"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ९६: ओळ ९६:
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.


भारत में प्रचलन
यह बहुविदित आहे की भारतात सर्वप्रथम चहा चे बहुतायत प्रचलन ब्रिटिश शासनकाळात याच
ब्रिटिशांद्वारे झाले होते.

चाय बनविण्यासाठी चा भारतीय प्रकार
सामग्री

२ प्याले पानी।
२ चम्मच चहा पत्ती।
२ चम्मच साखर
ऐच्छिक सामग्री: २ वेलची चा चूरा आणि एक छोटा बारीक केलेले आले.

विधि

पाण्याला चाय पत्ती आणि पाण्यासंग भांड्यात उकळा
दूसरी कडे दूध उकळा.
चहा मध्ये एकदा उकळी आल्यावर वेलची चा चूरा आणि अाल टाका. २ मिनिट पेक्षा जास्त वेळा उकळू नये कारण असे केल्यावर चहा कडू होतो.


== पर्यटन स्थळे ==
== पर्यटन स्थळे ==

२२:३३, १ एप्रिल २०२० ची आवृत्ती

हिरव्या चहाचा पेला

Tea (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका  ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा असे संबोधतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टे/ टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज असल्याचे पाहायला मिळतो.

सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून आठ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.

चहाचा एक कप

चहाचे प्रकार

बदाम पिस्ता चहा, बिरयानी चहा, गुलाबी चहा, ईराणी चहा, बुरंश चहा, हाजमोळा चहा, सुलेमानी / लेबु चहा शीर चहा. उलांग चहा आसाम चहा दार्जिलिंग चहा निलगिरी चहा

बदाम पिस्ता चहा

अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य: १/२ कप पाणी १ कप मलई दूध साखर २ चमचे चहा पावडर ३-४ केशर बदाम आणि पिस्ता १ चमचा २ ईलायची.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.

बुरंश चहा

डेहराडून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे.

साहित्य: १ कप पाणी १ चमचा नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश /र्होडोडेन्ड्रोन पाने १/२ चमचा ग्रीन चहा पावडर १/२ चमचा पुदिना पाने चवीनुसार मध साखर तुळशी पाने (हवी असल्यास)

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाका. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याची पाने टाका.उकळल्यावर मध किंवा साखर घाला.हवी असल्यास तुळशीची पाने घाला. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊ शकता. सूचना : नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवा. बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोन चहा हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्वागत करताना देतात. कॅंफेनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे.बुरंश पाने चहाची चव वाढवतानाच त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.

फायदे : हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.

शीर चहा

पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य: ५ कप पाणी २ कप दूध १ चमचा शीर चहा पाने १/४ चमचा बेकींंग सोडा चिमूटभर मीठ चिमूटभर पिस्ता चिमूटभर वेलची चिमूटभर बदाम १ चमचा मलई

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका. कमी विस्तवावर उकळी येऊ द्या. बेकींग सोडा टाकून जोपर्यंत लाल तपकिरी होईपर्यंत ढवळत राहा. चिमूटभर (शक्यतो सागरी) मीठ टाका आणि उकळी आणा. दूध आणि सुकामेवा टाका. गुलाबी होईपर्यंत ढवळत राहा. मलई आणि कुटलेल्या सुकामेव्याने चहा सजावट करा. सुंदर मलईदार मसालेदार चहा पिण्यासाठी तयार झाला. सूचना :हा चहा बनविण्यासाठी ६ तास लागतात.३ तास चहा पाने उकळून पुन्हा बेकींग सोडा टाकल्यावर २ तास चहा गुलाबी होईपर्यंत उकळावा. हा चहा पाटणा शहरात १९९० सालापासून मिळतो. सुरवातीला हा फक्त रमझान महिन्यात मिळत असे. आता तो वर्षभर मिळतो. पाटणामध्ये सब्जीबागेत 'शाही शीर चहा'म्हणून चहा स्टॉल आहे. फायदे : हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात प्याला जातो कारण त्यामुळे आपण दिवसभर उबदार राहू शकतो.

आसाम चहा

भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग,कडक आणि मादक चव,ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहा मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडतो. आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळा.

चहा वेळ

चहाला कुठलीही वेळ लागत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र आणि अगदी पहाटे सुध्दा चहा प्याला जातो. मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.

भारत में प्रचलन यह बहुविदित आहे की भारतात सर्वप्रथम चहा चे बहुतायत प्रचलन ब्रिटिश शासनकाळात याच ब्रिटिशांद्वारे झाले होते.

चाय बनविण्यासाठी चा भारतीय प्रकार सामग्री

२ प्याले पानी। २ चम्मच चहा पत्ती। २ चम्मच साखर ऐच्छिक सामग्री: २ वेलची चा चूरा आणि एक छोटा बारीक केलेले आले.

विधि

पाण्याला चाय पत्ती आणि पाण्यासंग भांड्यात उकळा दूसरी कडे दूध उकळा. चहा मध्ये एकदा उकळी आल्यावर वेलची चा चूरा आणि अाल टाका. २ मिनिट पेक्षा जास्त वेळा उकळू नये कारण असे केल्यावर चहा कडू होतो.

पर्यटन स्थळे

संदर्भ

मुंबई टाईम्स ०३/०२/२०२०.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत