफी'. सेंट्रल कनेटिकट स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेच्या ६९ सर्वात मोठ्या शहरांमध्ये सिॲटलचा साक्षरतेबाबत दुसरा क्रम लावला. तसेच २००४ साली केलेल्या २००२ सालच्या अमेरिकेच्या जनगणनेच्या विश्लेषणातून असे लक्षाल येते की सिॲटल हे अमेरिकेतिल सर्वात सुशिक्षित मोठे शहर आहे कारण इकडच्या २५ वर्ष व जास्त वयाच्या ४८.७ टक्के रहिवास्यांकडे कमीत कमी बॅचलर डिग्री तरी आहे.

इतिहास

ज्या प्रदेशाला आता सिॲटल म्हणतात तिकडे गेल्या बर्फ युगाच्या अंतापासून वस्ती आहे. सिॲटलच्या मॅग्नोलिया भागातील 'डिस्कवरी पार्क' येथे केलेल्या पुरातत्व संशोधननांमुळे असे समजते की या प्रदेशात गेले ४००० वर्ष तरी मनुष्यवस्ती आहे. जेव्हा युरोपी लोकं आली तेव्हा डुवामिश कुलाची कमीत कमी १७ गावं 'एलिअट बे' (एलिअट खाडी) च्या परिसरात होती.

सिॲटलच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना:

  • १८८९ मध्ये सिॲटलच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी भागाला लागलेली आग.
  • १८८५-१८८८ मध्ये चीनी लोकांविरुद्ध झालेले दंगे.
  • क्लॅान्डाइक गोल्ड रश (कॅनडा मधील क्लॅान्डाइक नदी मध्ये सोने शोधण्याकरीता झालेली धावपळ). यामुळे सिॲटल हे महत्वाचे प्रवासाचे ठिकाण म्हणून ओळखू जाऊ लागले.
  • १९१९ चा संपूर्ण बंद. हा अमेरिकेतील सर्वात पहिला संपूर्ण बंद होता.
  • १९६२ मधले "सेंच्युरी २१ एक्सपोझिशन". हा एक जागतिक मेळावा होता.
  • १९९० सालचे "गुडविल खेळ".

भूगोल

वाहतूक

हवाई वाहतूक

सिॲटल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ असून बोईंग फील्ड हा विमानतळ बोईंगच्या विमानांच्या चाचणी व प्रथम उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.

संस्कृती

अर्थव्यवस्था

लोकजीवन

सरकार व राजकारण

शिक्षण

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे