"महेश कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''महेश कोठारे''' ([[सप्टेंबर २८]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेते]] आहेत.त्याबरोबर ते [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता]] आहेत.
'''महेश कोठारे''' ([[सप्टेंबर २८]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेते]] आहेत. त्याबरोबर ते [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता]] आहेत.


== जीवन ==
== जीवन ==

१४:०२, ९ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

महेश कोठारे
जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९५७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट
बॉलीवूड
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८५ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट धूमधडाका
दे दणा दण
थरथराट
धडाकेबाज
झपाटलेला,
झपाटलेला २
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार
वडील अंबर कोठारे
अपत्ये आदिनाथ कोठारे
अधिकृत संकेतस्थळ http://maheshkothare.blogspot.com

महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.

जीवन

महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत[१]. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले [ संदर्भ हवा ].

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

कारकीर्द

महेश कोठारे अभिनीत चित्रपट

महेश कोठारे यांनी पुढील चित्रपटांत अभिनय केलेला आहे.

वर्ष शीर्षक शेरा
2010 आयडियाची कल्पना
2000 खतरनाक
2005 खबरदार Guest Appearance
1983 गुपचुप गुपचुप Ashok
1971 घर घर की कहानी
घरचा भेदी
1964 छोटा जवान
2007 जबरदस्त
1992 जिवलगा
1993 झपाटलेला CID Inspector Mahesh Jadhav
2013 झपाटलेला २[२] CID Inspector Mahesh Jadhav
1989 थरथराट CID Inspector Mahesh Jadhav
थोरली जाऊ
2011 दुभंग[३]
1987 दे दणादण Sub Inspector Mahesh Danke
1990 धडाकेबाज Mahesh Nemade
1998 धांगडधिंगा Advocate Mithare
1985 धूमधडाका Mahesh Jawalkar
2004 पछाडलेला Inspector Mahesh Jadhav
2008 फुल ३ धमाल
1994 माझा छकुला Inspector
1996 मासूम Hindi Movie
1968 राजा और रंक
लेक चालली सासरला
2010 वेड लावी जीवा
2006 शुभमंगल सावधान
1970 सफर Feroz Khan's Younger Brother

दिग्दर्शित

वर्ष नाव
२००० खतरनाक
२००५ खबरदार
२००३ चिमणी पाखरं'
२००८ जबरदस्त
१९९१ जिवलगा
१९९३ झपाटलेला
२०१३ झपाटलेला २
१९८९ थरथराट
२०११ दुभंग
१९८७ दे दणादण
१९९० धडाकेबाज
१९९८ धांगडधिंगा
१९८५ धूमधडाका
२००४ पछाडलेला
१९९४ माझा छकुला
१९९६ मासूम (चित्रपट)
१९९९ लो मै आ गया
२०१० वेड लावी जीवा
२००७ शुभमंगल सावधान

महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट

चित्रपट

महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट

  • वेड लावी जीवा
  • फुल ३ धमाल

महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट

<

दूरचित्रवाणी

  • मस्त मस्त है जिंदगी (झी टीव्ही)
  • मन उधाण वार्‍याचे (स्टार प्रवाह)

बाह्य दुवे

  1. ^ पेंढारकर, अभिजीत (2014). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. प्रत्यक्ष मुलाखत.
  2. ^ Mahesh Kothare returns with Zapatlela 2
  3. ^ Dubhang