"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खरी माहिती लोकांना समजावी या साठी मी हे लिहिलं आहे
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांच्या मालिकेला “लेण्याद्री” म्हणून संबोधले जाते. जुन्नरच्या परिसरात मानमोडी गुफा, शिवनेरी गुफा अाणि तुळजा गुफा अशा काही लेणी अाहेत.
हे कोणतेही गणपती चे मंदिर नाही
ह्या लेणी इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकातील अाहेत. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या अनुक्रमानुसार सातव्या गुफेत गणपती मंदिर आहे. ही गुफा हा मुळात एक बौद्ध विहार असून तिच्या मंदिर-रुपांतरणाचा निश्चित कालावधी उपलब्ध नाही.
लेण्याद्री हे खरं तर गौतम बुद्ध च्या काळातल्या आहेत, त्या बुद्ध लेण्या आहेत, तिथे प्राचीन काळात बुद्ध भिक्षुक मेडिटेशन करत होते, पण ब्रह्मन् लोकांनी आपल्या प्राचीन भारताचा इतिहास पुसून टाकून तिथं गणपती च मंदिर केलं, ज्या मुळे हिंदू लोक तिथं येतात, पण खर तर त्या बुद्ध लेण्या आहेत, हे खाली जे काही लिहिलं आहे ते सगळं चुकीचं आहे याची नोंद घ्यावी




अष्टविनायक
अष्टविनायक

२१:४०, ९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांच्या मालिकेला “लेण्याद्री” म्हणून संबोधले जाते. जुन्नरच्या परिसरात मानमोडी गुफा, शिवनेरी गुफा अाणि तुळजा गुफा अशा काही लेणी अाहेत. ह्या लेणी इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकातील अाहेत. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या अनुक्रमानुसार सातव्या गुफेत गणपती मंदिर आहे. ही गुफा हा मुळात एक बौद्ध विहार असून तिच्या मंदिर-रुपांतरणाचा निश्चित कालावधी उपलब्ध नाही.

अष्टविनायक गणपती सहावा

श्री क्षेत्र लेण्याद्रि

श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकातील एकमेव गणपतीचे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे. लेण्याद्री बाबतची प्राचीन आख्यायिका अशी सांगितली जाते की, पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी लेण्याद्री येथील लेणी एका रात्रीत कोरली. येथे पुर्व ते पश्चिम एकुण २८ लेणी आहेत. श्री. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर सातव्या लेण्यामध्ये आहे. या लेणीमध्ये पार्वती मातेने बारा वर्षे पुत्र प्राप्तीसाठी तपश्‍चर्या केली. या बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर श्री गणेशजी स्वयंभू प्रकट झाले.

गिरीजा म्हणजेच माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा, म्हणून या गणरायाचे नांव श्री गिरीजात्मज असे पडले असावे. या डोंगराला पुर्णतः लेणी असल्याने लेण्याद्री असे संबोधले जाते. असा हा लेण्याद्रीचा गिरीजात्मज. लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे.

या मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत. तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे कुंड आहे. त्यामध्ये वर्षभर पाणी राहते. वैशिष्टय म्हणजे साचलेले पाणी असुनही अतिशय स्वच्छ व निसर्गतः थंडगार पाणी या कुंडामध्ये बाराही महिने असते. हे थंडगार पाणी प्यायल्यानंतर भक्तगण तृप्त होतात. त्यामुळे लेण्याद्रीच्या ३३८ पायऱ्याचढुन गेल्यानंतरही भाविक भक्तांचा थकवा नाहिसा होतो.

श्री गिरीजात्मज गणेश मंदिरातील प्रवेशद्वारासमोर मोठे कोरीव खांब आहेत, त्यावर हत्ती, घोडे, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. तसेच इतर लेण्यांच्या प्रवेश द्वारासमोर ही कोरीव खांब आहेत. श्री गणपतीच्या गाभार्‍यासमोरील सभामंडपात एकुण १८ गुहा आहेत. या सर्व गुहा ७x१०x१० फुट लांब रूंद असून या सर्व गुहांमध्ये पुर्वी ऋषीमुनींनी तपःसाधना केल्याचे सांगितले जाते. श्री गणेेश मंदिराशेजारील ६ व्या आणि १४ व्या लेणीमध्ये बौद्धस्तूप कोरलेले आहेत. या स्तुपास गोलघुमट या नावांनेही संबोधले जाते. या लेणीचा आकार आतल्याबाजुने वर्तुळाकार कोरीव काम केलेले आहे. या गोलाकारामुळे या लेणीमध्ये आवाजाचा प्रतिध्वनी ऐकु येतो. स्तुपाच्या सभोवताली आकर्षंक कोरीव खांब आहेत.

पुर्वी या गणपतीची पूजा पाठीवर होते असा समज होता परंतु असे काही नसून पुर्वी प्रत्येक भाविक स्वहस्ते पुजा करून शेंदूर व तेल मुर्तीला लावत असे. त्यामुळे तो आकार बदलला कालांतराने हे शेंदूराचे थर आपोआप पडले व मुर्ती पुर्वीप्रमाणे पुन्हा दिसू लागली. म्हणजेच ही मुर्ती पाठमोरी नाही. येथील गणेशमुर्तीच्या डोळ्यांमध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे. गणपती मंदिरा बाहेरील कुंडात बाराही महिने थंड पाणी असते.

तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे मोठे कुंड आहे. प्रत्येक लेण्यापर्यंत पोहोचेणे वाटेअभावी भाविकांना अवघड पडते.

आख्यायिका

पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नाव मिळाले.

स्वरूप

गिरिजात्मज (लेण्याद्री)
गिरिजात्मज (लेण्याद्री)गुहा

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.

सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाहीत. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.

या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते. पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून लेण्याद्री येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

  • http://www.marathimati.com/balmitra/stories/ganpati-stories/girijatmak-ganesh-sthapana/. Missing or empty |title= (सहाय्य)
अष्टविनायक
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती