"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
* चेस |
* चेस |
||
* डायरीची दहा पाने |
* डायरीची दहा पाने |
||
⚫ | |||
* पाऊस आता थांबलाय |
* पाऊस आता थांबलाय |
||
* मंथन |
* मंथन |
||
ओळ ५३: | ओळ ५४: | ||
* शोध अंधार अंधार |
* शोध अंधार अंधार |
||
* क्षितिज (एकांकिका) |
* क्षितिज (एकांकिका) |
||
⚫ | |||
==अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके== |
==अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके== |
१८:२०, ८ जुलै २०१९ ची आवृत्ती
अतुल पेठे | |
---|---|
जन्म | अतुल पेठे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
अतुल सदाशिव पेठे (१४ जुलै, इ.स. १९६४ - ) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्यअभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.
विशेष
लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशी अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. ज्या नाटक करायला अवघड होते, अशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्यांतून नवे रंगकर्मी तयार झाले. आशयघन नाटके हा त्यांचा विशेष आहे.
नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत.
- ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील नट नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले.
- ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचं नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
- कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजारच्या आसपास प्रयोग झाले.
अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके
- अंक दुसरा
- अवशेष
- आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य)
- आविष्कार
- गाणे गुलमोहोराचे
- दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य)
- चेस
- डायरीची दहा पाने
- दलपतसिंग येती गावा (सहलेखक)
- पाऊस आता थांबलाय
- मंथन
- यात्रा
- शीतयुद्ध सदानंद (श्याम मनोहरांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर)
- शोध अंधार अंधार
- क्षितिज (एकांकिका)
अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके
- अतिरेकी
- घाशीराम कोतवाल
- चेस (एकांकिका)
- पडघम
- प्रलय
- प्रेमाची गोष्ट ?
- मी जिंकलो मी हरलो
- ठोंब्या
- गोळायुग
- सूर्य पाहिलेला माणूस
- वेटिंग फॉर गोदो
- शीतयुद्ध सदानंद
- सापत्नेकराचे मूल
- सूर्य पाहिलेला माणूस
- क्षितिज
- समाजस्वास्थ्य
- किमया (अभिवाचन)
- तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य
- परवा आमचा पोपट वारला
- रेड रेबिट व्हाईट रेबिट
अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
- आनंदओवरी
- आषाढातील एक दिवस
- उजळल्या दिशा
- ऐस पैस सोयीने बैस
- गोळायुग
- चेस
- चौक (सहदिग्दर्शक - मकरंद साठे)
- टॅक्स फ्री
- डायरीची दहा पाने
- तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य (अभिवाचन)
- दलपतसिंग येती गावा
- परवा आमचा पोपट वारला (अभिवाचन)
- प्रेमाची गोष्ट ?
- प्रोटेस्ट
- बसस्टॉप
- मामका पांडवाश्चैव
- मी ... माझ्याशी
- वळण
- वेटिंग फॉर गोदो
- सत्यशोधक
- सत्यशोधक (कन्नड)
- समाजस्वास्थ्य
- सूर्य पाहिलेला माणूस
- शीतयुद्ध सदानंद
- क्षितिज
- किमया (अभिवाचन)
अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट
- कथा दोन गणपतरावांची
- कलाकार
- म्हादू
- यकीन मानो
आत्मचरित्रवजा आठवणी आणि अन्य लेखन
- चेस आणि इतर एकांकिका
- नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)
- रिंगणनाट्य (सहलेखक : राजू इनामदार)
अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार
- पुरुषोत्तम करंडक - केशवराव दाते अभिनय नैपुण्य पुरस्कार
- पुरुषोत्तम करंडक - गो.गं. पारखी लेखन पुरकार
- नाट्यदर्पण - अरविंद देशपांडे दिग्दर्शन पुरस्कार - शीतयुद्ध सदानंद
- रंगदर्पण पुरस्कार, गजानन सरपोतदार
- महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक आणि संगीत - उजळल्या दिशा
- सत्यशोधक पुरस्कार - पुणे म न पा कामगार युनियन
- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार
- महाराष्ट्र फौंडेशनचा नाट्य गौरव पुरस्कार
- मुंबई मराठी साहित्य संघाचा के. नारायण काळे पुरस्कार
- मो.ग. रांगणेकर पुरस्कार
- पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार
- चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार
- कोपर्डेकर पुरस्कार, सातारा
- बिष्णू बसू सन्मान, कोलकत्ता
- 'सूर्य पाहिलेला माणूस'ला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१७
- अस्मि कृतज्ञता सन्मान २०१८
- 'समाजस्वास्थ्य'नाटकातील भूमिकेकरता महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार २०१८
- 'तन्वीर सन्मान २०१८' - डॉ.श्रीराम लागू यांच्या 'रुपवेध' तर्फे मानाचा सन्मान