"जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(...संपादनासाठी शोध संहीता वापरली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(...संपादनासाठी शोध संहीता वापरली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५१: ओळ १५१:
* [http://www.nature.com/climate/index.html वातावरण बदलावरील नेचर अहवाल ]
* [http://www.nature.com/climate/index.html वातावरण बदलावरील नेचर अहवाल ]
* [http://www.marathimati.com/Hiraval/Hiraval.asp हिरवळ]{{मृत दुवा}}-निसर्गाचे ‌ऋण फेडण्यासाठी हाती घेतलेली मोहीम
* [http://www.marathimati.com/Hiraval/Hiraval.asp हिरवळ]{{मृत दुवा}}-निसर्गाचे ‌ऋण फेडण्यासाठी हाती घेतलेली मोहीम
* [http://www.metoffice.gov.uk/research/hadleycentre/index.html इंग्लंडचा अहवाल]
* [http://www.metoffice.gov.uk/research/hadleycentre/index.html इंग्लंडचा अहवाल]{{मृत दुवा}}
* [http://www.ncdc.noaa.gov/oa/climate/globalwarming.html#INTRO एन ओ एए चा जागतिक तापमानवाढ वाविप्र]
* [http://www.ncdc.noaa.gov/oa/climate/globalwarming.html#INTRO एन ओ एए चा जागतिक तापमानवाढ वाविप्र]
* [http://www.aip.org/history/climate Discovery of Global Warming] – An extensive introduction to the topic and the history of its discovery, written by [[Spencer R. Weart]]
* [http://www.aip.org/history/climate Discovery of Global Warming] – An extensive introduction to the topic and the history of its discovery, written by [[Spencer R. Weart]]

१८:२१, २२ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

जागतिक तापमान नोंद

जागतिक तापमानवाढ (इंग्रजी: Global warming, ग्लोबल वॉर्मिंग) पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो..

हरितगृह वायूंचे उत्सर्जन

पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे.

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.


इतिहासातील तापमानवाढीच्या घटना

गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६ च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७०च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत.

सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदार पाण्याच्या साठ्याचाही परिणाम या दोन तुफानांची तीव्रता वाढविण्यात झाला, असं लक्षात आले आहे. या शिवाय पावसाबरोबर सागरात शिरलेला कार्बन डायऑक्साईड वायू या तुफानांमुळे परत वातावरणात जातो. याचं कारण ही तुफानं सागर घुसळून काढतात, त्यावेळी हा कार्बन डायऑक्साईड पाण्याच्या झालेल्या फेसाबरोबर पृष्ठभागावर येतो आणि परत आकाशगामी बनतो. इ.स. १९८५ च्या फेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७०च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.

तापमानवाढीची भाकिते

तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत. आय.पी.सी.सी. ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत.

  1. सर्व देशांकडून अनिर्बंध ऊर्जावापर व हरितगृह वायूंचे कोणत्याही उपाययोजना न करता उत्सर्जन
  2. विकसित देशांकडून ऊर्जावापरावरील कडक नियंत्रण व विकसनशील देशांना काही प्रमाणात जास्त ऊर्जावापराची संधी
  3. सर्वच देशांकडून ऊर्जावापरावर कडक नियंत्रण.

कारणे

हरितगृह परिणाम

हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[१]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून बंदिस्त असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात[२]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली.

क्रं वायू तापमानवाढ
पाण्याची वाफ २०.६°
कार्बन डायॉक्साईड ७.२°
ओझोन २.४°
डायनाट्रोजन ऑक्साईड १.४°
मिथेन ०.८°
इतर वायू ०.६°
एकूण सर्व एकत्रित
हरितवायू मिळून
३३°

तक्ता संदर्भ [३]
वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायु आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बऱ्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायु म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[३].

हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ

ह‍रितगृह परिणामात दुसरा महत्त्वाचा वायु म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसाखनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरु झाले. इ.स. १९७० च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसापेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६० च्या सुमारास झाली[४] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएम च्या जवळ पोहोचले आहे[५]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्लेषणा नंतर तयार झालेला कोळसाखनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्यहावतपणे जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोलडिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करून कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएम च्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखिल वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृति जोरदार पुरावा आहे. केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वाताव‍रणातील प्रमाण वाढत आहे. इ.स. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [३] इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे.[६] त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते इ.स. १९४० च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू फ्रीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे, पण बंदी नसताना भरपूर नुकसान झालेले आहे. हे वायू पृथ्वीजवळ असताना नुकसान न करता ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (O3) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपांतर करतात. हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच आणि त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती, कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे , त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते.

इतर कारणे

जगाची वाढती लोकसंख्या - वाढत्या जगाच्या लोकसंख्येमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे.

प्राण्यांची वाढती संख्या - कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढण्याकरिता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. अमेरिकेतील कडक कायदे टाळण्याकरिता तिथले वराहपालक मेक्सिकोत वराहपालन केंद्रे काढतात. तिथे एकेका केंद्रावर काही लाख प्राणी असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यूझीलंडमध्ये लोकसंख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही. हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. शिवाय मलमार्गावाटे मेथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात.

सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे.

ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखिल जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखिल होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो.

एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणामामूळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्-निनो परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता.

"'औद्योगिक क्रांती"' - औद्योगिक क्रांती घडल्यावर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होते. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूबरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळसा याच्या बरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला.

परिणाम

सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे.

हिमनद्यांचे वितळणे

जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांचे वितळणे चिंतेची बाब बनली आहे

इ.स. १९६० च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[७] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स. १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्णाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[८].[९]हिमालय, आल्प्स, आन्देसरॉकि या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१०]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळण्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलँड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलँडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [३] व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस अँजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलँड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांम्धील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार.

हवामानातील बदल

मुंबई महापूर

हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले/ अनुआहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईतमहाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[११]. युरोपअमेरिकेत देखिल पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[३]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखिल पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत.

हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे.वाळवटांचीही व्याप्ति वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे.

महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे अत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाहउत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यते वर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

जागतिक पातळीवरील उपाययोजना

aim or objectives

१९९७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद देशांनी क्योटो प्रोटोकॉल हा करार केला. या प्रोटोकॉलमध्ये त्यावेळी औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांनी मान्य केले की ते इ.स. २००५ ते २०१२ पर्यंत आपापल्या देशातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा पाच टक्के कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण कोणताच देश हे उद्दिष्ट गाठू शकला नाही. जर्मनी मध्ये या कराराच्या निमित्ताने नवीकरणीय ऊर्जेबाबत बरीच प्रगती झाली, हा एक अनुकूल परिणाम झाला[१२]. हरितगृह वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे जबाबदार देश आहेत. याचे मुख्य कारण त्यांचा मोठ्या प्रमाणावरील खनिज इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितगृह वायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व हा देश शेवटपर्यंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. त्यामुळेही या करार कमकुवत झाला होता.

२०१५ साली सर्व देशांनी मिळून जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅरिस करार हा नवा करार केला आहे.

शास्रीय दृष्टिकोनातून उपाय

जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निमिर्ती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लँस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात.

सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्ण आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरुन हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीय रित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की अत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरुपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरुन मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे.

कार्बन डायॉक्साईडचे रोखणे व साठवण

(English : CO2 capture and storage) उर्जा निर्मिती साठी मग ती कारखान्यातील कामांसाठी असो, की घरगुती विजेसाठी असो की वाहने चालवणाऱ्यासाठी असोत. यासाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. (अपवाद म्हणजे वीजनिर्मिती ही जलविद्युत अथवा पवनचक्यांमधील असली तर). या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखणाऱ्या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डायॉक्साईड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डायॉक्साईड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.[१४]

  1. कोळश्याला हवेच्या ऍवजी फक्त ऑक्सिजनच्या साहाय्याने ज्वलंत करणे. जेणेकरुन ज्वलनानंतर फक्त कार्बन डायॉक्साईड तयार होईल व तो लगेच साठवणीसाठी तयार होईल. याला ऑक्सिफ्युएल फायरिंग (oxyfuel firing) असे म्हणतात.[१५]
  2. केमिकल लूपींग ज्वलन
  3. अमिन च्या विविध द्र्व्यामध्ये कार्बनडायॉक्साईड विरघळते. ज्वलनानंतर धूराला अमिनच्या द्र्व्याम्ध्ये धुतल्यास त्यातील कार्बन डायॉक्साईड वेगळा होता नंतर अमिनला गरम करून कार्बन डायॉक्साईड वेगळे करणे सोपे जाते. या प्रक्रियेला अमिन स्र्कबिंग (Amine scrubbing)असे म्हणतात.[१६]

वरील प्रक्रिया आज औद्योगिक स्तरावर प्रचलित आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाहीत. त्यामुळे अजून स्वस्त प्रक्रियांचा शोध लावणे चालू आहे.

कार्बन डायॉक्साईडची साठवण- पहा: सी.ओ.२ स्टोरेज हा प्रकार विज्ञानाला अतिशय नवीन् आहे. वरील प्रक्रियेतून वेगळ्या केलेल्या कार्बन डायॉक्साईड ला जमीनीखाली पुरणे अथवा खोल समुद्रात सोडणे हा पर्याय आहे. सध्या शास्त्रज्ञ याला कश्या प्रकारे जमीनीत पुरता येईल. पुरणे सुरक्षित असेल का? त्याला सीलबंद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णांची उत्तरे शोधण्याचे काम चालू आहे. कार्बन डायॉक्साईडला, पेट्रोल अथवा नैसर्गिक वायूंच्या रिकाम्या खाणींमध्ये पुरणे सर्वात रास्त मार्ग आहे. या प्रकारे अश्या रिकाम्या खाणींचा पुन्हा वापर होईल.

कार्बन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कार्यरत असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. भविष्यात तयार होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये हा मुद्दा लक्षात घेउनच त्याचे नियोजन करावे लागेल.

नवीन प्रकारची इंधने

कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के)प्रदूषकांची निर्मिती होते[३][१७]. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३- ३७ टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे[१७]. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील सी.ओ.२ रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरुन या इंधनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही.

हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन् आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते.[१८] पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. सध्या हायड्रोजनचे नियोजन कसे करायचे याचे उत्तर शास्त्रज्ञ शोधत आहेत.[१९] कारण हायड्रोजन हा हलका वायु असल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised)साठवता येते. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत.

जैविक इंधने- शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांतून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लेशणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती अटळ असले तरी आपणास खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने सी.ओ.२ न्यूट्रल मानण्यात येतात[२०]. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही काही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत.

अपारंपारिक उर्जास्रोत-
पहा अपारंपरिक ऊर्जास्रोत
सध्या अपारंपारित उर्जास्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक स्रोत म्हणजे ज्यात खनिज संप्पतीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरउर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत,हे काही अपारंपरिक उर्जास्रोत आहेत.

अणूउर्जा अणूशक्तीपासून मिळवलेली उर्जा म्हणजे अणूउर्जा. अणूउर्जेत हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही. परंतु किरणोत्सर्गांचा त्रास, अणुभट्यांची सुरक्षितता तसेच अणूउर्जेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा होणारा विकास अणूउर्जेसाठी लागणारे इंधन व हे इंधन बनवताना होणारे हरितवायूंचे उत्सर्जन यामुळे हा विषय नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउर्जा हा जागतिक तापमानवाढीवर पर्याय नकोच असा सुर आहे.[२१]

आर्थिक, कायदेशीर व सामाजिक उपाय

उत्सर्जनावर कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाऊ शकतो. किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाऊ शकतो. ज्यादा कराने इंधनाच्या वापरावर बंधने येतील असा अंदाज आहे व उद्योगधंदे नविन प्रकारच्या हरितवायूरहित इंधनामध्ये जास्त गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. ज्यादा कराने अर्थव्यवस्था संथ होण्याची शक्यता आहे असे दुसऱ्या बाजून सुर आहे.

निर्बंध लादणे- हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरुन त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे.

कार्बन क्रेडिट - विकसित देशांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करावे लागले असते. विकासाची भूक प्रचंड असताना असे बदल काही देशांसाठी दिवाळखोरीचे कारण बनू शकते. तसेच सामाजिक प्रश्नही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम्)अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय केली गेली होती.[२२][२३] या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशात हरितगृह वायूंचे उत्सर्जन टाळून विकास केल्यास त्याचा फायदा त्यांना मिळतो. उदाहरणार्थ अफ्रिकेतील एखाद्या देशात फ्रान्सने पवनचक्यांची निर्मिती केली व त्या देशाच्या विकासात हातभार लावला तर पवनचक्यांनी जेवढे हरितवायूंचे उत्सर्जन वाचवले ते फ्रान्स या देशाच्या खात्यात जमा होते[२४]. अथवा एखादा आजारी उद्योग समूह जर कारखाने बंद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सर्जनाचे प्रमाणपत्र इतर देश अथवा इतर कंपनी विकत घेउ शकते. पूर्व युरोपात असे बरेच उद्योगसमूह होते ते १९९० च्या सुमारास चांगली कामगीरी करत होते व सोविएत संघाच्या पतना नंतर हे उद्योग समूह ढेपाळले. परिणामतः रशियामधील व पूर्व युरोपातील अश्या बऱ्याच कंपन्यांनी आपले उत्सर्जनाचे प्रमाणपत्र श्रीमंत कंपन्यांना विकणे चालू केले आहे[२५]. याला कार्बन क्रेडिट असे म्हणतात. काही टिकाकारांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गंभीर विषयाचे बाजारुकरण केले आहे[२६].

चित्रपटात

  • राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती ॲल गोर यांनी जागतिक हवामानबदल व जागतिक तापमान वाढ या विषयी जनजागृती करणे या ध्येयाला वाहून घेतले. लोकांशी या विषयावर संवाद साधण्यासाठी त्यांनी एक प्रभावी भाषण तयार केले. अल गोर यांची या विषयात काम करण्यामागची प्रेरणा समजून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद, आणि त्यांच्या भाषणातील महत्वाचे तुकडे यांची सरमिसळ करून डेव्हिस गुगनहाइम यांनी ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ हा अनुबोधपट काढला. या चित्रपटात जागतिक तापमानवाढ म्हणजे काय यापासून त्याचे परिणाम काय व अमेरिका व जगाने कोणकोणत्या प्रकारचे उपाय अमलात आणण्याची गरज आहे यावर सविस्तर सर्वांना समजेल अश्या भाषेत विवेचन केले आहे.[२७] या चित्रपटाला २००७ मधील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (डॉक्युमेंटरी)ऑस्कर पुरस्कार मिळाला होता[२८]. अल गोर यांचे जागतिक तापमानवाढी बद्द्ल जागृतीचे कार्य लक्षात घेउन २००८ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले[२९].
  • द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. जागतिक तापमानवाढीनंतर येऊ शकणाऱ्या हिमयुगाची रोमांचक कथा सादर केली आहे.

कविता अरे माणसा माणसा, कधी होशील तू माणूस? ज्यावरी तू निर्भर, त्यावरी झालास तू क्रूर

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

वैज्ञानिक

शैक्षणिक

इतर

=

  1. ^ विकिपीडिया ग्रीनहाउस लेख|
  2. ^ यु.एस. इ.पी.ए चे संकेतस्थळ
  3. ^ a b c d e f Air pollution control strategies - Author Rainer Friedrich - University Stuttgart
  4. ^ औद्योगिक क्रांतीचा इतिहास
  5. ^ वर्षानुसार कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण
  6. ^ मिथेन एक हरितवायू
  7. ^ discovery of global warming
  8. ^ अर्थ ऑबरव्हेटरी माउंट किलिमांजारो
  9. ^ किलिमांजारो १९१२ ते २०००
  10. ^ वॉशिंग्टन पोस्ट बातमी
  11. ^ नेशन मास्टर २००५ मुंबई व महाराष्ट्र पूर
  12. ^ [German response to Kyoto Protocol| जर्मनीचे क्योटो प्रोटोकॉल चे पालन विकी लेख]
  13. ^ Combustion and firing systems- Chapter 2 world Energy scenario By Prof. G. Scheffknecht - University Stuttgart
  14. ^ कार्बन कॅप्चरसाठी विविध प्रक्रिया-स्लाईड शो
  15. ^ ऑक्सिफ्युएल फायरिंग बद्दल् शास्त्रीय निबंध
  16. ^ अमिन स्क्रबिंग व इतर कार्बन कॅप्चर प्रक्रिया
  17. ^ a b http://www.ecobridge.org/content/g_cse.htm
  18. ^ हायड्रोजन
  19. ^ An overview of hydrogen production technologies, By JD Halladay, J.HU, D.L.King, Y.Wang, Catalysis today 139 (2009)
  20. ^ जैविक इंधने सी.ओ.२ न्यूट्रल का?
  21. ^ http://www.citizen.org/documents/GroupNuclearStmt.pdf
  22. ^ सी.डि.एम्‌ ग्लोसरी
  23. ^ लेख कार्बन क्रेडिट
  24. ^ http://www.ctrade.org/re.pdf
  25. ^ http://www.mnweekly.ru/national/20080131/55306791.html
  26. ^ कार्बन क्रेडिट टिका
  27. ^ गोर यांचे क्लायमेट क्रायसिस् चे संकेतस्थळ
  28. ^ २००७ ऑस्कर विजेते
  29. ^ नोबेल विजेते अल् गोर