"संगणक कार्यक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

ॲसेम्ब्ली भाषा तुलनेने कार्यक्रमणास सुकर असली तरी तिचे आदेश निम्नस्तरीय असल्याने कार्यक्रम विकसित करणाऱ्या व्यक्तीस सूक्ष्म स्वरूपातील रूपरेखा तयार करावी लागते. शिवाय ॲसेम्ब्ली भाषा संगणक सापेक्ष असल्याने संगणक बदलल्यास संपूर्ण कार्यक्रमाचे पुनर्लेखन करावे लागते. यास्तव उच्च्स्तरीय भाषांचा विकास करण्यात आला.

कार्यक्रमणाची सुरूवात समस्येसाठी रीती तयार करण्यापासून होते. रीतीमध्ये समस्या सोडविण्याची तार्किक पद्धत वर्णिलेली असते. क व ख या दोन एक-अंकी संख्यांच्या गुणाकाराचे उदाहरण घेऊन याचे स्पष्टीकरण करता येईल. अशा गुणाकाराची रीती पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) क ही संख्या स्वत:मध्ये ख वेळा मिळवून येणारे उत्तर ग समजा. (२) क आणि ख यांचे ऋण-धन चिन्ह समान असल्यास गचे चिन्ह धन व असमान असल्यास ते ऋण असे मांडा. (३) ग हे गुणाकाराचे उत्तर होय.

१६:२६, ७ मार्च २०२० ची आवृत्ती

(कॉम्प्युटर प्रोगामिंग). संगणकाचा वापर करून एखादे प्रमेय किंवा समस्या सोडविण्यासाठी, अथवा एखादे फलित साध्य करण्यासाठी, सुयोग्य रीती विकसित करून तिची संगणकावर कार्यान्वित करता येईल अशा क्रमबद्ध आदेशांच्या रूपात मांडणी करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला ‘ संगणक कार्यक्रमण ’ म्हणतात. प्रत्येक  अंकीय संगणकाला स्वत:ची अशी एक यंत्रभाषा असून त्या भाषेतील कार्यक्रमानुसार तो सांकेतिक स्वरूपातील माहितीवर संस्करण करतो. यंत्रभाषेतील आदेश हे द्विमान अंकांच्या स्वरूपात असल्याने त्यात थेट कार्यक्रमण करणे क्लिष्ट असते.

यास्तव प्रत्येक संगणक स्वत:ची अशी एक ॲसेम्ब्ली भाषा (वर्णाक्षरी भाषा) उपलब्ध करून देतो. या भाषेतील आदेश अंकांऐवजी अक्षरे वापरतात व त्यामुळे ते लक्षात ठेवण्यास तुलनेने सोपे असतात. यामध्ये संगणकाच्या स्मृतीतील क्रमपत्त्यांनाही नावे देता येतात. ॲसेम्ब्ली भाषेतील प्रत्येक आदेशाचे यंत्रभाषेतील आदेशात एकास एक या प्रमाणात भाषांतर होते. मूळ कार्यक्रमाचे असे भाषांतर करणारे ॲसेम्ब्लर सॉफ्टवेअर सर्वांना उपयोगी पडतील अशी काही लायबरी रूटिनेही (सुटे भाग) उपलब्ध करून देते.