"हरभट पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Misslinius (चर्चा | योगदान) नवीन पान: हरभट पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष होते. हरभट पटवर्धन... |
(काही फरक नाही)
|
०३:३७, ८ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती
हरभट पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष होते.
हरभट पटवर्धन ह्यांचे मुळ गाव कोतवडे ह्या कोकणातील ठिकाणी होते. गणपतीपुळ्याच्या गणेशाचे ते निस्स्मीम भक्त होते. घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकणातून् प्रवास करताना त्यांची गाठ इचलकरंजीला पेशवेकालिन सरदार घोरपडे ह्यांच्याशी पडली. त्यांच्या शिफारशीवरुन् हरभटांची मुले पेशव्यांच्या सेवेत रुजु झाली. [१]
ह्याच घरण्यात पुढे गृहकलह निर्माण होऊन जमखंडी संस्थान, मिरज संस्थान (थोरली पाती), मिरज संस्थान (धाकटी पाती), सांगली संस्थान, तासगाव संस्थान अशी छोटी राज्ये निर्माण झाली.
सांगलीच्या सुप्रसिद्ध हरभट पुलाचे नाव ह्यांच्या नावावरुनच पडले आहे.
संदर्भ
- ^ "तासगावाचा ऐतिहासिक रथोत्सव". पुढारी.