"काळ्या डोक्याचा शराटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
new pic
ओळ १: ओळ १:
{{पक्षीचौकट
{{पक्षीचौकट
|चित्र = Black headed ibis.jpg
|चित्र = SL Bundala NP asv2020-01 img03.jpg
|मराठी नाव = {{लेखनाव}}, कंकर
|मराठी नाव = {{लेखनाव}}, कंकर
|हिंदी नाव = कचाटोर
|हिंदी नाव = कचाटोर

०८:०५, ४ मे २०२० ची आवृत्ती

काळ्या डोक्याचा शराटी, कंकर
शास्त्रीय नाव Threskiornis melanocephalus (Latham)
कुळ अवाकाद्य (Threskiornithidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Black-headed Ibis
संस्कृत शराटिका
हिंदी कचाटोर

काळ्या डोक्याचा शराटी हा एक पाणपक्षी आहे. याला पांढरा अवाक, कंकर असेही म्हणतात.

वर्णन

कोंबडीपेक्षा मोठा साधारण ७५ सें. मी. आकाराचा काळ्या डोक्याचा शराटी पक्षी मुख्यत्वे काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा आहे. याची चोच, डोके आणि मान तसेच पाय काळ्या रंगाचे असून उर्वरीत पक्षी पांढर्‍या रंगाचा आहे. याची चोच लांब आणि बाकदार असते. वीण काळात नराच्या पाठीकडील भाग आणि पंख काळपट करड्या रंगाचे होतात. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात.

वास्तव्य/आढळस्थान

भारतासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जपान पर्यंत दक्षिण आशियाई देशात काळ्या डोक्याचा शराटी पक्ष्याचे वास्तव्य आहे. हे भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा अवाक तसेच बगळ्यांसह राहतो. सकाळ-संध्याकाळ एखाद्या झाडावर सर्व एकत्र जमतात. अशा जागेला सारंगागार म्हणतात.

खाद्य

उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडुक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या डोक्याचा शराटी पक्ष्यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ

उत्तर भारतात जून ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च हा काळ या पक्ष्यांचा वीण काळ आहे. यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर, मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. सहसा अशा झाडांवर बगळ्यांचे घरटेही असते. मादी एकावेळी २ ते ४ निळसर किंवा हिरवट पांढर्‍या रंगाची त्यावर क्वचित तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन