"बालमणी अम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
| नाव = बालमणी अम्मा
| नाव = बालमणी अम्मा
| चित्र = Arundhati Bhattacharya - Kolkata 2014-05-23 4312.JPG
| चित्र = Balamaniamma.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = बालमणी अम्मा
| चित्रशीर्षक = बालमणी अम्मा

११:४९, १२ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

बालमणी अम्मा
जन्म बालमणी अम्मा
१९ जुलै, १९०९ (1909-07-19) (वय: ११४)
पुन्नायुरकुलम, मालाबार,मद्रास भारत
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू


नालापट बालमणी अम्मा (१९ जुलै १९०९ ते २९ सेप्टेंबर २००४) ह्या आधुनिक मलयाळम् कवयित्री होत्या.त्या एक मातृत्वाच्या कवयत्री म्हणून ओळखल्या जात. तसेच त्यांनी लिहलेल्या अम्मा (आई), मुथासी (आजी) आणि माझुविंटे या कथा खूप गाजल्या होत्या.त्यांना खुपसे अवार्ड्स मिळाले आहेत त्यामध्ये पद्मश्री भूषण अवार्ड देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता.

जीवन परिचय

त्यांचा जन्म मलबारमधील पुन्नयूरक्कुळम् (ता. वन्नेरी) येथे. त्यांचे माता-पिता कोच्चुअम्म व चिट्टन्नूर कुंजुण्णी राजा अशी नावे होती आणि पती कै. एम्. व्ही. नायर. मातृभूमि या नियतकालिकाचे कै. नायर हे प्रदीर्घ काल कार्यकारी संचालक होते. बालमणी अम्मा यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही पण त्यांनी घरीच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण घेतले.नालप्पाट्टू नारायण मेनन हे मल्याळम् कवी व लेखक त्यांचे मामा होत. असा साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण व्यतीत झाले. माधवी कुट्टी (कमला दास) ह्या बालपणी अम्म यांच्या कन्या असून त्यांनी मलयाळम्मध्ये कथा-कादंबरीलेखन आणि इंग्रजीत कवितालेखनही केले.

पुरस्कार

बालमणी अम्मा यांना ‘साहित्यनिपुणा’ (१९६३), ‘केरळ साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६४-मुत्तश्शि ह्या काव्यसंग्रहास) आणि ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६६-मळुविंटे कथा ह्या काव्यास) हे बहुमानाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी लहान मुलांवर नातालागांवर खूप कविता केल्या आणि त्या गाजल्यामुळे त्यांना अम्मा हि पदवी मिळाली.मुठासीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१ 63 )63), मुठासीसाठी केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार (१ 65 )65), आसन पुरस्कार (१ 9 9)), वल्लथोल पुरस्कार (१ 1993)), ललिताम्बिका अंतर्जनाम पुरस्कार (१ 199 199)) यासह तिला अनेक साहित्यिक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. निवेद्यम (१ 1995 1995)) साठी सरस्वती सन्मान, एझुठाचन पुरस्कार (१ 1995 1995)), आणि एन.व्ही. कृष्णा वॉरियर पुरस्कार (१ 1997 1997)). []] १ 198 77 मध्ये तिला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण मिळाला होता.

लिहलेले काव्यसंग्रह

आतापर्यंत त्यांचे सु. १३ काव्यसंग्रह, चार-पाच इतर काव्ये व एक निबंधसंग्रहही-जीवितत्तिलूटे (१९६९-म.शी. जीवनातून)-प्रसिद्ध झाला. त्यांतील प्रमुख संग्रह व काव्ये पुढीलप्रमाणे : अम्म (१९३३- म. शी. आई), कुटुंबिनि (१९३६-गृहलक्ष्मी), धर्ममार्गत्तिल (१९३८-धर्ममार्गावर), स्त्रीह्रदयम् (१९३९), प्रभांकुरम् (१९४२-प्रकाशांकुर), भावनयिल (१९४२-कल्पनेत), वेळिच्यात्तिल (१९५१-प्रकाशात), अवरपाटुन्नु (१९५२-ते गातात), प्रणामम् (१९५४-अभिवादन), लोकांतरंगळिल् (१९५५-दुसऱ्या जगात-विलापिका), सोपानम्(१९५९-सोपान-निवडक कवितांचे बृहद् संकलन), मुत्तश्शि (१९६२-आजी), मळुविंटे कथा (१९६६-परशूची कथा- परशुराम, बिभीषण व विश्वामित्र यांच्या जीवनावरील तीन आख्यानपर भावकाव्ये), अंपलत्तिल (१९६७-मंदिरात), नगरत्तिल (१९६८-शहरात) इत्यादी.

संदर्भ

[१][२][३][४][५][६]

  1. ^ "K. M. George (writer)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-08-02.
  2. ^ "WebCite query result" (PDF). www.webcitation.org. 2020-08-12 रोजी पाहिले.
  3. ^ "++++++ official website of INFORMATION AND PUBLIC RELATION DEPARTMENT +++++". web.archive.org. 2007-05-24. 2020-08-12 रोजी पाहिले.
  4. ^ "The love queen of Malabar : memoir of a friendship with Kamala Das : Weisbord, Merrily : Free Download, Borrow, and Streaming". Internet Archive (इंग्रजी भाषेत). 2020-08-12 रोजी पाहिले.
  5. ^ "Sukumar Azhikode". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-07-29.
  6. ^ "Balamani Amma no more". archive.indianexpress.com. 2020-08-12 रोजी पाहिले.