"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite book
ओळ ३३: ओळ ३३:
|शीर्षक=Global city GDP rankings 2008-2025
|शीर्षक=Global city GDP rankings 2008-2025
|publisher=Pricewaterhouse Coopers
|publisher=Pricewaterhouse Coopers
|accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत टोकियोचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक|२०२०]] सालच्या [[उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा]] टोकियो येथे आयोजित केल्या जातील. <ref>{{cite book
|accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत टोकियोचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक|२०२०]] सालच्या [[उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा]] टोकियो येथे आयोजित केल्या जातील. <ref>{{स्रोत पुस्तक
|लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
|लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
|शीर्षक=The Global City: New York, London, Tokyo
|शीर्षक=The Global City: New York, London, Tokyo

०९:५४, ११ जुलै २०१८ ची आवृत्ती

टोकियो
東京都
जपान देशाची राजधानी
चिन्ह
टोकियो is located in जपान
टोकियो
टोकियो
टोकियोचे जपानमधील स्थान

गुणक: 35°41′N 139°46′E / 35.683°N 139.767°E / 35.683; 139.767

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रदेश कांतो
प्रभाग टोकियो
क्षेत्रफळ २,१८७ चौ. किमी (८४४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२७,९०,०००
  - घनता ५,८४७ /चौ. किमी (१५,१४० /चौ. मैल)
metro.tokyo.jp (इंग्रजी)


टोकियो (अन्य लेखनभेद: टोक्यो, तोक्यो ; जपानी: 東京都; रोमन लिपी: Tokyo; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))[१] ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग (प्रभाग), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.

टोकियो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.[२] न्यूयॉर्कलंडनसोबत टोकियोचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. २०२० सालच्या उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा टोकियो येथे आयोजित केल्या जातील. [३]

नाव

टोकियोला पूर्वी इडो या नावाने ओळखले जात असे. इडो म्हणजे जपानी भाषेत ’मुख’. १८६८ मध्ये इडोला जेव्हा जपानची राजधानी बनवले गेले तेव्हा त्याचे नाव बदलवून तोक्यो (तोउक्योउ: तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) असे ठेवले गेले. सुरुवातीच्या मेईजी काळात या शहराला "तोउकेइ" च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे. या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत "लिहिले गेलेले शब्द" असा होतो.. अनेक जुन्या इंग्रजी दस्ताऐवजांमध्ये मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्लेगेले आहे. परंतु आता हा शब्द अप्रचलित झाला आहे. आणि "तोक्यो" या शब्दाचाच उपयोग केला जातो.

भूगोल

हवामान

अर्थकारण

प्राइसवॉटर हाऊसकूपर्स द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार, टोकियो नागरी क्षेत्राचे (लोकसंख्या ३.५२ करोड़) २००८ मधील क्रयशक्तीच्या आधारे एकूण उत्पन्न अंदाजे १,४७९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे त्या यादीतले सर्वाधिक उत्पन्न होते. सन २००८ पर्यंतच्या माहितीप्रमाणे जगातील ५०० सूचिबद्ध कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे मुखालय टोकियोत आहे. हा आकडा दुसर्‍या स्थानावर असणार्‍या पैरिसच्या दुप्पट आहे.

जगातील सर्वात मोठे निवेश बँकांचे आणि विमा कंपन्यांचे मुख्यालय टोकियोत आहे. हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. द्दुसर्‍या महायुद्धानंतर जपानच्या अनेक व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून टोकियोला घेऊन गेल्या. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि तेथील महाग जीवनस्तरामुळे आता हा प्रकार थांबला आहे..

’इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स यूनिट’ने टोकियोला गेली १४ वर्षांपासून जगातले सर्वात महाग शहर ठरवले आहे. २००६ मध्ये इथली महागाई स्थिरावली. टोकियोचा शेअर बाजार हा जपानमधील सर्वात मोठा शेअर बाजार., जगातला दुसरा भांडवलबाजार आणि शेअर विक्रीच्या बाबतीत जगातला चौथा सर्वात मोठा बाजार आहे.

प्रशासन

वाहतूक व्यवस्था

टोकियो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. टोकियोची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.

टोकियोच्या महानगरक्षेत्रात ओता येथील हानेडा विमानतळचिबा प्रभागातील नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ हे टोकियो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन विमानतळ आहेत. जपान एअरलाइन्सऑल निप्पॉन एअरवेज ह्या जपानमधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनींची मुख्यालये टोकियोमध्येच स्थित आहेत. टोकियो विमानतळ प्रणाली लंडनन्यू यॉर्क शहराखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.

स्थानिक रेल्वे ही टोकियोमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्ते चे प्रमुख साधन आहे ही जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी टोकियो मेट्रो आणि सरकारी टोकियो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. टोकियो रेल्वे स्थानक जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक शिंकान्सेन मार्ग सुरू होतात.

कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी टोकियोपासून गतिमार्ग आहेत.

त्याशिवाय रिक्षा हे स्थानिक वाहतुकीचे आणखी एक साधन आहे. टोकियोच्या बेटापासून दूर अंतरापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. प्रवासी आणि सामान यांच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी टोकियो बेटाजवळ्च बंदर आहे.

लोकजीवन

संस्कृती

प्रसारमाध्यमे

शिक्षण

टोकियोमध्ये अनेक विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रोफेशनल शाळा आहेत. टोकियो विद्यापीठ, हितोत्सूबाशी विद्यापीठ, टोकियो प्रौद्योगिकी संस्था, वासीदा विद्यापीठ आणि किओ विद्यापीठासारखी जपानच्या नावाजलेल्या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे टोकियोत आहेत. त्याशिवाय,

  • ओचानोमिज़ू विद्यापीठ
  • वैद्युत-संचरण विद्यापीठ
  • टोकियो विद्यापीठ
  • टोकियो आयुर्विज्ञान और दन्त विद्यापीठ
  • टोकियो विदेशी शिक्षा विद्यापीठ
  • टोकियो समुद्री विज्ञान और प्रौद्योगिकी विद्यापीठ
  • टोकियो गाकूजेई विद्यापीठ
  • टोकियो कला विद्यापीठ
  • टोकियो कृषि एवँ प्रौद्योगिकी विद्यापीठ


टोकियोमध्ये विविध प्रकार चे खेळ खेळल्या जातात, आणि इथे दोन व्यावसाईक बेसबॉल क्लब सुद्धा उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते आणि टोकियो याकुल्ट स्वैलोज जे मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघ चे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये स्थित आहे जिथे तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता आयोजित केल्या जाते. (जानेवारी , मे , आणि सप्टेंबर ) टोक्योचे फुटबॉल क्लब आहे एफ. सी. टोक्यो और टोकियो वेर्डी १९६९, आणि दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात.

टोकियो हे १९६४ च्या उन्हाळी ओल्यम्पिक चे आयोजक शहर होते. राष्ट्रीय स्टेडियम, ज्याला ओलंपिक स्टेडियम, टोक्यो च्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. इथे पुष्कळ अंतर्राष्ट्रीय खेळ प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते. टोकियोमध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.

पर्यटन स्थळे

टोकियोमधील पर्यटन स्थळे :-

  • शाही महाल- शाही महाल हे जपानच्या राजाचे आधिकारिक निवास स्थळ आहे. या महालात जपानी परंपरा बघायला मिळतात. येथे अनेक सुरक्षा भवन आणि दरवाजें आहेत. हा महाल बादशहा च्या वाढदिवसाच्या दिवशी जनतेसाठी उघडला जातो. अन्य प्रसिद्ध थळामध्ये ईस्ट गार्डन, प्लाजा आणि निजुबाशी पूल यांचा समावेश आहे.
  • टोकियो टॉवर:-

या टॉवर ची निर्मिती १९५८ मध्ये झाली.. ३३३ मीटर उंच असे हे टॉवर एफिल टॉवरपेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहेत. या ठिकाणाहून्टोकियोचे विहंगम दर्शन होते. साफ वातावरणात येथून माउंट फ़्यूजीसुद्धा दिसतो.. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टॉवरच्या आत टोकियो टॉवर मेणाचे संग्रहालय, एक गूढ रहस्यमय क्षेत्र आणि हस्तकला दालनही आहे.

  • मीजी जिंगू श्राइन :-

हे मंदिर शिंतो वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराची निर्मिती १९२० साली येथील शासक मीजी (१९१२) च्या स्मरणार्थ केली गेली आहे. हे स्थळ ७२ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या बागांनी आणि जपानी झाडांनी वेढलेल्या मीजी जिंगू पार्कने व्यापले आहे. हे स्थान जपानमधील सर्वात सुंदर आणि पवित्र जागांपैकी एक आहे.

  • अमेयोको :-

अमेयोको हे पादत्राणांपासून ते कपडे, आणि सर्व प्रकारच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. हा बाजार उएनो स्टेशनपासून जवळ असल्याने पर्यटक या बाजारात जाणे पसंत करतात. येथे पर्यटक जपानच्या कलावंत कामगारांना जवळून बघू शकतात आणि त्यांच्याकडून चित्रविचित्र वस्तू कमी भावात मिळवू शकता.

संदर्भ

टिपा

  1. ^ . Tokyo Metropolitan Government http://www.metro.tokyo.jp/ENGLISH/PROFILE/overview02.htm. 2008-10-18 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ . Pricewaterhouse Coopers https://www.ukmediacentre.pwc.com/imagelibrary/downloadMedia.ashx?MediaDetailsID=1562. 27 November 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Sassen, Saskia (2001). (2nd ed.). Princeton University Press. ISBN 0691070636. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: