"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ यादी शीर्षकाखाली घेतली.
चित्रांना मराठीतून मथळे
ओळ ३१: ओळ ३१:


लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
[[चित्र:Lal_Bal_Pal.jpg|इवलेसे|Lal Bal Pal]]
[[चित्र:Lal_Bal_Pal.jpg|इवलेसे|लाल बाल पाल ]]


== सुरुवातीचे जीवन ==
== सुरुवातीचे जीवन ==
ओळ ५८: ओळ ५८:
== मृत्यू ==
== मृत्यू ==
निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.स्कॉटच्या लाठीमारामुळे लालजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले.या घटनेचा सूड घेण्याचे [[भगतसिंग]] यांनी ठरवले.
निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.स्कॉटच्या लाठीमारामुळे लालजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले.या घटनेचा सूड घेण्याचे [[भगतसिंग]] यांनी ठरवले.
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|Lala Lajpat Rai photo in Young India]]
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|यंग इंडिया मधील लाला लजपत रायाचे छायाचित्र ]]


पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF|शीर्षक=लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  
पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF|शीर्षक=लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  
ओळ ७२: ओळ ७२:


== संदर्भ ==
== संदर्भ ==
<references />[[चित्र:Lala_Lajpat_Rai_-_Scandal_Point_-_Shimla_2014-05-07_1194.JPG|इवलेसे|Lala Lajpat Rai - Scandal Point - Shimla 2014-05-07 1194]]
<references />[[चित्र:Lala_Lajpat_Rai_-_Scandal_Point_-_Shimla_2014-05-07_1194.JPG|इवलेसे|शिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा ]]


{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}

१८:२४, ११ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

लाला लजपत राय

जन्म: जानेवारी २८,इ.स. १८३६
धुडीके, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यू: नोव्हेंबर १७, इ.स. १९२९
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा,आर्य समाज
धर्म: हिंदू
वडील: मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल
आई: गुलाबदेवी अग्रवाल
पत्नी: राधादेवी अग्रवाल

लाला लजपत राय (पंजाबी: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जानेवारी २८, इ.स. १८३६[१] - नोव्हेंबर १७, इ.स. १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.[२]


लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.[३]

लाल बाल पाल

सुरुवातीचे जीवन

लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.[४]

१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.[५]

हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी  केल्या.१८८४ मध्ये त्यांच्या वडलांची बदली रोहटक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिस्सारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.

लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. कॉंग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.

१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्ये झाले.

१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली.[६] ते १९२७ ते १९३० पर्यंत अमेरिकेत होते.

राष्ट्रवाद

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७ मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपत रायांची मंडाले, ब्रह्मदेशात  रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.

१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.

सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने

१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.[७] भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली.३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.

मृत्यू

निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.स्कॉटच्या लाठीमारामुळे लालजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले.या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.

यंग इंडिया मधील लाला लजपत रायाचे छायाचित्र

पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.[८] या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  

लाला लजपत रायांनी लिहिलेली पुस्तके

  • यंग इंडिया [९]
  • द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा[१०]
  • लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस [११]
  • मॅझिनी, गॅरीबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे [१२]
  • श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण
  • महान अशोक

संदर्भ

  1. ^ News18 India https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html. 2018-08-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "साइमन कमीशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे" (हिंदी भाषेत). 2018-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ (PDF) https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ CHAND, FEROZ (2017-05-31). Lajpat Rai - Life and Work (इंग्रजी भाषेत). Publications Division Ministry of Information & Broadcasting Government of India. ISBN 9788123024387.
  5. ^ www.aryasamaj.com http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm. 2018-08-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ www.aryasamaj.com http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm. 2018-08-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Agrawal, Meena (2017-01-31). भारतातील थोर अमर क्रांतिकारक : चंद्रशेखर आझाद: Bharat Ke Amar Krantikari : Chandrashekhar Azad. Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352615803.
  8. ^ bharatdiscovery.org (हिंदी भाषेत) http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF. 2018-08-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ www.aryasamaj.com http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm. 2018-08-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ (Lala), Lajpat Rai; Nanda, Bal Ram (2010). The collected works of Lala Lajpat Rai (इंग्रजी भाषेत). Manohar. ISBN 9788173048227.
  11. ^ (Lala), Lajpat Rai (1966). Lala Lajpat Rai writings and speeches (इंग्रजी भाषेत). University Publishers.
  12. ^ (Lala), Lajpat Rai (1966). Lala Lajpat Rai writings and speeches (इंग्रजी भाषेत). University Publishers.
शिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा