"चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २: ओळ २:
'''चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष''' म्हणजे प्राचीन भारतातील [[पंजाब]] आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] संस्थापक [[चंद्रगुप्त मौर्य]] आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये [[इ.स.पू. ३२५]] - [[इ.स.पू. ३२४|३२४]] च्या आसपास झालेला संघर्ष होता.

==पार्श्वभूमी== इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजा मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रूम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व 518 च्या सुमारास दारयुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते सम्राट च्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होते त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढली सम्राट दारयुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन अस्तित्वात आणले त्यामुळे व्यापार करणे सुलभ झाले परसेपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारयूशच्या काळात बांधले गेले परसीपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे
==पार्श्वभूमी==
[[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडर]] भारतामध्ये होता त्यावेळेपासूनच त्याच्याविरोधातील असंतोष उफाळून आला होता. त्याचे सैन्य [[चिनाब नदी]] पार करत असताना निकानोर या त्याच्या क्षात्रपाचा अस्साकेनोई जमातीच्या लोकांनी वध केला होता. नंतर अलेक्झांडरने फिलिप या आपल्या विश्वासू सहकार्याची त्याच्याजागी सेनापती म्हणून नियुक्ती केली. फिलिपच्या अधिपत्याखाली वायव्य सीमेपासून [[खैबर खिंड|खैबर खिंडीपर्यंतचा]] [[गांधार|प्राचीन गांधारचा]] सर्व प्रदेश, निम्न काबूल खोरे आणि [[हिंदुकुश पर्वत|हिंदुकुश पर्वतापर्यंतचा]] सर्व प्रदेश होता. इ.स.पू. ३२५ मध्ये अलेक्झांडर भारतामधून परतला. त्यानंतर लवकरच फिलिपचाही वध करण्यात आला. अलेक्झांडर बॅबिलोनियाच्या मार्गावर असताना त्याला ही घटना कळली. फिलीपच्या जागी दुसरा सेनापती नियुकत करण्याणेवजी त्याने सर्व ग्रीक प्रदेश [[तक्षशिला]] येथील क्षात्रपाच्या हवाली केला. त्यामुळे भारतावरील ग्रीक नियंत्रण कमजोर झाले.

११:१६, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष म्हणजे प्राचीन भारतातील पंजाब आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये इ.स.पू. ३२५ - ३२४ च्या आसपास झालेला संघर्ष होता.

==पार्श्वभूमी== इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजा मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रूम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व 518 च्या सुमारास दारयुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते सम्राट च्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होते त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढली सम्राट दारयुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन अस्तित्वात आणले त्यामुळे व्यापार करणे सुलभ झाले परसेपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारयूशच्या काळात बांधले गेले परसीपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे अलेक्झांडर भारतामध्ये होता त्यावेळेपासूनच त्याच्याविरोधातील असंतोष उफाळून आला होता. त्याचे सैन्य चिनाब नदी पार करत असताना निकानोर या त्याच्या क्षात्रपाचा अस्साकेनोई जमातीच्या लोकांनी वध केला होता. नंतर अलेक्झांडरने फिलिप या आपल्या विश्वासू सहकार्याची त्याच्याजागी सेनापती म्हणून नियुक्ती केली. फिलिपच्या अधिपत्याखाली वायव्य सीमेपासून खैबर खिंडीपर्यंतचा प्राचीन गांधारचा सर्व प्रदेश, निम्न काबूल खोरे आणि हिंदुकुश पर्वतापर्यंतचा सर्व प्रदेश होता. इ.स.पू. ३२५ मध्ये अलेक्झांडर भारतामधून परतला. त्यानंतर लवकरच फिलिपचाही वध करण्यात आला. अलेक्झांडर बॅबिलोनियाच्या मार्गावर असताना त्याला ही घटना कळली. फिलीपच्या जागी दुसरा सेनापती नियुकत करण्याणेवजी त्याने सर्व ग्रीक प्रदेश तक्षशिला येथील क्षात्रपाच्या हवाली केला. त्यामुळे भारतावरील ग्रीक नियंत्रण कमजोर झाले.

संघर्ष

आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्ताची या घडामोडींवर बारीक नजर होती. परकीय विरोधी लोकभावनेचा फायदा घेऊन चंद्रगुप्ताने सैन्य संघटीत केले. इ.स.पू. ३२३ मध्ये बॅबिलोनिया येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला. त्याच्या सेनापतींमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली. त्याच्या सेनापतींनी ग्रीक साम्राज्याचे विभाजन करून दोन करार केले. बॅबिलोनिया येथे अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पहिल्याच करारात भारताचा उल्लेख साम्राज्याचा पूर्व भाग असा करण्यात आला होता. दुसरा करार त्रिपारादिसस येथे इ.स.पू. ३२१ मध्ये करण्यात आला पण त्यात एकाही भारतीय क्षात्रपाचा उल्लेख नव्हता. म्हणजेच अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर चार वर्षातच भारतीय प्रदेश ग्रीक साम्राज्यापासून फुटून निघाला होता. या चार वर्षातच चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी पंजाब आणि वायव्य भारतातील परकीय अमलाविरूद्ध आपला लढा तीव्र केला होता. ग्रीक सैन्य भारतामधून हुसकावून लावल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य पंजाब, वायव्य सीमा आणि सिंध प्रांताचा स्वामी झाला. ग्रीक क्षात्रपांशी संघर्ष करताना त्याने तक्षशिला काबीज केली होती.