"कादंबरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Neha Gaude (चर्चा)यांची आवृत्ती 1663373 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
साधारणत: अधिक लांबीच्या [काल्पनिक] कथा असलेल्या गद्य लेखन त्याला कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी [[मराठी साहित्य|मराठी साहित्याचा]] ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.
साधारणत: अधिक लांबीच्या [काल्पनिक] कथा असलेल्या[[गद्य]] [[लेखन]]ास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी [[मराठी साहित्य|मराठी साहित्याचा]] ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.


शुकनासोपदेश भाग कादंबरीच्या भागात आला असून अमात्य शुकनासाने राजपुत्र चंद्रापीडाला केलेला उपदेशाचे वर्णन आले आहे.
शुकनासोपदेश भाग कादंबरीच्या भागात आला असून अमात्य शुकनासाने राजपुत्र चंद्रापीडाला केलेला उपदेशाचे वर्णन आले आहे.

२०:४५, १ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

साधारणत: अधिक लांबीच्या [काल्पनिक] कथा असलेल्यागद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

शुकनासोपदेश भाग कादंबरीच्या भागात आला असून अमात्य शुकनासाने राजपुत्र चंद्रापीडाला केलेला उपदेशाचे वर्णन आले आहे. शुकनास म्हणतो- जे अत्यंत निष्ठुर उपदेश करणाप्या कौटिल्याच्या शास्त्राला प्रमाण मानतात त्यांच्याबद्दल काय सांगावे? अत्यंत कुटिल व कष्टकारक अशा हजारो भयंकर व्यवहारांनी बनलेल्या राजनीतीच्या बाबतीत, अत्यंत मोहाच्या अंधाराने भरलेल्या या तारुण्यात तुम्ही असे वागण्याचा प्रयत्न करा की लोक तुमचा उपहास करणार नाहीत, सज्जन निंदणार नाहीत, गुरू वडिलधारी मंडली धिक्कार करणार नाहीत, मित्र छेडणार नाहीत, विद्वान शोक करणार नाहीत, छटेल बनेल लोक हसणार नाहीत, सेवकरूपी लांडगे तुम्हाला लुबाडणार नाहीत, धूर्त फसवू शकणार नाहीत, स्त्रिया भुरळ घालू शकणार नाहीत, मद नाचवणार नाही, कामदेव उन्मत्त करणार नाही, रागविकार ओढवणार नाही, आणि सुख सोडणार नाही.

मनुष्य कितीही विद्वान असला, सावध असला, प्रयत्न करणारा असला तरी त्यालाही ??? बिघडवते. वडिलांनी केलेल्या तुमच्या यौवराज्याभिषेकाच्या मंगल समारंभाचा समग्र कल्याणानिशी अनुभव घ्या. कुलपरंपरेप्रमाणे पूर्वजांनी वाहिलेली राज्याची धुरा नीट वाहून न्या, शत्रूंची शिरे नमवा, बंधुजनांना वर न्या, पराक्रम गाजवण्याची तुमची ही वेळ आहे. त्रैलोक्यदर्शी सिद्धपुरुषाचा आदेश खरा होतो त्याप्रमाणेच ज्याचा प्रताप प्रस्थापित झाला आहे अशा राजाचे आदेश, त्याच्या आज्ञाच सिद्ध होतात. एवढे बोलून शुकनास गप्प बसला. कादंबरी म्हणजे मोठ्या कथानक असलेल्या. कादंबरीचे प्रकार 1 काल्पनिक 2 प्रेम 3 सामाजिक ४ पौराणिक ५ ऐतिहासिक

कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणाऱ्या करार, काळ,आवाज हे पैलु लक्षात घ्यावे लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणाऱ्या या जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लँगरच्या ‘काळ’ या संकल्पनेनुसार प्रतिभाषिक(?) भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरुपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत अस्तोसतो. म्हणजे टी. रास इलियट च्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी

लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला. व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.

कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हटले. 'काळा सूर' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झाले.

डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.

जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूह जीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..

मराठी कादंबरीचा इतिहास

  • पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
  • पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक विनायक कोंडदेव ओक
  • पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (.इ.स. १८९३), लेखक हरी नारायण आपटे

सध्याची मराठी कादंबरी

जागतिकीकरणाच्या काळात कादंबरी हा महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील कादंबरी

१. कसे दिवस जातील (न. वि. कुलकर्णी) : यांचा खेडूत सृष्टीचे कादंबरीकर म्हणून गौरव झाला आहे.
त्यांची "मजूर"(१९२५) ही कामगार जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.
२. माकडीची माळ (अण्णा भाऊ साठे) : या कादंबरीत उपेक्षितांच्या जीवनातील वास्तव्य शब्दबद्ध केले आहे.

समीक्षण

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार

प्रसिद्ध कादंबऱ्या

  1. अमृतवेल (कादंबरी)
  2. आनंदी गोपाळ
  3. आमदार सौभाग्यवती
  4. काळोखातील अग्निशिखा
  5. कोसला
  6. जरिला
  7. झाडाझडती
  8. झोपडपट्टी
  9. झेप
  10. तांबडफुटी
  11. दुनियादारी
  12. पाचोळा
  13. पानिपत
  14. पार्टनर
  15. पोखरण
  16. फकिरा
  17. बनगरवाडी
  18. महानायक
  19. मृत्युंजय
  20. ययाति
  21. रणांगण
  22. राऊ
  23. व्यासपर्व
  24. शूद्र्
  25. श्रीमान योगी
  26. संभाजी
  27. सूड
  28. स्वामी
  29. ही वाट एकटीची