"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुनर्रचना
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
| वर्ग =
| वर्ग =
| उपवर्ग =
| उपवर्ग =
| कुळ =
| कुळ = पोएसी (Poaceae)
| उपकुळ =
| उपकुळ =
| जातकुळी =
| जातकुळी =
| जीव =
| जीव =
| बायनॉमियल =
| बायनॉमियल = oryza sativa ( औराइजा सैटाइवा )
| synonyms =
| synonyms =
| आढळप्रदेश_नकाशा=
| आढळप्रदेश_नकाशा=

१८:१५, १० मे २०१८ ची आवृत्ती

तांदूळ

शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: पोएसी (Poaceae)
शास्त्रीय नाव
oryza sativa ( औराइजा सैटाइवा )

तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणार्‍या तांदुळावर एक पापुद्रा-साळ असते. साळी सकटच्या तांदुळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदुळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदुळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.

तांदुळाच्या जाती

काळी साळ

तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.

"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.

न्यूयॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्‍न केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. त्यावरून असे ध्यानात आले की इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला असला पाहिजे. इसवी सनपूर्व २००० च्या आसपास जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोर्‍यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोर्‍यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापार्‍यांच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.

आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता

छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. [१]

महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती

  • आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
  • कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ
  • चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिल्ली
  • टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
  • तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
  • पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
  • रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार
  • हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
तामिळनाडूमधील जाती
  • कादिरमंगलम्
कर्नाटकातील जाती
  • नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,

तांदुळावरील रोग

तांदुळाच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास ते या पिकावरील रस शोषून घेतात, त्यामुळे ते पीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..[२]

सेंद्रिय तांदूळ

'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. सहसा याचे उत्पादन दशपर्णी अर्क व पालापाचोळा आणि सोनबुरुड खत वापरून केल्या जातो. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या आतेगाव या गावी अशा प्रकारचा सेंद्रिय तांदूळ पिकविण्यात येतो.

हेही पहा

संदर्भ

  1. ^ तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ : http://www.tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-02-19#Mpage_1 तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ : Check |दुवा= value (सहाय्य). २० फेब्रुवारी, इ.स. २०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक=, |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा:तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ