"महाराष्ट्र टाइम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३: ओळ ३:
| लोगो =
| लोगो =
| लोगो रुंदी =
| लोगो रुंदी =
| चित्र = [[चित्र:Shree Hitvardhak Ganesh Temple, Waghivare.jpg|इवलेसे]]
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =

१४:२१, १७ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

महाराष्ट्र टाइम्स
[[चित्र:
|200px]]
प्रकारदैनिक

मालकबेनेट कोलमन आणि कंपनी
प्रकाशकद टाइम्स ग्रुप
मुख्य संपादकपराग करंदीकर
स्थापना१८ जून १९६२
भाषामराठी
किंमत•५ रु. (मुंबई शनि-रवि) ,पुणे

•४ रु. (मुंबई सोम-शुक्र) ,(नाशिक रवि)

•३ रु. औरंगाबाद ,नागपूर , (नाशिक सोम-शनि)
मुख्यालयभारत मुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वृत्तपत्रेद टाइम्स ऑफ इंडिया

संकेतस्थळ: महाराष्ट्रटाइम्स.कॉम


महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते द टाइम्स ऑफ इंडिया (बेनेट कोलमन ॲन्ड कंपनी लिमिटेड)‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकपदी होते. श्री.पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीचे निवासी संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत.

स्थापना

'महाराष्ट्र टाइम्स'ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली. 'महाराष्ट्र टाइम्स' सुरू करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट कोलमन ॲन्ड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष शांतिप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.[१]पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात श्री.शांतिप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.[२]यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की," टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल. मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर वृत्तपत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे." ही माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १८ जून १९६२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.[३]

पहिला अंक

'महाराष्ट्र टाइम्स'चा पहिला अंक १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला. त्यावेळी मोठा समारंभ करण्यात आला. योजनेनुसार जानेवारीपासून वृत्तपत्र सुरू होणार होते. तथापि कागदाचा पुरवठा होण्यात आणि अन्य काही बाबतीत अनेक अडथळे आल्याने ते जूनमध्ये चालू झाले. जानेवारीत नेमलेल्या अनेक पत्रकारांना सहा महिने बेरोजगार राहावे लागले होते. या पहिल्या अंकाच्या संपादक पदाची सूत्रे ज्येष्ठ पत्रकार द्वा.भ.कर्णिक यांच्याकडे दिली होती.

पहिले संपादक मंडळ

संपादक म्हणून द्वा.भ.कर्णिक यांची, पहिले सहसंपादक म्हणून गोविंद तळवलकर, दुसरे सहसंपादक म्हणून मा.पं. शिखरे यांची नियुक्ती झाली. वृत्तसंपादक पदावर दि.वि. गोखले यांची नियुक्ती झाली. पंढरीनाथ रेगे, रामचंद्र माधव पै, चंद्रकांत ताम्हणे, अनंत मराठे, मनोहर साखळकर, माधव गडकरी, दिनू रणदिवे, शंकर सारडा असे अनुभवी पत्रकार पहिल्या संपादक मंडळात होते.[४][५]

विविध आवृत्त्या

आवृत्ती स्थापना बंद पुरवणी
अहमदनगर २१ नोव्हेंबर २०१३ १३ मे २०२० अहमदनगर टाइम्स
औरंगाबाद ०९ डिसेंबर २०११ चालू औरंगाबाद टाइम्स
जळगाव २० ऑगस्ट २०१३ १३ मे २०२० जळगाव टाइम्स
कोल्हापूर २१ ऑगस्ट २०१२ ३१ मे २०२० कोल्हापूर टाइम्स
मुंबई १८ जून १९६२ चालू मुंबई टाइम्स, वसई-विरार प्लस
नागपूर १२ जून २०१२ चालू नागपूर प्लस (आधी नागपूर टाइम्स)
नाशिक ०८ जून २०११ चालू नाशिक प्लस (आधी नाशिक टाइम्स)
पुणे ०७ जानेवारी २०११ चालू पुणे प्लस (आधी पुणे टाइम्स)
ठाणे १८ फेब्रुवारी २०१५ चालू ठाणे प्लस, नवी मुंबई प्लस (आधी ठाणे विशेष)

विशेष पुरवण्या

पुरवणी आवृत्ती वार
टाइम्स प्रॉपर्टी मुंबई, पुणे, ठाणे शुक्रवार / शनिवार
संवाद सर्व रविवार
मैफल नागपूर, नाशिक, पुणे शनिवार
टाइम्स औरंगाबाद, मुंबई सोमवार-शनिवार
प्लस मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे दररोज / सोमवार-शनिवार (वसई-विरार)

संदर्भ

  1. ^ रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-
  2. ^ रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-
  3. ^ रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-
  4. ^ रा.के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
  5. ^ रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२७,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-