"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
|चित्र२ = Zeemarathi.gif
|चित्र२ = Zeemarathi.gif
|चित्र२साईज = 200px
|चित्र२साईज = 200px
|चित्र२माहिती. = झी मराठी दुसरा लोगो
|चित्र२माहिती = झी मराठी दुसरा लोगो
|सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९<ref name="आमच्याबद्दल">"[http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 झी मराठी - आमच्याबद्दल]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100210105441/http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 विदागारातील आवृत्ती]</ref>
|सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९<ref name="आमच्याबद्दल">"[http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 झी मराठी - आमच्याबद्दल]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100210105441/http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 विदागारातील आवृत्ती]</ref>
|शेवटचे_प्रसारण =
|शेवटचे_प्रसारण =
ओळ १७: ओळ १७:
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|देश = [[भारत]]
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र = जगभर
|प्रसारण क्षेत्र = संपूर्ण जग
|मुख्यालय = [[झी टीव्ही]]
|मुख्यालय = [[झी टीव्ही]]
135, कॉंटीनेंटल बिल्डींग,
१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग,
[[वरळी]], [[मुंबई]], ४०००१८.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100314121606/http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx विदागारातील आवृत्ती]</ref>
डॉ.ॲनी बेझंट मार्ग,
[[वरळी]], [[मुंबई]] 400018.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100314121606/http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx विदागारातील आवृत्ती]</ref>
|जुने नाव = [[अल्फा मराठी]]
|जुने नाव = [[अल्फा मराठी]]
|बदललेले नाव = [[झी मराठी]]
|बदललेले नाव = [[झी मराठी]]
|भगिनी वाहिनी = झी युवा, [[झी टॉकीज]], [[झी २४ तास ]]
|भगिनी वाहिनी = झी युवा, [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]]
|प्रसारण वेळ = २४ तास
|प्रसारण वेळ = २४ तास
|प्रमुख वेळ = संध्या.६ ते रात्री ११
|संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com
|संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com
|DTH उपलब्धता = टाटा स्काय, डिश टीव्ही, झिंग डिजिटल, सन डिरेक्ट, एअरटेल डिजिटल, व्हिडिओकॉन डी२एच, रिलायन्स, डेन, हॅथवे
|DTH उपलब्धता = टाटा स्काय, डिश टीव्ही, झिंग डिजिटल, सन डिरेक्ट, एअरटेल डिजिटल, व्हिडिओकॉन डी२एच, रिलायन्स, डेन, हॅथवे
ओळ ३१: ओळ ३१:




'''झी मराठी''' ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील एक सुप्रसिद्ध वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली.२८ मार्च २००४ पर्यंत ही वाहिनी [[अल्फा मराठी]] या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. झी मराठीची HD वाहिनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु झाली. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २८ मार्च २०२० पासून बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरु करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. <ref name="आमच्याबद्दल"/> '''झी मराठी'''ने २००४ सालापासून चित्रपट आणि नाटकांच्या सन्मानासाठी ''झी गौरव पुरस्कार'' आणि मालिकांच्या सन्मानासाठी ''झी मराठी अवॉर्डस्'' सुरु करण्यात आले. मात्र सन २०१३ साली झी मराठीने चित्रपटांसाठी ''झी चित्र गौरव पुरस्कार'', नाटकांसाठी ''झी नाट्य गौरव पुरस्कार'' आणि समाजातील स्त्रियांचा गौरव करण्यासाठी ''उंच माझा झोका पुरस्कार'' सुरु केले. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
'''झी मराठी''' ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील एक सुप्रसिद्ध वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली.२८ मार्च २००४ पर्यंत ही वाहिनी [[अल्फा मराठी]] या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. झी मराठीची HD वाहिनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु झाली. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २८ मार्च २०२० पासून बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरु करण्यात आल्या. १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. <ref name="आमच्याबद्दल"/> '''झी मराठी'''ने २००४ सालापासून चित्रपट आणि नाटकांच्या सन्मानासाठी ''झी गौरव पुरस्कार'' आणि मालिकांच्या सन्मानासाठी ''झी मराठी अवॉर्डस्'' सुरु करण्यात आले. मात्र सन २०१३ साली झी मराठीने चित्रपटांसाठी ''झी चित्र गौरव पुरस्कार'', नाटकांसाठी ''झी नाट्य गौरव पुरस्कार'' आणि समाजातील स्त्रियांचा गौरव करण्यासाठी ''उंच माझा झोका पुरस्कार'' सुरु केले. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत.
तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत.


<br/>
<br/>

२२:३७, १४ जुलै २०२० ची आवृत्ती

झी मराठी
सुरुवात१५ ऑगस्ट १९९९[१]
मालक झी नेटवर्क
ब्रीदवाक्य मी मराठी, झी मराठी
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयझी टीव्ही

१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग,

वरळी, मुंबई, ४०००१८.[२]
जुने नावअल्फा मराठी
बदललेले नावझी मराठी
भगिनी वाहिनीझी युवा, झी टॉकीज, झी २४ तास
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळhttp://www.zeemarathi.com


झी मराठी ही झी नेटवर्क समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील एक सुप्रसिद्ध वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली.२८ मार्च २००४ पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. झी मराठीची HD वाहिनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु झाली. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २८ मार्च २०२० पासून बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरु करण्यात आल्या. १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. [१] झी मराठीने २००४ सालापासून चित्रपट आणि नाटकांच्या सन्मानासाठी झी गौरव पुरस्कार आणि मालिकांच्या सन्मानासाठी झी मराठी अवॉर्डस् सुरु करण्यात आले. मात्र सन २०१३ साली झी मराठीने चित्रपटांसाठी झी चित्र गौरव पुरस्कार, नाटकांसाठी झी नाट्य गौरव पुरस्कार आणि समाजातील स्त्रियांचा गौरव करण्यासाठी उंच माझा झोका पुरस्कार सुरु केले. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत.


मालिका

  • लघुमालिका
  1. जगाची वारी लय भारी (१० एपिसोड)
  2. नाममात्र (१२ एपिसोड)
  3. एक गाव भुताचा (१२ एपिसोड)
  4. कॉन्स्टेबल कामना कामतेकर (१८ एपिसोड)
  5. टोटल हुबलाक (२४ एपिसोड)
  6. घरात बसले सारे (२५ एपिसोड)
  7. मालवणी डेज् (२८ एपिसोड)
  8. डिस्कव्हर महाराष्ट्र (३९ एपिसोड)
  • दीर्घमालिका
  1. अवघाचि संसार (११६९ एपिसोड २४ एप्रिल २०१० पर्यंत)
  2. आम्ही सारे खवय्ये (३३७३ एपिसोड २७ मार्च २०२० पर्यंत)
  3. होम मिनिस्टर (२८३३ एपिसोड ११ जुलै २०२० पर्यंत)
  4. माझ्या नवऱ्याची बायको (११४२ एपिसोड २७ मार्च २०२० पर्यंत)
  5. तुझ्यात जीव रंगला (११०७ एपिसोड २७ मार्च २०२० पर्यंत)

प्रसारित मालिका

सोम ते शनि

  • सायं. ०६.०० लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
  • सायं. ०६.३० होम मिनिस्टर
  • सायं. ०७.०० मिसेस मुख्यमंत्री
  • सायं. ०७.३० तुझ्यात जीव रंगला
  • रात्री ०८.०० माझ्या नवऱ्याची बायको
  • रात्री ०८.३० अग्गंबाई सासूबाई
  • रात्री ०९.०० माझा होशील ना
  • रात्री १०.३० रात्रीस खेळ चाले २

कथाबाह्य कार्यक्रम

  • सकाळी ०५.०० पतंजलि योग = दररोज
  • सकाळी ०८.०० वेध भविष्याचा = दररोज
  • दुपारी ०१.३० आम्ही सारे खवय्ये = सोम-शुक्र (सध्या बंद)
  • सायं. ०६.३० मस्त महाराष्ट्र = रवि
  • रात्री ०९.३० चला हवा येऊ द्या = सोम-मंगळ
  • रात्री ०९.३० महाराष्ट्राचा सुपरस्टार = बुध-गुरु
  • रात्री ०९.३० अळी मिळी गुपचिळी = शुक्र-शनि (सध्या बंद)

रिॲलिटी शो

झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत.

चला हवा येऊ द्या

कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा प्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र (भाऊ) कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरु केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न ही पर्वे सादर झालेली होती. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.

फू बाई फू

फू बाई फू हा झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय काॅमेडी शो आहे. याचे पहिले पर्व २०१० मध्ये सादर झाले होते. याची ८ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, इत्यादी पर्वे होती. निलेश साबळे हा सूत्रसंचालक आणि अश्विनी काळसेकर, निर्मिती सावंत, महेश कोठारे, रेणुका शहाणे व स्वप्निल जोशी या सर्वांनी परिक्षणाचे काम केले होते.

सा रे ग म प

मराठी संगीत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी, मराठी युवा गायकांना जगासमोर आणण्यासाठी झी मराठीने "सा रे ग म प" या कार्यक्रमाची सुरुवात केली. "सा रे ग म प" या कार्यक्रमाने तब्बल १३ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. पल्लवी जोशी हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे :-

  • स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमप चे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा अभिजीत कोसंबी याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे ऊर्मिला धनगर ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका देवकी पंडित, रॉकस्टार अवधूत गुप्ते, संगीतकार अजय-अतुल इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले.
  • स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला.
  • लिटिल चॅंप्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला लता मंगेशकर यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटिल चॅंप्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे

१. अलिबागची लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन २. आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड ३. लातूरचा म्युझिक डायरेक्टर रोहित राऊत ४. पुण्याची ॲंग्री यंगगर्ल आर्या आंबेकर ५. रत्नागिरीचा उकडीचा मोदक प्रथमेश लघाटे

या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या केतकी माटेगांवकरने तर संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका वैशाली सामंत व गायक-संगीतकार अवधूत गुप्ते या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प" ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्या मध्ये सेलिब्रिटी स्पेशल, प्रोफेशनल स्पेशल, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने सारेगमप द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले.

एकापेक्षा एक

झी नेटवर्क आणि मराठी सुपरस्टार सचिन पिळगांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला डान्सचा महामंच "एकापेक्षा एक". "एकापेक्षा एक"ने मराठी नृत्य कलेला अनेक रत्ने बहाल केली. महाराष्ट्राला नानाविध कलांची खाण म्हटले जाते. या खाणीतून सर्वोत्कृष्ट निवडणे म्हणजे मोठे कठीण काम; पण ही जबाबदारी लीलया पेलली ती महागुरू सचिन पिळगावकरांनी. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला सॅड्रिक डिसूझा, आशिष पाटील, फुलवा खामकर यांसारख्या डान्स कोरिओग्राफरची भेट मिळाली.

हास्यसम्राट

हास्य हे सर्व रोगांवरचं, तणावावरचं रामबाण औषध आहे असं म्हटलं जातं. हे सार्थ ठरविण्यासाठी झी मराठीने साकारला हास्याचा पहिला मराठी रिॲलिटी शो "हास्यसम्राट". या कार्यक्रमाची एकूण २ पर्व सादर झाली. पहिल्या पर्वाचे सोलापूरचे दीपक देशपांडे हे विजेते झाले, तर दुसऱ्या पर्वाचे मिरजचे अजित कोष्टी हे विजेते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी याने केले. तर परीक्षक म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे व ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली.

कथाबाह्य कार्यक्रम

  1. सा रे ग म प (१३ पर्वे)
  2. फू बाई फू (८ पर्वे)
  3. एकापेक्षा एक (६ पर्वे)
  4. चला हवा येऊ द्या (६ पर्वे)
  5. तुफान आलंया (४ पर्वे)
  6. हप्ता बंद (२ पर्वे)
  7. खुपते तिथे गुप्ते (२ पर्वे)
  8. मराठी पाऊल पडते पुढे (२ पर्वे)
  9. डान्स महाराष्ट्र डान्स (२ पर्वे)
  10. हास्यसम्राट (२ पर्वे)
  11. मधली सुट्टी (२ पर्वे)
  12. महाराष्ट्राचा सुपरस्टार (२ पर्वे)
  13. मधु इथे अन् चंद्र तिथे
  14. राम राम महाराष्ट्र
  15. वेध भविष्याचा
  16. याला जीवन ऐसे नाव
  17. महाराष्ट्राची लोकधारा
  18. डब्बा गुल
  19. झिंग झिंग झिंगाट
  20. कानाला खडा
  21. अळी मिळी गुपचिळी
  22. पतंजलि योग
  23. सूर ताल
  24. तुमचं आमचं जमलं

हेसुद्धा पहा


संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "झी मराठी - आमच्याबद्दल"[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  2. ^ "झी मराठी - संपर्क"[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती