"जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
new pic
ओळ ४: ओळ ४:
| nativename-r =
| nativename-r =
| image =
| image =
| image2 = Karachi_Jinnah_Airport.jpg
| image2 = PK Karachi Airport asv2020-01.jpg
| image-width =
| image-width =
| caption =
| caption =

०७:१९, १३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: KHIआप्रविको: OPKC
KHI is located in पाकिस्तान
KHI
KHI
पाकिस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी
कोण्या शहरास सेवा कराची
स्थळ सिंध, पाकिस्तान
हब एरब्लू
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
शाहीन एर
समुद्रसपाटीपासून उंची १०० फू / ३० मी
गुणक (भौगोलिक) 24°54′24″N 067°09′39″E / 24.90667°N 67.16083°E / 24.90667; 67.16083
संकेतस्थळ कराचीएअरपोर्ट.कॉम.पीके
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
07R/25L 3,400 11,155 कॉंक्रीट
07L/25R 3,200 10,500 कॉंक्रीट

कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ पाकिस्तानच्या कराची शहरातील विमानतळ आहे. हा पाकिस्तानमधील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.

इतिहास

जीना टर्मिनलवर थांबलेले पीआयएचे विमान

इ.स. १९४०च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हॅंगर बांधले गेले. आर-१०१ या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हॅंगरपैकी ते एक होते. हे विमान प्रवासात असताना फ्रान्समध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दशकात जनरल अयुब खानने हे हॅंगर पाडून टाकण्याचा हुकूम दिला.

इ.स. १९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे ब्रिटिश एअरवेज, लुफ्तांसा, अलिटालिया, जाट एअरवेज, एरोफ्लोत, फिलिपाइन एअरलाइन्स, नायजेरिया एअरलाइन्स, इथियोपियन एअरलाइन्स, इजिप्त एअर, ईस्ट आफ्रिकन एअरवेज, केन्या एअरवेज, येमेनिया, इराण एअर, एअर फ्रान्स, क्वांटास, केएलएम, पॅन ॲम, स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्स, कुवैत एअरवेज यांसह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येत जात असत.

१९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या दशकात यातील बर्‍याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. मात्र, गेल्या काही वर्षांत, काही कंपन्या येथे हळूहळू परतत आहेत.

जीना आंतरराष्ट्रीय टर्मिनल

जिन्नाह टर्मिनल

येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढ-उतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.

पीआयएचे मुख्यालय येथे असून एअर ब्लू आणि शाहीन एअरसह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमान कंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.

देखभाल सुविधा

विमानांची देखभाल करण्यासाठीचा हॅंगर

कराची विमानतळावर पीआयए, फिलिपाइन एअरलाइन्स आणि टर्किश एरलाइन्सच्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन बोईंग ७४७ आणि एक बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे बोईंग ७७७ प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही झाली आहे.

प्रवासी वाहतूक कंपन्या

मालवाहतूक कंपन्या

चार्टर कंपन्या

अपघात व दुर्घटना

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे