"गणपत लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎तुफानी दल: Information was incomplete. Original swatantrya senani was missing. Mr. Akaram dada Pawar was the main activist against British in this region. Which please be noted.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४: ओळ २४:
{{DEFAULTSORT:लाड, जी.डी.}}
{{DEFAULTSORT:लाड, जी.डी.}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]]

१५:४०, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

क्रांतिअग्रणी[ दुजोरा हवा] गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.[ संदर्भ हवा ]

इतिहास

त्यांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यासाठी त्यांनी पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून दिले. तासगांव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनासाठी लागणारा खर्च व हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली व धुळेयेथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते.

तुफानी दल

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्य वीर आकाराम (दादा) पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकार्‍यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणार्‍या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्‌मैल चालले.

बापूंना आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार यांना पकडण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर केले होये, पण ते शेवटपर्यंत सापडलेच नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर

कष्टकर्‍यांसाठी, जी.डी. बापू यांनी हाच कष्टदायक प्रवास स्वातंत्र्यानंतर सुरू ठेवला.

कष्टकरी, दलित,कामगार, शेतकरी यांच्या लढ्यात सदैव अग्रभागी राहिलेल्या जीडी (बापू) यांचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार राहिला. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे बरीच वर्षे काम केले. कष्टकरी, दलित, आदिवासींचे अनेक लढे ते आयुष्यभर लढले. शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधातही ते रस्त्यावर आले.

पुस्तक

  • पेटलेले पारतंत्र्य व धुमसते स्वातंत्र्य (जी.डी बापू यांचे आत्मचरित्र, प्रकाशन - ९-८-१९८६)
  • लाड फाऊंडेशनतर्फे जी.डी. लाड यांच्या चरित्रावर प्रकाशझोत टाकणार्‍या "जी.डी. बापू लाड आत्मकथन : एक संघर्ष यात्रा‘ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर येथे १७ मे २०१५ रोजी झाले. मुलांसाठी जी.डी. लाड यांच्या विषयी अनेक छोटी छोटी पुस्तके प्रकाशित करण्याचा लाड प्ररातिष्ठानचा मनोदय आहे.

सन्मान

  • कोल्हापूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात क्रांतिअग्रणी जी. डी. लाड (बापू) यांना सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. (१२-३-२०११),
  • लाड फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतिअग्रणी पुरस्कार दिला जातो. २०१४ सालचा पुरस्कार डॉ. आ.ह. साळुंखे यांना दिला गेला. २०१० साली हा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना, तर २०१२ साली बाबा आढाव यांना प्रदान झाला होता.