"पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:क्रिकेट टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १: ओळ १:
{{वर्ग}}
'''पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली''' (संक्षिप्त रुप '''युडीआरएस (UDRS)''' किंवा '''डीआरएस (DRS)''') ही [[क्रिकेट]]मध्ये वापरली जाणारी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. [[फलंदाजी|फलंदाज]] बाद झाला आहे किंवा नाही ह्या मैदानावरील [[पंचगिरी|पंचांच्या]] वादग्रस्त निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या एकमात्र उद्देशाने सदर प्रणाली ही सुरुवातीला [[कसोटी क्रिकेट]] मध्ये वापरली गेली. सन २००८ च्या भारत वि. श्रीलंका सामन्यामध्ये सर्वप्रथम ह्या प्रणालीची चाचणी घेण्यात आली,<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sports.ndtv.com/cricket/news/53230-umpiring-decision-review-system-on-the-cards|शीर्षक=नवीन पुनरावलोकन प्रणालीची चाचणी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६|दिनांक=२२ जून २००८|प्रकाशक=एनडीटीव्ही स्पोर्ट्स|कृती=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया}}</ref> आणि त्यानंतर [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]ने २४ नोव्हेंबर २००९ रोजी [[युनिव्हर्सिटी ओव्हल]], [[ड्युनेडिन]]येथे सुरू झालेल्या [[न्यूझीलंड|न्यूझीलंड क्रिकेट संघ]] आणि [[पाकिस्तान|पाकिस्तान क्रिकेट संघ]] दरम्यानच्या पहिल्या कसोटीमध्ये अधिकृतपणे ही प्रणाली सुरू केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://cricketnext.in.com/news/decision-review-system-set-for-debut/45336-13.html |शीर्षक=निर्णय पुनरावलोकन प्रणाली पदार्पणासाठी सज्ज|दिनांक=२३ नोव्हेंबर २००९|प्रकाशक= क्रिकेटनेक्स्ट.इन |भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricinfo.com/ci-icc/content/story/436290.html |शीर्षक=सुधारित पुनरावलोकन प्रणालीचे अधिकृत पदार्पण |दिनांक=२३ नोव्हेंबर २००९|प्रकाशक= क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]]मध्ये सदर पद्धत जानेवारी २०११ मध्ये [[इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१०-११#एकदिवसीय मालिका|इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान]] वापरण्यात आली.<ref name="ODI_Referrals">{{स्रोत बातमी |शीर्षक=ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली जाणार|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/9361306.stm |कृती=बीबीसी स्पोर्ट |प्रकाशक=ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन|दिनांक=१६ जानेवारी २०११|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> सुरुवातीला आयसीसीने युडीआरएस प्रणाली सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंधनकारक केली होती,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=हॉट-स्पॉट नंतर डीआरएस बंधनकारक |दुवा=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/current/story/520913.html|प्रकाशक=क्रिकइन्फो|दिनांक=२७ जून २०११|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> परंतू नंतर त्याचा वापर ऐच्छिक केला गेला, त्यामुळे जर दोन्ही संघांची सहमती असेल तरच प्रणाली वापरली जाईल असे घोषित करण्यात आले. आयसीसीने तंत्रज्ञानावर काम सुरू ठेवण्याचे आणि आयसीसीच्या सर्व मालिकांमध्ये सदर प्रणालीचा वापर अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.weeklytimesofindia.com/sports-news/no-mandatory-use-of-decision-review-system-says-icc/ | कृती=द टाईम्स ऑफ इंडिया | शीर्षक=निर्णय पुनरावलोकन प्रणाली बंधनकारक नाही, आयसीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref>

ओळ २३: ओळ २२:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी|3}}
{{संदर्भयादी|3}}

[[वर्ग:क्रिकेट]]

१८:१८, २० नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (संक्षिप्त रुप युडीआरएस (UDRS) किंवा डीआरएस (DRS)) ही क्रिकेटमध्ये वापरली जाणारी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या मैदानावरील पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या एकमात्र उद्देशाने सदर प्रणाली ही सुरुवातीला कसोटी क्रिकेट मध्ये वापरली गेली. सन २००८ च्या भारत वि. श्रीलंका सामन्यामध्ये सर्वप्रथम ह्या प्रणालीची चाचणी घेण्यात आली,[१] आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने २४ नोव्हेंबर २००९ रोजी युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिनयेथे सुरू झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ दरम्यानच्या पहिल्या कसोटीमध्ये अधिकृतपणे ही प्रणाली सुरू केली.[२][३] आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सदर पद्धत जानेवारी २०११ मध्ये इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान वापरण्यात आली.[४] सुरुवातीला आयसीसीने युडीआरएस प्रणाली सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंधनकारक केली होती,[५] परंतू नंतर त्याचा वापर ऐच्छिक केला गेला, त्यामुळे जर दोन्ही संघांची सहमती असेल तरच प्रणाली वापरली जाईल असे घोषित करण्यात आले. आयसीसीने तंत्रज्ञानावर काम सुरू ठेवण्याचे आणि आयसीसीच्या सर्व मालिकांमध्ये सदर प्रणालीचा वापर अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. [६]

ऑक्टोबर २०१२ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने पायचीत नियमाबाबतबाबत काही बदल केले, त्यायोगे निर्णयातील अनिश्चिततेबाबत सुधारणा करण्यात आल्या.[७] जुलै २०१६ मध्ये, पुन्हा एकदा नियम बदलले गेले, त्यामुळे अनिश्चितता आणखी कमी होण्यात मदत झाली.[८][९] सुधारित नियम सप्टेंबर २०१६ मधील आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम वापरण्यात आले. [१०]

सप्टेंबर २०१३ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घोषित केले की, ऑक्टोबर २०१३ पासून, कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दर ८० षटकांनंतर प्रत्येक संघ दोनवेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागू शकतील. याआधी निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची मुभा कसोटीच्या एका डावात फक्त दोन-अयशस्वी रेफरल पुरती मर्यादित होती.[११]

घटक

युडीआरएसमध्ये तीन घटकांचा समावेश होता. स्निकोमीटरचा वापर बंद केला गेला होता परंतु २०१३ मध्ये तो पुन्हा सुरू केला गेला.[१२][१३][१४]

  • हॉक आय, ईगल आय, किंवा व्हर्चुअल आय: फलंदाजाने चेंडू खेळताना, बहुतेकदा पॅडने अडवलेल्या चेंडूचे मार्गक्रमण दर्शविणारे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान चेंडू यष्ट्यांवर आदळेल किंवा नाही हे दर्शविते.
  • हॉट-स्पॉट: चेंडूने बॅट किंवा पॅडवर जेथे संपर्क केला आहे ती जागा दाखवणारी इन्फ्रारेड इमेजिंग प्रणाली. सुधारित कॅमेरे २०१२च्या हंगामात वापरात आणले गेले.[१५]
  • रियल-टाइम स्निकोमीटर. ह्याच्यात चेंडू बॅटवर किंवा पॅडवर आदळल्याचा लहान अावाज ऐकण्यासाठी मायक्रोफोन्सचा वापर होतो.

प्रणाली

कसोटी सामन्यामध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी ८० षटकांदरम्यान जास्तीत २ वेळा अयशस्वी पुनरावलोकनाची संधी दिली जाते,[१६] आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये प्रत्येक संघ प्रत्येक डावामध्ये १ वेळा अयशस्वी पुनरावलोकन करू शकतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ "नाबाद" निर्णयाविरुद्ध आणि फलंदाजी करणारा संघ "बाद" निर्णयाविरुद्ध दाद मागू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारला किंवा बाद दिल्या गेलेल्या फलंदाजाला त्याच्या हाताने "T" आकाराची खूण करुन निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. दाद मागितली गेली, स्वीकारली गेली आणि ती मान्य केली गेल्यानंतर, तिसरे पंच निर्णयाचे पुनरावलोकन करतात. त्याशिवाय, मैदानावरील पंच स्वतः त्यांच्या अधिकारात, धावबाद किंवा यष्टिचीतच्या निर्णयासाठी रेषेबाबत, फलंदाजाने चौकार किंवा षट्कार मारला आहे या निर्णयासाठी सीमारेषेबाबत किंवा वादग्रस्त झेल अशा निर्णयांसाठी जेव्हा दोन्ही पंचांच्या मनात अनिश्चितता असते तेव्हा तिसऱ्या पंचांकडे निर्णयासाठी दाद मागू शकतात. बाद दिल्या गेल्याच्या किंवा दिल्या जाऊ शकण्याच्या परिस्थितीतच दाद मागितली जाऊ शकते: उदाहरणार्थ एखादा चेंडू हा खरोखरीचा झेल आहे (फलंदाजाच्या बॅटशी किंवा ग्लोव्हशी चेंडूचा संपर्क झाला आहे आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याआधी चेंडू जमिनीला टेकलेला नाही) किंवा पायचीतसाठीचे निकष पूर्ण झाले आहेत (यष्ट्यांच्या रेषेतच किंवा ऑफ बाजूला चेंडू धावपट्टीवर आदळला आहे आणि तो यष्ट्यांवर जाण्याच्या रेषेतच फलंदाजाच्या पायावर आदळला आहे). त्यानंतर तिसरे पंच त्यांचे मूळ निर्णयाचे समर्थन, असमर्थन किंवा अनिर्णय व्यक्त करणारे विश्लेषण मैदानावरील पंचांना सांगतात. मैदानावरील पंच त्यानंतर अंतिम निर्णय देतात: एकतर दाद रद्द झाली आहे किंवा उचलून धरली गेलेली आहे आणि त्यानंतर योग्य खूण करून निर्णय दिला जातो. प्रत्येक संघ अयशस्वी पुनरावलोकनाची मर्यादा संपेपर्यंत निर्णयाविरुद्ध दाद मागू शकतात.[१७]

डीआरएस नियमांतर्गत, जर तिसऱ्या पंचांच्या विश्लेषणानंतर फक्त स्पष्टपणे चुकीचे निर्णयच बदलले जाऊ शकतात, जर तिसऱ्या पंचांच्या विश्लेषणामध्ये साशंकता असेल तर मैदानावरील पंचांचा मूळ निर्णय ग्राह्य धरला जातो.[१८]

पुनरावृत्ती प्रणालीची चाचणी

२०१३ मध्ये आयसीसीने ब्रॉडकास्टर-फ्री रिप्ले पद्धतीची चाचणी घेतली. ह्या प्रयोगांतर्गत, सामन्यात नसलेले पंच एका वेगळ्या खोलीत मोठ्या मॉनिटरसमोर बसलेले असतात आणि प्रक्षेप्रकावर अंवलंबून न राहता कोणता रिप्ले पहावा याबद्दल त्यांचे मत मांडतात. निर्णय देण्याचे काम नसलेले हे पंच तिसऱ्या पंचाची भूमिकाच वठवतात. ॲशेस मालिकेमध्ये ही पद्धत सर्वप्रथम वापरली गेली (त्यावेळी नायजेल लाँग यांनी बिगर-सामना पंचाची भूमिका केली होती) आणि त्यानंतर हिचा पाकिस्तान-श्रीलंका एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापर केला गेला.[१९]

स्वीकार

संदर्भ

  1. ^ प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत) http://sports.ndtv.com/cricket/news/53230-umpiring-decision-review-system-on-the-cards. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (इंग्रजी भाषेत) http://cricketnext.in.com/news/decision-review-system-set-for-debut/45336-13.html. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.cricinfo.com/ci-icc/content/story/436290.html. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत) http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/9361306.stm. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.espncricinfo.com/ci-icc/content/current/story/520913.html. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ द टाईम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत) http://www.weeklytimesofindia.com/sports-news/no-mandatory-use-of-decision-review-system-says-icc/. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.wisdenindia.com/cricket-news/icc-paves-day-night-tests/32709. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत) http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/1031741.html. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.icc-cricket.com/news/2016/media-releases/95256/icc-annual-conference-concludes-in-edinburgh. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत) http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/1058341.html. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.wisdenindia.com/cricket-news/reviews-topped-up-80-overs/76203. २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ रियल टाईम स्निको
  13. ^ टीएनएन ७ जुलै २०११, ०१.१३ म.पू. भा.प्र.वे. टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत) http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-07-07/top-stories/29746405_1_udrs-hot-spot-glove/. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ हॉक-आयला विश्वासाची गरज - श्रीनिवासन Archived 20120202200618 at www.espncricinfo.com Error: unknown archive URL
  15. ^ नवीन कॅमेऱ्यांनी अगदी लहानशी कड सुद्धा लक्षात येणे गरजेचे – हॉट स्पॉट संशोधक Archived 20120111151130 at www.espncricinfo.com Error: unknown archive URL
  16. ^ (PDF) (इंग्रजी भाषेत) http://icc-live.s3.amazonaws.com/cms/media/about_docs/542bbe6f628ca-1%20_Standard_Test_2014-15_Final_Oct_14.pdf. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ (इंग्रजी भाषेत) http://cricket.about.com/od/glossary/fl/Decision-Review-System-DRS.htm. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.theguardian.com/sport/2010/nov/26/the-ashes-2010-umpire-review-system. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ ओएफएस ऑन द कार्ड