"बुद्ध गाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २७: ओळ २७:
२. धम्मपद -
२. धम्मपद -


*यमकवग्गो
*'''यमकवग्गो'''
१.
१.
मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
ओळ १३२: ओळ १३२:
१३. यथा अगारं दुच्छन्‍नं, वुट्ठी समतिविज्झति। एवं अभावितं चित्तं, रागो समतिविज्झति॥
१३. यथा अगारं दुच्छन्‍नं, वुट्ठी समतिविज्झति। एवं अभावितं चित्तं, रागो समतिविज्झति॥


१३.ज्याप्रमाणे (अव्यवस्थित)पद्धतीने शाकारलेल्या (आच्छादलेल्या) घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे राग काम ध्यान साधनेने संस्कारित न झालेल्या चित्तात घुसते <br />
१३.ज्याप्रमाणे (अव्यवस्थित)पद्धतीने शाकारलेल्या (आच्छादलेल्या) घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे राग काम ध्यान साधनेने संस्कारित न झालेल्या चित्तात घुसते

* '''अप्पमादवग्गो'''

२१. अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं ।

     अप्पमत्ता न मीयण्नत ये पमत्ता यथा मता ।। १ ।।

२१. अप्रमाद म्हणजे जागृत असणे हा अमृताचा (अमरत्वाचा) मार्ग आहे;

      प्रमाद म्हणजे बेसावधपणा हा मृत्युचा मार्ग आहे. जे अप्रमत्त आहेत ते मरत नाहीत;

     जे प्रमत्त आहेत ते मृतवतच (जणू काय मृतच) आहेत.।। १ ।।

१५:०४, ७ जुलै २०२० ची आवृत्ती

भगवान बुद्धांच्या पवित्र मुखातून वेगवेगळ्या प्रसंगी सुखदायी गाथा,ज्या लहान परंतु अत्यंत गहन मनात खोल पर्यंत रुजणाऱ्या आहेत या काही गाथा ऐकून अनेक भिकू अरहंत पदाला पोहचले अशी अफाट शक्ती या गाथान मध्ये आहे.

अश्या पवित्र गाथा त्रिपिटक या ग्रंथात हजारो वर्ष जतन करण्यात आल्या आहेत पाली भाषेतील गाथा अनेक देश्यानी त्यांच्या भाषेत भाष्यातरित करून समग्र विकास साधला आहे. कम्बोडिया,श्रीलंका,थायलंड ब्रह्मदेश,व्हिएतनाम,लाओस असे अनेक लहान देश बौद्ध संस्कृती मुळे सांस्कृतिक दृष्ट्या खूप विशाल आहेत.

त्रिपिटक मराठी अनुवाद

तथागत बुद्धांच्या गाथा त्रिपिटीक पाली ग्रंथा मध्ये जतन करून ठेवल्या आहेत त्या पैकी काही गाथांचे मराठीत अनुवाद खालील प्रमाणे आहे.

दिघ निकया

मज्झिम निकाय

संयुत्त निकाय

अंगुत्तर निकाय

खुद्दका निकाय (‘लघु संग्रह’)

सर्वात जुने त्रिपिटीक कोरिया मध्ये जतन करून ठेवले गेले आहे
त्रिपिटक

खुद्दका निकाय (‘लघु संग्रह’) सुत्त पिटकामध्ये पाच निकयांपैकी शेवटचा संग्रह आहे, जो थेरवाद बौद्ध धर्माच्या पाली तिपिटाकांची रचना करणार्‍या “तीन पिटका” पैकी एक आहे. या निकयामध्ये पंधरा (थायलंड), पंधरा (श्रीलंका बुद्धघोष यांच्या यादीतील ) किंवा अठरा पुस्तके (ब्रह्मदेश), बुद्ध आणि त्याच्या मुख्य शिष्यां संबधित विविध विषयांवर वेगवेगळ्या आवृत्तींमध्ये उपलब्ध आहेत.

१. खुद्दकपद - नऊ लहान परिच्छेदांचा संग्रह जो नव प्रव्रर्जित भिक्षू आणि भिक्षुणींसाठी धर्मशिक्षणाचे पहिली नियमावली होय. यामध्ये अत्यंत महत्वाच्या गाथा आहे ज्या आजही थेरवाद बौद्ध धर्माच्या जगभरातील विहारात रोज पठण केल्या जातात. या परिच्छेदांमध्ये समाविष्ट आहे: त्रिरत्नाला शरण जाण्याचे सूत्र; दहा आज्ञा; आणि करणीय मैत्री गाथा, मंगल गाथा आणि रतन सुत्त.

  • शरण गमना - बुद्धं शरणं गच्छामि : मी बुद्धाला शरण जातो। धम्मं शरणं गच्छामि : मी धम्मला शरण जातो। संघं शरणं गच्छामि : मी संघाला शरण जातो।
  • दुतियम्पि बुद्धं शरणं गच्छामि : दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो। दुतियम्पि धम्मं शरणं गच्छामि :दुसऱ्यांदा मी धम्मला शरण जातो। दुतियम्पि संघं शरणं गच्छामि : दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो।
  • ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि : तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो। ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि :तिसऱ्यांदा मी धम्मला शरण जातो। ततियम्पि संघं शरणं गच्छामि : तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो।
  • दस्स सिक्खपदा - १. मी चोरी करणार नाही २. मी खोटे बोलणार नाही ३. मी व्याभिचार करणार नाही. ४. मी खोटे बोलणार नाही. ५. मी दारू पिणार नाही. ६. मी अवेळी अन्न ग्रहण करणार नाही ७. मी नृत्य, गाणे, संगीत आणि पाहणे आदी पासून दूर राहील ८. मी हार घालणे सुगंध व सौंदर्यप्रसाधनांनी सुशोभित अश्या वस्तूपासून दूर राहील. ९. मी उच्च आणि विलासी पलंग आदी वर झोपणार नाही १०. मी सोने आणि चांदी आदींचे दान ग्रहण करणार नाही.

२. धम्मपद -

  • यमकवग्गो

१. मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया। मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा। ततो नं दुक्खमन्वेति, चक्कंव वहतो पदं॥

१. मन हे सर्व धर्माच्या (प्रवृत्तीच्या) पुढे आहे,मन हे प्रधान श्रेष्ठ आहे;ते धर्म मनोमयच आहेत. जर कोणी प्रदुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो,तर वाहन ओढणाऱ्या [बैलाच्या] पावालामागे जसे चाक लागते तसे दुःख त्याच्या मागे लागते.

२. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया । मनसा चे पसन्नेन भासलत वा करोलत वा । ततो नं सुखमनवेलत छाया व अनपालयनी ।। २ ।।

२. मन सर्व धर्मात (प्रवृत्तीमध्ये) पुढे आहे,सर्व विषय मना पासुन उत्पन्न होतात जर कोणी पवित्र, चांगल्या मनाने बोलतो किंवा वागतो,तर सोडून न जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते

३. अक्कोण्च्छ मं अवलध मं अलजलन मं अहालस मे । ये तं उपनय्हण्नत वेरं तेसं न सम्मलत ।। ३ ।।

३. मला शिव्या दिल्या, मला मारले,मला हरवले,मला लुटले याची जे मनात गाठ बांधतात, त्यांचे वैर शांत होत नाही.


४. अक्कोण्च्छ मं अवलध मं अलजलन मं अहालस मे । ये तं न उपनय्हण्नत वेरं तेसूपसम्मलत ।। ४ ।।

४. मला शिव्या दिल्या, मला मारले,मला हरवले,मला लुटले याची जे मनात गाठ बांधीत नाहीत, त्यांचे वैर शांत होते.

५. न लह वेरेन वेरालन सम्मनतीध कुदाचनं । अवेरेन च सम्मण्नत एस धम्मो सननतनो ।। ५ ।।

५. या जगात वैराने वैर शांत होत नाही, अवैराने च संपतो,हा शाश्वत नियम आहे.


६. परे च न लवजानण्नत मयमेत्थ यमामसे ये च तत्थ लवजानण्नत ततो सम्मण्नत मेधगा ।। ६ ।।

६. असे आहेत ज्यांना हे समजत नाही की, आपण हया संसारातून जाणार आहोत आणि हे जे जाणतात त्यांचे कलह शमन पावतात.

७. सुभानुपस्स्स लवहरनतं इण्नद्रयेसु असंवुतं । भोजनण्म्ह अमत्तञ्ञ्ुकुसीतं हीनवीलरयं । तं वे पसहलत मारो वातो रुक्खं व दुब्बिं ।। ७ ।।

७. देह शुभ लेखुनी वर्ततो, इंद्रिय सुखात रत राहतो, भोजनात मर्यादा राखत नाही,जो सुस्त आणि आळशी असतो, त्याचा मारा पाडाव करतो, ज्या प्रमाणे वारा दुर्बळ झाड पाडून टाकतो

८. असुभानुपस्सिं विहरन्तं, इन्द्रियेसु सुसंवुतं। भोजनम्हि च मत्तञ्‍ञुं, सद्धं आरद्धवीरियं। तं वे नप्पसहति मारो, वातो सेलंव पब्बतं॥

८. देह अशुभ लेखुनी वर्ततो, इंद्रिय सुखात रत राहत नाही, भोजनात मात्रा राखतो,जो श्रध्दावान आणि उद्योगी असतो, त्याचा मारा हलवू शकत नाही ,ज्या प्रमाणे शिलामय पर्वताला वारा.

९. अनिक्‍कसावो कासावं, यो वत्थं परिदहिस्सति। अपेतो दमसच्‍चेन, न सो कासावमरहति॥

९. ज्याने चित्त मलाचा अजून परित्याग केला नाही, परंतु काश्याय वस्त्र धारण केले आहे. जो संयम आणि सत्या पासुन दूर आहे त्याने जरी काषाय वस्त्र परिधान केले, तरी तो त्या काषाय वस्त्राला पात्र नाही

१०. यो च वन्तकसावस्स, सीलेसु सुसमाहितो। उपेतो दमसच्‍चेन, स वे कासावमरहति॥

१०. ज्याने चित्त मलाचा परित्याग केला आहे, जो शीलवान आहे जो संयम आणि सत्याच्या जवळ आहे तोच काषाय वस्त्राला पात्र आहे

११. असारे सारमतिनो, सारे चासारदस्सिनो। ते सारं नाधिगच्छन्ति, मिच्छासङ्कप्पगोचरा॥

११. जो (अधम्माला) नि:सार ला सार आणि (धम्माला)सार ला नि:सार समजतो,अश्या चुकीच्या चिंतनात लागलेल्या व्यक्तीस साराची प्राप्ती होत नाही.

१२. सारञ्‍च सारतो ञत्वा, असारञ्‍च असारतो। ते सारं अधिगच्छन्ति, सम्मासङ्कप्पगोचरा॥

१२. जो (धम्माला) सार ला सार आणि (अधम्माला) नि:सार ला नि:सार समजतो,जे सम्यक संकल्पात वावरतात ते सार मिळवतात

१३. यथा अगारं दुच्छन्‍नं, वुट्ठी समतिविज्झति। एवं अभावितं चित्तं, रागो समतिविज्झति॥

१३.ज्याप्रमाणे (अव्यवस्थित)पद्धतीने शाकारलेल्या (आच्छादलेल्या) घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे राग काम ध्यान साधनेने संस्कारित न झालेल्या चित्तात घुसते

  • अप्पमादवग्गो

२१. अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं ।

     अप्पमत्ता न मीयण्नत ये पमत्ता यथा मता ।। १ ।।

२१. अप्रमाद म्हणजे जागृत असणे हा अमृताचा (अमरत्वाचा) मार्ग आहे;

      प्रमाद म्हणजे बेसावधपणा हा मृत्युचा मार्ग आहे. जे अप्रमत्त आहेत ते मरत नाहीत;

     जे प्रमत्त आहेत ते मृतवतच (जणू काय मृतच) आहेत.।। १ ।।