"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1667533 by CommonsDelinker on 2019-02-25T02:07:28Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = रेम्ब्राँ फान रेन
| नाव = रेम्ब्रॉं फान रेन
| चित्र = Rembrant Self-Portrait, 1660.jpg
| चित्र = Rembrant Self-Portrait, 1660.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = रेम्ब्राँने काढलेले आत्मव्यक्तिचित्र ([[इ.स. १६६१|१६६१]])
| चित्र_शीर्षक = रेम्ब्रॉंने काढलेले आत्मव्यक्तिचित्र ([[इ.स. १६६१|१६६१]])
| पूर्ण_नाव = रेम्ब्राँ हार्मेन्स्त्सून फान रेन
| पूर्ण_नाव = रेम्ब्रॉं हार्मेन्स्त्सून फान रेन
| जन्म_दिनांक = [[जुलै १५]], [[इ.स. १६०७|१६०७]]
| जन्म_दिनांक = [[जुलै १५]], [[इ.स. १६०७|१६०७]]
| जन्म_स्थान = [[लायडन]], [[नेदरलँड्स]]
| जन्म_स्थान = [[लायडन]], [[नेदरलॅंड्स]]
| मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १६६९|१६६९]]
| मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १६६९|१६६९]]
| मृत्यू_स्थान = [[अ‍ॅम्स्टरडॅम|ऍमस्टरडॅम]], [[नेदरलँड्स]]
| मृत्यू_स्थान = [[अ‍ॅम्स्टरडॅम|ऍमस्टरडॅम]], [[नेदरलॅंड्स]]
| राष्ट्रीयत्व = [[डच लोक|डच]] [[चित्र:Flag of the Netherlands.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[डच लोक|डच]] [[चित्र:Flag of the Netherlands.svg|18px]]
| कार्यक्षेत्र = [[चित्रकला]]
| कार्यक्षेत्र = [[चित्रकला]]

१८:५७, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

रेम्ब्रॉं फान रेन

रेम्ब्रॉंने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१६६१)
पूर्ण नावरेम्ब्रॉं हार्मेन्स्त्सून फान रेन
जन्म जुलै १५, १६०७
लायडन, नेदरलॅंड्स
मृत्यू ऑक्टोबर ४, १६६९
ऍमस्टरडॅम, नेदरलॅंड्स
राष्ट्रीयत्व डच
कार्यक्षेत्र चित्रकला

रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ किंवा सन १६०७[१] साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो.

रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता.

सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.

१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४०च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.

'द नाईट वॉच' किंवा 'द मिलीशिया कंपनी ऑफ कॅप्टन बॅनिंग कोक' नावाने ओळखले जाणारे तैलचित्र(१६४२). हे चित्र सध्या 'रिक्समुझेउम, ऍमस्टरडॅम' येथे आहे.

१६४० ते १६५०च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.

प्रमुख चित्रे

त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली. सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.codart.nl/news/82/. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)