"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''रवींद्र जैन''' ([[२१ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४]]:[[अलीगड]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - [[९ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५]]):[[मुंबई]], [[महाराष्ट्र]] हे एक गीतकार, गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.
'''रवींद्र जैन''' ([[२१ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४]]:[[अलीगड]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - [[९ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५]]):[[मुंबई]], [[महाराष्ट्र]] हे एक गीतकार, गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.



१९:१०, १३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती


रवींद्र जैन (२१ फेब्रुवारी, इ.स. १९४४:अलीगड, उत्तर प्रदेश, भारत - ९ ऑक्टोबर, इ.स. २०१५):मुंबई, महाराष्ट्र हे एक गीतकार, गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.

अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच 'कान' होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पं‌डित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.

चित्रपट संगीताची कारकीर्द

ऑल इंडिया रेडिओ'साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. १९७२ मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला 'काँच और हिरा' या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.

१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी ‌संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.

प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले,

रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे.

रवींद्र जैन यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट

  • आँखियोंके झरोके से
  • एक विवाह ऐसा भी था
  • काँच और हीरा
  • गीत गाता चल
  • चितचोर
  • चोर मचाये शोर
  • तपस्या
  • दुल्हन वही जो पिया मन भाये
  • दो जासूस
  • नदियाँ के पार
  • पति, पत्‍नी और वो
  • फकिरा
  • बारोमास (चित्रपट)
  • राम तेरी गंगा मैली
  • विवाह
  • सौदागर
  • हीना

रवींद्र जैन यांचे संगीत असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अलीफ लैला
  • इतिहास की प्रेरम कहानियाँ
  • जय गंगा मैय्या
  • राजा हरिश्चंद्र
  • रामायण
  • लवकुश
  • श्रीकृष्ण
  • साई बाबा


रवींद्र जैन यांचे संगीत असलेली काही प्रसिद्ध गाणी

  • अखियोंके झरोके से (चित्रपट - अखियोंके झरोके से)
  • आज से पहले आज से जादा
  • गंगासागर
  • गीत गाता चल
  • गोपालकृष्ण
  • गोरी तेरा गाँव बडा प्यारा (चित्रपट -चितचोर)
  • जब दीप जले आना (राग यमन, चित्रपट -चितचोर)
  • ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये (चित्रपट - पति पत्‍नी और वो)
  • तू जो मेरे सुरमें (चित्रपट -चितचोर)
  • तेरा मेरा साथ रहे (चित्रपट - सौदागर)
  • दिल में तुझे बिठाकर (फकिरा)
  • मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना)
  • मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल)
  • मैं हूँ खुशरंग (चित्रपट - हीना)
  • राम तेरी गंगा मैली (चित्रपट राम तेरी गंगा मैली)
  • ले जायेंगे ले जायेंगे
  • श्याम तेरी बन्सी पुकारे नाम (चित्रपट - गीत गाता चल)
  • सजना है मुझे सजना के लिये (चित्रपट - सौदागर)
  • सुन साहिबा सुन (चित्रपट - राम तेरी गंगा मैली)
  • हर हर गंगे

भक्तिगीते

  • श्री रामचंद्र कृपालू भजमल

रवींद्र जैन यांना मिळालेले पुरस्कार

  • १९८५ मध्ये 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटासाठी जैन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन जैन यांचा गौरव केला होता.
  • फिल्मफेअर पुरस्कार २००३
  • महाराष्ट्र सरकारनेही जैन यांचा गानसम्राज्ञा लता मंगेशकर हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे.
  • आशा भोसले पुरस्कार)
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते.
  • २०१५ सालचा पद्मश्री पुरस्कार
  • पुणे पीपल्स बँकेचा पुणे पीपल्स पुरस्कार

आत्मचरित्र

  • रवींद्र जैन यांनी ’सुनहरेपल’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे