"होमिओपॅथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १२८: ओळ १२८:
==भारतातील होमिओपॅथीचे शिक्षण==
==भारतातील होमिओपॅथीचे शिक्षण==
* बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसीन ॲन्ड सर्जरी
* बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसीन ॲन्ड सर्जरी
* डॉक्टर ऑफ मेडिसिन (होमिओपॅथी)
[[चित्र:Rep1.JPG|केन्ट या लेखकाची होमिओपॅथी रेपरटरी | thumb]]
[[चित्र:Rep1.JPG|केन्ट या लेखकाची होमिओपॅथी रेपरटरी | thumb]]



१९:५७, १३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.

होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.

डॉ. सामुएल ख्रिस्तिआन हानेमान

होमिओपॅथीमध्ये सर्व अाजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक मिथ्या-विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी ऑषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात. [१][२][३]

औषध

होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णत: मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते. [४]

होमिओपॅथीची उत्पत्ति

सामुएल हानेमान यांनी त्याकाळातील सर्व वैद्यक ग्रंथ वाचून पाहिले. पण त्यात त्यांच्या मनास समाधानकारक योग्य तत्व आणि रीत दिसली नाही त्यामुळे त्या जुन्या विषारी औषधी प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास नाहीसा साला आणि ते नवीन तत्वाच्या शोधास लागले. डॉक्टर कल्लेनच्या (औषधीगुणदर्शन) मटिरिआ मेडिकेचे जर्मन भाषांतर करीत असताना सिंकोना झाडाच्या सालीच्या गुणधर्माबद्दल त्यांनी लिहीलेले सामुएल हानेमान च्या लक्षात आले. कल्लेनने तिथे असे लिहिलेले आहे की ‘सिकोनाच्या सालीने हिमज्वर बरा होतो खरा, पण चांगल्या प्रकृतीच्या, ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल फार खाल्ल्यास त्यास हिमज्वरासारखा ताप येतो'. हे पाहुन सामुएल हानेमान यांनी ह्याचा अनुभव घेऊन मनाची खात्री करुन घेण्याचे ठरविले. आणि सिंकोनाची साल खाऊन स्वतःवरच अनुभव घेतला. तेव्हा त्यास हिमज्वर सारखा ताप आलाच. इतक्यानेही पूर्ण खात्री न होता त्यांनी मागाहून आणखी स्वतःवर आपल्यावर आणि तसेच त्यांच्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन खात्री झाल्यावर अॅकोनिटम्, बेल्लाडोना, नक्सव्होमिका, आर्सेनिकम्, मयुरी, सल्फर इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन तीच औषधे सूक्ष्म प्रमाणांत रोग्यास देऊन चांगला गुण आलेला पाहून मनाची खात्री करुन १७९० साली होमिओपथिक तत्वाची प्रसिद्धी केली.

इतिहास

हिपोक्रटीज (Hippocrates) याने साधारणत: ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये वेडेपणाच्या झटक्यावर उपचार म्हणून मॅन्ड्रेक या विषारी वनस्पतीच्या मूळाचा छोटासा अंश रूग्णाला दिल्याचा उल्लेख आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास निरोगी माणसाला यामुळे वेडाचे झटके येतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे होमिओपॅथीची सुरुवात हिपोक्रटीज (Hippocrates) याने केली असण्याची शक्यता आहे असे होमिओपॅथीच्या समर्थकांचे मत आहे.[५] सोळाव्या शतकात पॅरासेलस याने असे घोषित केले की "ज्यामुळे माणसाला आजार होतो तीच गोष्ट माणसाला बरे करते".[६] सामुएल हानेमान याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होमिओपॅथी हे नाव दिले आणि होमिओपॅथीची तत्त्वे निश्चित केली.

होमिओपॅथी वैद्यकपद्धती प्रमाणे असलेली तिची मूलतत्वे प्राणिमात्राचे शरीर रोगग्रस्त झाल्यावेळी त्या रोगाच्या लक्षणासांरखी लक्षणे उत्पन्न करणारे द्रव्य (फार सूक्ष्म प्रमाणाने) देऊन त्या रोगाचे उपशमन करण्याच्या चिकित्सापद्धतीस जर्मनीतील डॉक्टर हानेमान यांनी होमिओस म्हणजे (Homoios) सम, या ग्रीक शब्दावरुन होमिओपाथी असे नाव दिले आहे. ते म्हणतात-"पक्षघात झाल्या वेळी स्ट्रिक्निन् देणे; पोटशूलवर कोलोसिंथ देणे, ओकारी येत असता अॅन्टिमनी देणे व दमा झाल्यावेळी इपेकाकुन्हा देणे. समलक्षण चिकित्सानुसार म्हणजे होमिओपाथिक तत्वावर आहे. कारण निरोगी माणसात ही औषधे त्या रोग्यांच्या लक्षणासारखी लक्षणे उत्पन्न करतात. तसेच तहान लागत असताना मिठाचे अणु देणे, उचकी किंवा जळजळवर मिर्ची सूक्ष्म प्रमाणात देणे. सर्दीमुळे किंवा इन्फ्लुएन्झामुळे डोळ्यातून अश्रु व नाकातून पातळ स्त्राव येत असल्यास कांद्यापासून तयार केलेला काढ़ा देणे, पित्तप्रकोपामुळे आंबट ढेकर येत असता किंवा तोंडांत आंबट किंवा कडवट चव वाटत असल्यास लिंबाचे सरबत घेणे ही होमिओपाथिक तत्वावरच आहे".

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकात प्रचलित वैद्यकशास्त्र हे शरिरातील काही रक्त काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासारख्या भयानक पद्धती वापरत असे. त्याचप्रमाणे त्यांमधील औषधे अनेकविध गोष्टींची मिश्रणे असत. उदाहरणार्थ, व्हेनिस ट्रिॲकल या औषधामध्ये अफू, लाख आणि घोणस सापाचे मांस अशा ६४ विविध गोष्टी असत.[७] [८] अशा उपचारांमुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी जास्तच बिघडत असे आणि बर्‍याचदा यामध्ये रुग्ण दगावत असे. [९][१०] हानेमनने अशा पूर्वापार चालत आलेल्या [११] प्रथांचा विरोध केला आणि त्यांना अतार्किक म्हणून संबोधले. [१२] याऐवजी त्याने सर्व रोगांवर एकच औषध कमी प्रमाणात दिले जावे असा सल्ला दिला. रोगांमागे भौतिक कारणांप्रमाणेच आत्मिक कारणे असतात असा त्याचा यामागे विश्वास होता. [१३]

स्वरूप

होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणार्‍या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.

नियम

  • सारखेपणाचा कायदा
  • एका वेळी एकच औषध, मिश्रण नाही, हा कायदा
  • जितका रोग जुना आणि गंभीर जितकी औषधाची मात्रा कमी, हा कायदा.
  • औषधे सिद्ध करण्याची खास रीत
  • रोगांचे चिरकालीन सिद्धान्त
  • आंतरिक शक्तीचा सिद्धान्त
  • औषधांच्या गतिशीलतेचा कायदा

तत्त्वे

  • काट्याने काटा काढणे या तत्त्वाप्रमाणे रुग्णाला ज्या प्रकारचा त्रास होतो आहे त्याच आजारांचे अंश थोड्या प्रमाणात रोग्याच्या शरीरात सोडून त्याची प्रतिकारशक्ती वाढवता येते आणि यामुळे रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता येते.
  • सूक्ष्म औषध देऊन जास्त परिणाम साधला जातो.
  • प्रत्येक व्यक्ती वेगळी असते व त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या उपचाराची गरज असते, या तत्त्वावर उपचार केला जातो.
होमियोपॅथी औषधाच्या गोळ्या

संशोधन

मटेरिया मेडिका

बाराक्षार पद्धती

विरलनाची पद्धत

होमिओपॅथीचे औषध किती पट विरल आहे हे दाखवणार्‍या संख्येला त्या औषधाची पोटेन्सी म्हणजे परिणामकारकता म्हणतात. ही परिणामकारकता X, D, C, किंवा M या परिमाणांमध्ये मोजतात. या परिमाणांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत

  • X आणि D ही परिमाणे १० च्या पटीतील विरलन दाखवतात
  • C हे परिमाण १०० च्या पटीतील विरलन दाखवते
  • M हे परिमाण १००० च्या पटीतील विरलन दाखवते

या परिमाणांच्या रूपांतरणाची सूत्रे खालील प्रमाणे आहेत, १C = २X = २D १M = १०००C

तुलना

विरलनाची भौतिक मर्यादा

कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दाखवणारा लहानात लहान एकक रेणू हा असतो. रेणूंचा आकार हा परिमित असल्यामुळे, मूलद्रव्याचे गुणधर्म कायम ठेवून त्याचे ॲव्होगॅड्रो संख्येनुसार एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरलन करता येत नाही.

पाण्याच्या शुद्धतेची मानवी मर्यादा

मानवाला आत्तापर्यंत तयार करता आलेले सर्वात शुद्ध पाणी, आय.एस.ओ. ३६९६ या नामांकनाने ओळखले जाते. या पाण्यामध्ये असणार्‍या अशुद्धतेचे प्रमाण एकास दहा अब्ज म्हणजेच साधारण ४C एवढे असते.

आक्षेप

होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथीसुद्धा रासायनिक प्रयोगांद्वारे आपल्या औषधांमध्ये मूळ औषधी घटकांच्या अस्तित्वाचा अंश असल्याचे सिद्ध करू शकलेली नाही, यामुळे ही औषधे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ (औषधी तत्त्व नसलेल्या औषधांचा परिणाम) करणारी औषधे आहेत, असा यावर आक्षेप घेतला जातो. होमिओपॅथी सिद्ध करण्याऱ्या व्यक्तीस दोन दोन नोबेल पुरस्कार मिळतील असे म्हटले जाते. एक वैद्यकशास्त्रातील आणि दुसरा पदार्थ विज्ञानातील.

आक्षेपांना उत्तर देण्याचे प्रयत्‍न

होमिओपॅथीच्या विरलन पद्धतीवर घेतल्या जाणार्‍या आक्षेपांना उत्तरे देण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्‍न आत्तापर्यंत झालेले आहेत. असे काही प्रयोग -

  • बेनेव्हिस्टाचा पाण्याच्या स्मरणशक्तीचा प्रयोग
  • ल्यूक मॉन्टेनियरचा प्रयोग

निष्कर्ष

  • बेनेव्हिस्टाचा प्रयोग पुन्हा करता आला नाही
  • ल्यूक मॉन्टेनियरचे निष्कर्ष अतिषय मर्यादित परिस्थितीमध्ये लागू पडतात

विविध देशांतील कायदे

अमेरिकेत विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.

युरोपात -

स्वित्झर्लँड वगळता = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे

स्वित्झर्लँड = विक्रीपूर्व पडताळणीची शिथील अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे

रशिया =

आशिया

भारत = विक्रीपूर्व पडताळणीची अट नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता आहे, विमासंरक्षणाबाबत एकच नियम नाही.

इतर देश =

ऑस्ट्रेलिया = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही

सांस्कृतिक संदर्भ

होमिओपॅथी उपचार पद्धतीवर प्रतिसाद नावाचा मराठी चित्रपट निघाला आहे.

भारतातील होमिओपॅथीचे शिक्षण

  • बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसीन ॲन्ड सर्जरी
  • डॉक्टर ऑफ मेडिसिन (होमिओपॅथी)
केन्ट या लेखकाची होमिओपॅथी रेपरटरी

भारतातील होमिओपॅथी संस्था

  • होमिओपॅथी परिषद
  • असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी
  • होमिओपॅथीक एज्युकेशन ॲन्ड रिसर्च असोसिएशन (Homeopathic Education & Research Association) - मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

इस्पितळे

  • रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल

प्रशिक्षण

  • ऑस्ट्रेलिया - होमिओपॅथी कॉलेज सिडनी
  • ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ नॅचरल थेरपीज
  • कॅनडा - होमिओपॅथिक कॉलेज ऑफ कॅनडा
  • इंग्लंड - सेंटर फॉर होमिओपॅथिक एज्युकेशन इंग्लंड
  • अमेरिका - अमेरिकन मेडिकल कॉलेज ऑफ होमिओपॅथी अमेरिकेची संयुक्त संस्थाने
  • जर्मनी - डीट्रिश बेर्न्ट इन्स्टिटुट झुर फ्योर्डेरुंग देर होम्योआपाथी (Dietrich-Berndt-Institut zur Förderung der Homöopathie) जर्मनी

होमिओपॅथीचे शिक्षण देणार्‍या महाराष्ट्रातील संस्था

  • पं. जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल सायन्स, अमरावती
  • अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर
  • दिशा शिक्षण विकास केंद्र यांचे ई.बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
  • अंतरा भारती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, नागपूर
  • अण्णासाहेब कानसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, पुणे
  • धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, पुणे
  • येरला मेडिकल ट्रस्ट होमिओपॅथी कॉलेज, करी रोड मुंबई
  • विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस, वीर सावरकर मार्ग, विरार, मुंबई
  • श्रीमती चंदाबेन एम. पटेल होमिओपॅथी कॉलेज, विलेपार्ले, [[मुंबई)
  • दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दापोली, रत्‍नागिरी
  • पी.एस.पी.एम. महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सोलापूर

हेही पाहा


संदर्भ

  1. ^ Ernst, E. (2002). British Journal of Clinical Pharmacology. 54 (6): 577–82. doi:10.1046/j.1365-2125.2002.01699.x. PMC 1874503. PMID 12492603 //www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1874503. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Shang, Aijing; Huwiler-Müntener, Karin; Nartey, Linda; Jüni, Peter; Dörig, Stephan; Sterne, Jonathan AC; Pewsner, Daniel; Egger, Matthias (2005), The Lancet, 366 (9487): 726–732, doi:10.1016/S0140-6736(05)67177-2, PMID 16125589 Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ , British House of Commons Science and Technology Committee, 22 February 2010 http://www.publications.parliament.uk/pa/cm200910/cmselect/cmsctech/45/4504.htm, 2014-04-05 रोजी पाहिले Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Complementary and Alternative Medicine, Creighton University Department of Pharmacology https://web.archive.org/web/20020826082134/http://altmed.creighton.edu/Homeopathy/philosophy/dilution.htm, archived from the original on 2002-08-26, 2009-03-24 रोजी पाहिले Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Hemenway, Henry Bixby (1894), JAMA: the Journal of the American Medical Association (11): 367, doi:10.1001/jama.1894.02420900001001 Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Britannica Online Encyclopedia, Encyclopædia Britannica http://www.britannica.com/EBchecked/topic/442424/Paracelsus, 2009-03-24 रोजी पाहिले Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^
  8. ^ *Griffin, J. P. (2004), British Journal of Clinical Pharmacology, 58 (3): 317–25, doi:10.1111/j.1365-2125.2004.02147.x, PMC 1884566, PMID 15327592 Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ BMJ, 1 (533): 283–4, 1871, doi:10.1136/bmj.1.533.283 Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Kaufman M (1971), The Johns Hopkins University Press, ISBN 978-0-8018-1238-5 Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ Edzard Ernst; Singh, Simon (2008), New York: W. W. Norton, ISBN 0-393-06661-4 Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  12. ^ Lasagna L (1970) [1962], New York: Collier Books, p. 33, ISBN 978-0-8369-1669-0 Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ W. Steven Pray (1 August 2003). Psychology Press. p. 192. ISBN 978-0-7890-1538-9 http://books.google.com/books?id=uadgq04eLr0C&pg=PA192. 21 January 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे