"रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1680010 by 2405:204:9296:2C06:64C2:9D43:6EE1:5E6E on 2019-04-14T18:34:56Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७: ओळ ७:
<gallery>
<gallery>
Image:ShinjukuSta 1-5ofJR200505.jpg|[[टोकियो]]मधील शिंजुकू स्टेशन जगातील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.
Image:ShinjukuSta 1-5ofJR200505.jpg|[[टोकियो]]मधील शिंजुकू स्टेशन जगातील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.
Image:Grand Central Station Main Concourse Jan 2006.jpg|६७ फलाट असणारे [[न्यू यॉर्क शहर]]ामधील [[ग्रँड सेंट्रल टर्मिनल]] हे जगतील सर्वात मोठे स्थानक आहे.
Image:Grand Central Station Main Concourse Jan 2006.jpg|६७ फलाट असणारे [[न्यू यॉर्क शहर]]ामधील [[ग्रॅंड सेंट्रल टर्मिनल]] हे जगतील सर्वात मोठे स्थानक आहे.
Image:Liverpool Road railway station, Manchester.jpg|१८३० साली बांधलेले [[लिव्हरपूल]] रोड स्टेशन हे जगातील सर्वात जुने स्थानक आहे.
Image:Liverpool Road railway station, Manchester.jpg|१८३० साली बांधलेले [[लिव्हरपूल]] रोड स्टेशन हे जगातील सर्वात जुने स्थानक आहे.
चित्र:Paris Nord Platfrom.jpg|[[पॅरिस]]मधील [[गार द्यू नॉर]] हे [[युरोप]]ातील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.
चित्र:Paris Nord Platfrom.jpg|[[पॅरिस]]मधील [[गार द्यू नॉर]] हे [[युरोप]]ातील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.

१८:५८, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे.

रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशन ही रेल्वे वाहतूकीसाठीची एक इमारत आहे जेथे प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याकरिता रेल्वेगाड्या थांबतात. रेल्वे स्थानकांमध्ये माल चढवून-उतरवून घेण्याची देखील सोय असते. साधारणपणे रेल्वे स्थानकांमध्ये एक वा अनेक फलाट (प्लॅटफॉर्म) असतात ज्यामुळे एका स्थानकावर एकाच वेळी अनेक गाड्या थांबू शकतात. रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री, प्रतिक्षाखोली, उपहारगृहे, स्वच्छतागृहे इत्यादी अनेक सोयी असतात.

जी स्थानके रेल्वेमार्गाच्या सर्वात शेवटी असतात त्यांना टर्मिनस किंवा टर्मिनल असे म्हणतात (उदा. कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस). तसेच ज्या स्थानकांमध्ये एकापेक्षा अधिक रेल्वेमार्ग येउन मिळतात त्यांना जंक्शन म्हणतात (उदा. भुसावळ जंक्शन). बरेच ठिकाणी (विशेषतः युरोपमध्ये) लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी व उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी वेगळी स्थानके असतात. भारतात मात्र ह्या दोन गाड्यांसाठी एकाच स्थानकामधील वेगळे फलाट वापरण्यात येतात.(अपवाद:मुंबई सेंट्रल ह्या स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी व उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी दोन वेगळी स्थानके आहेत.)

गॅलरी

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: