"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, [[एचआयव्ही]], इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, [[एचआयव्ही]], इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.


काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे ''Serotonin'' व ''Norepihephrine'') किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते.
काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे ''Serotonin'' व ''Norepihephrine'') किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.


== लक्षणे ==
== लक्षणे ==

१९:१९, ४ मे २०१८ ची आवृत्ती

तीव्र आत्मघाती प्रवृत्तीसह (१८९२) नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र

नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[१] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[२]

जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[३] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.

कारणे

मानसिक आघात, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, शारीरिक आजार, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे (केमिकल लोचा) नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.[४]

नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे SerotoninNorepihephrine) किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.

लक्षणे

  • सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे.
  • सतत उदास किंवा निराश वाटते आणि चीडचीड होणे.
  • थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटते.
  • मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते.
  • भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे
  • कोणतेही काम करावेसे न वाटणे.
  • भूक कमी लाणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. (काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात.)
  • दु:खी असणे, सतत काळजी करणे.
  • सतत रडू येणे
  • (शांत व पुरेशी) झोप न लागण. (काहीजणांना मात्र खूप झोप लागते)
  • सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे
  • निर्णयक्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे
  • स्वत: बद्दल न्यूनगंड निर्माण होणे. स्वत:ला दोषी समजणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते.
  • शरीरसंबंधाची इच्छा न होणे
  • दैनंदिन कामात अजिबात रस नसणे
  • आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.

वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते.

नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.

वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात, तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात.

उपाय

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक किंवा मित्र) यांच्याशी बोलणे.
  • गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घेणे.
  • नैराश्यात समुपदेशनाचाही खास उपयोग होतो.
  • आराम करत तणावाचे नियोजन करणे.
  • स्वतःसाठी वेळ देणे व छंद जोपासणे.

भारतातील स्थिती

भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषत: निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत.[५]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे