"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 2405:204:960C:3D13:0:0:1562:10B1 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahendra.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
Hiiiiii
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८: ओळ २८:


विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे
Good
मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे
मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे
विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे. नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गेदेखील जाता येऊ शकते. रत्नागिरी, पावस, जैतापूर, कात्रादेवी, पडेल कॅन्टीन मार्गे रत्नागिरीहून विजयदुर्गला २ तासात पोहचता येते. ह्या नव्या सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग येथे पोहचण्याचे ३ तास वाचले आहेत. तेव्हा ह्या मार्गाचा हि पर्यायी मार्ग म्हणून वापर करून आणि समुद्रकिनारी सर्व गावांचे आणि निसर्गाचे दर्शन घेत विजयदुर्ग येथे जाता येते. विजयदुर्ग हे समुद्रामार्गी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील बाजूस राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा आणि शिरसे गावाची खाडी हि दिसते.

विजयदुर्ग येथे एसटी आगार असून येथे दिवसाकाठी मुंबईला जाण्यासाठी २ बसेस आहेत तर पुण्याला जाण्यासाठी १.आणि दर एक तासाने देवगड इथे जाण्यासाठी बसेस आहेत .
तालुक्याचे ठिकाण : देवगड बाजारपेठ आणि तालुक्याचे ठिकाण देवगड
जवळील बाजारपेठ : पडेल कॅन्टीन , तालुका:देवगड
जवळील रेल्वे स्थानक : कणकवली रेल्वे स्थानक ८० किमी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ७५ किमी.
ग्रामदैवत: रामेश्वर मंदिर, विजयदुर्ग


== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==

१५:३८, १० नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

विजयदुर्ग (किल्ला)

विजयदुर्ग (किल्ला)
गुणक 16°33′39″N 73°20′00″E / 16.5607°N 73.3334°E / 16.5607; 73.3334
नाव विजयदुर्ग (किल्ला)
उंची 100
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण देवगड , महाराष्ट्र
जवळचे गाव विजयदुर्ग
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना ११९३


विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.

इतिहास

विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५० मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.[१] कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. [२] १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

विजयदुर्गला पोहचायचे कसे:

विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे

Good

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक १३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ अक्कलकोट,२००९ पृ. ३५०.
  2. ^ अक्कलकोट,२००९ पृ. ३५०-३५१.
  3. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html. २२ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भसूची