"लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५१: ओळ ५१:
| मागील_निवडणूक१ = [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक]]
| मागील_निवडणूक१ = [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक]]
| मागील_निवडणूक२ = २००९ सार्वत्रिक निवडणूक
| मागील_निवडणूक२ = २००९ सार्वत्रिक निवडणूक
| सत्र_सभागृह_चित्र = Parliament of India.JPG
| सत्र_सभागृह_चित्र =
| सत्र_सभागृह_चित्र_रुंदी =
| सत्र_सभागृह_चित्र_रुंदी =
| बैठक_ठिकाण = [[संसद भवन]], [[नवी दिल्ली]]
| बैठक_ठिकाण = [[संसद भवन]], [[नवी दिल्ली]]

११:३७, ५ जुलै २०२० ची आवृत्ती

प्रकार
प्रकार कनिष्ठ सभागृह
इतिहास
नेते
अध्यक्ष ओम बिर्ला, भारतीय जनता पार्टी
जून १९, इ.स. २०१९
उपसभापती रिक्त,
बहुमत नेता नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी
मे २६, इ.स. २०१४
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य ५५२ (५५० निर्वाचित + २ नियुक्त)
राजकीय गट भारतीय काँग्रेस प्रणित संपुआ
राजकीय गट डावी आघाडी
भाजप प्रणित रालोआ
निवडणूक
मागील निवडणूक २०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक
मागील निवडणूक २००९ सार्वत्रिक निवडणूक
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली
संकेतस्थळ
लोकसभेचे संकेतस्थळ
तळटिपा
धर्मचक्रपरिवर्तनाय

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात).

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.

राज्यागणिक मतदारसंघ

विभाग प्रकार मतदारसंघ
अरुणाचल प्रदेश राज्य
आंध्र प्रदेश राज्य २५
आसाम राज्य १४
उत्तर प्रदेश राज्य ८०
उत्तराखंड राज्य
ओडिशा राज्य २१
कर्नाटक राज्य २८
केरळ राज्य २०
गुजरात राज्य २६
गोवा राज्य
छत्तीसगढ राज्य ११
झारखंड राज्य १४
तमिळनाडू राज्य ३९
तेलंगणा राज्य १७
त्रिपुरा राज्य
नागालँड राज्य
पंजाब राज्य १३
पश्चिम बंगाल राज्य ४२
बिहार राज्य ४०
मणिपूर राज्य
मध्य प्रदेश राज्य २९
महाराष्ट्र राज्य ४८
मिझोरम राज्य
मेघालय राज्य
राजस्थान राज्य २५
सिक्कीम राज्य
हरियाणा राज्य १०
हिमाचल प्रदेश राज्य
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश
चंदीगढ केंद्रशासित प्रदेश
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव केंद्रशासित प्रदेश
लडाख केंद्रशासित प्रदेश
दिल्ली केंद्रशासित प्रदेश
पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश
लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश

हेही पहा

बाह्य दुवे