"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''स्मिता पाटील''' (जन्म : पुणे, [[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]]; मृत्यू : मुंबई [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कुल ही शाळा चालवली जाते.
'''स्मिता पाटील''' (जन्म : पुणे, [[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]]; मृत्यू : मुंबई [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]) या [[चित्रपट]], [[दूरचित्रवाणी]] आणि [[नाटके|नाटकांतून]] कामे करणार्‍या [[मराठी]] अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या '[[चरणदास चोर]]' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.[[धुळे]] जिल्ह्यातील [[शिरपूर]] येथे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कुल ही शाळा चालवली जाते.


==सुरुवातीचे जीवन==
==सुरुवातीचे जीवन==

१२:५७, ११ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

स्मिता पाटील
पाटील २०१३ च्या भारताच्या डाक तिकिटावर
जन्म स्मिता पाटील
ऑक्टोबर १७, इ.स. १९५५
पुणे
मृत्यू डिसेंबर १३, इ.स. १९८६
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, टेलीविजन समाचार प्रस्तुती
कारकीर्दीचा काळ १९७४ – १९८५
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट मंथन (१९७७),
भूमिका (१९७७),
आक्रोश (१९८०),
चक्र (१९८१),
चिदंबरम (१९८५),
मिर्च मसाला (१९८५)
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९८५)
वडील शिवाजीराव पाटील
आई विद्याताई पाटील
पती राज बब्बर
अपत्ये प्रतीक बब्बर

स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कुल ही शाळा चालवली जाते.

सुरुवातीचे जीवन

स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.

चित्रपट

चित्रपट पात्र प्रकाशन वर्ष (इ.स.)
मेरे साथ चल गीता १९७४
चरणदास चोर राजकुमारी १९७५
सामना कमळी १९७५
निशांत रुक्मिणी १९७५
मंथन बिंदु १९७६
जैत रे जैत चिंदी १९७७
भूमिका उषा/उर्वशी दळवी १९७७
सर्वसा़क्षी सुजाता १९७८
गमन सुजाता १९७८
आक्रोश नागी भिकू १९८०
चक्र अम्मा १९८०
नमकहलाल पूनम १९८०
शक्ती रोमा १९८०
अर्थ कविता संन्याल १९८२
उंबरठा सावित्री १९८२
मंडी झीनत १९८३
अर्धसत्य जोत्स्ना १९८३

स्मिता पाटील यांच्यावर चित्रित हिंदी-मराठी गाणी

  • आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों (हिंदी)
  • आपकी याद आती रही रातभर (हिंदी)
  • गगन सदन तेजोमय
  • जांभूळ पिकल्या झाडाखाली
  • तुम्हारे बिना जी ना लागे घर में (हिंदी)
  • दिखाई दिए यूँ के (हिंदी)
  • मी रात टाकली
  • साजन के गुण गाये (हिंदी)
  • सावन के दिन आये (हिंदी)

दृक्‌श्राव्य कार्यक्रम

स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्‌श्राव्य कार्यक्रम आहे.

लघुपट महोत्सव

स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.[१]

पुरस्कार

  • स्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे 'जैत रे जैत' या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना मिळाले आहेत.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

  1. ^ "About". Smita Patil Documentary and Short Film Festival (इंग्रजी भाषेत). 2018-12-13 रोजी पाहिले.