"पतेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १: ओळ १:
'''पतेती''' हा [[पारशी|पारश्यांचा]] नववर्ष दिवस होय.
'''पतेती''' हा [[पारशी|पारश्यांचा]] नववर्ष दिवस होय.
पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे.मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ywOjcuH7fwgC&pg=PA37&dq=pateti&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjfrp6vwe7oAhWvzzgGHWA9CQEQ6AEIJzAA#v=onepage&q=pateti&f=false|title=Festivals Of The World|publisher=Sterling Publishers Pvt. Ltd|isbn=978-1-84557-574-8|language=en}}</ref>
पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे.मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ywOjcuH7fwgC&pg=PA37&dq=pateti&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjfrp6vwe7oAhWvzzgGHWA9CQEQ6AEIJzAA#v=onepage&q=pateti&f=false|title=Festivals Of The World|publisher=Sterling Publishers Pvt. Ltd|isbn=978-1-84557-574-8|language=en}}</ref>
दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ''नवरोज'' (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक [[अग्यारी]]त जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.
दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ''नवरोज'' (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक [[अग्यारी]]त जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.



१५:१७, २९ एप्रिल २०२० ची आवृत्ती

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे.मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात.[१] दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.

उपासना पंथ

झरतुष्ट हा पारशी धर्माचा संस्थापक मानला जातो. अहुर मज्द ही या धर्म संप्रदायाची प्रमुख पूजनीय देवता मानली जाते.[१] अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ असून "पैतीता" या अवेस्तामधील शब्दाचे अपभ्रंशित रूप म्हणजे "पतेती" होय.

स्वरूप

पतेतीच्या दिवशी पारशी बंधु भगिनी सकाळी लवकर उठतात. या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला "नहान" असे म्हणतात. त्यानंतर नवीन कपडे परिधान करुन सर्वजण अग्यारीत प्रार्थनेला जातात.अग्यारी हे पारशी समाजाचे धर्मस्थळ आहे.अग्नी ही त्यांना पूजनीय देवता असून अग्यारीमधे सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करुन आशीर्वाद देतात.नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात.[२] पतेतीच्या दिवशी गरिबांना दान करण्याचे महत्व विशेष आहे.ज्याप्रमाणे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात त्याप्रमाणे गरजूंना अन्नदान केले जाते. या दिवशीचे खास भोजन म्हणून सालीबोटी,मावा निबोई,पत्र निमाच्ची आणि रवा फालुदा हे पदार्थ केले जातात.[३]

पारशी जेवण

पारशी जेवण हे गुजराती आणि इराणी खाद्यसंस्कृतींवर आधारित आहे.[४] यात मुख्यत्वे भात आणि दालचा (घट्ट वरण) सामावेश आहे. पारशी लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली कोंबडी हे काही पारशी मांसाहारी पदार्थ आहेत. अंडी आणि स्क्रॅंबल्ड एग, पारसी आकूरी, पोरो सारखे अंड्याचे पदार्थ हे पारशी नाश्त्यात असतात.[५]

संदर्भ

  1. ^ a b Festivals Of The World (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-1-84557-574-8.
  2. ^ Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-8324-113-7.
  3. ^ Gupta, Shobhna (2002). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Har-Anand Publications. ISBN 978-81-241-0869-7.
  4. ^ Mavalvala, Niloufer (2016-07-29). The Art of Parsi Cooking: Reviving an Ancient Cuisine (इंग्रजी भाषेत). Austin Macauley Publishers Limited. ISBN 978-1-78629-042-7.
  5. ^ Kapadia, Rita (2014-06-18). Parsi Cuisine (इंग्रजी भाषेत). Createspace Independent Pub. ISBN 978-1-4997-3028-9.