"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २२: ओळ २२:
==भारतात निर्मिति==
==भारतात निर्मिति==
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकार होता.
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकार होता.
पाश्चात्य सुरावटींप्रमाणे बनलेली हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणली जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ. अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविली. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविली. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे.
पाश्चात्य सुरावटींप्रमाणे बनलेली हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणली जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ. अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविली. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविली. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरु केला. स्वदेशी चळवळीला प्रधानता देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीची हार्मोनियम बनविली. कोलकाता, दिल्ली आणि इतर संगीतपेठेत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता.


सुप्रसिद्ध वादक
सुप्रसिद्ध वादक

२०:३०, २० मार्च २०१८ ची आवृत्ती

संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध पॅरीस शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. १८०० नंतर युरोपीय लोकांनी आणले. हाताने किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या (सूर) शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांचे समूह असतात. भारतीय संगीतात या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. कीर्तने, सुगम संगीत इत्यादी ठिकाणी पेटी साथीला असते.

शोध व प्रसार

संवादिनि हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. एकमेकास अनुकूल असणा-या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनि हे योजिले.

विदेशातून आलेले हार्मोनियम हे एकच वाद्य नाही. तत्पूर्वी व्हायोलिन भारतात आले होते. त्यातही त्या वाद्याचा प्रथम प्रवेश दक्षिणाधि संगीतात झाला. त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले.

आँर्गन (हार्मोनियम) पायाने दाब दिल्याने निर्माण होणा-या हवेच्या झोताने वाजे. दोनही हातांचा प्रयोग करुन एकाचवेळी दोन सप्तकांमध्ये वाजू शकणा-या या वाद्याने भारतीय संगीतात नाविन्य आणले. त्यालाच पायपेटी असेही म्हणत. कांही युरोपियन संगीतकारांनी पायपेटी आपल्या प्रार्थनासभेमध्ये प्रथम आणली.

हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग

हिंदुस्तानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरु झाला तो १८८२ साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला. त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि आँर्गनच्या सहाय्याने गाजले. मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले आपले स्थान बळकट केले. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली. प्रथम वादक दादा मोङक १८८२, प्रथम हार्मोनियम वादक, किर्लोस्कर नाटक मंङळी प्रथम स्वतंत्र वादक भैया गणपतराव शिंदे, ग्वाल्हेर (१८५२-१९२०)

भारतात निर्मिति

भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकार होता. पाश्चात्य सुरावटींप्रमाणे बनलेली हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणली जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ. अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविली. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविली. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरु केला. स्वदेशी चळवळीला प्रधानता देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीची हार्मोनियम बनविली. कोलकाता, दिल्ली आणि इतर संगीतपेठेत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता.

सुप्रसिद्ध वादक

बच्चुभाई भंडारे, मुंबई (१८७८-१९०९), लक्ष्मणसिंंह, बाबुसिंह (हैद्राबाद), नन्हेबाबु कुंवर बिदर, गोविंदराव टेंबे कोल्हापूर, (१८८१-१९५७), विठ्ठलराव कोरगावकर बेळगाव (१८८४- १९७४), रामभाऊ विजापुरे बेळगाव (१९१७-२०१०), पी. मधुकर मुंबई (१९१६-१९६७), पुरुषोत्तम वालावलकर मुंबई, मनोहर चिमोटे मुंबई, अप्पा जळगावकर पुणे, बाबुराव बोरकर बेळगाव, बंडुभैय्या चाैघुले इंदूर, हणमंतराव वाळवेकर धारवाड, वसंत कनकापूर धारवाड, गुलाम रसुल, बशीरखाँ (बडोदा), मोहनलाल, सोहनलाल, बलदेव मिश्र (वाराणसी),ङाँ.पाबळकर, भीष्मदेव चैटर्जी, पु. ल. देशपांङे, गोविंदराव पटवर्धन, गणपतराव पुरोहित, राजाभाऊ कोसके, विश्वनाथ पेंढारकर, एकनाथ ठाकुरदास, बाळ माटे, ज्ञानप्रकाश घोष, जयंत बोस, मुनेश्वर दयाल, पुट्टराज गवई, शेषाद्री गवई, तुळशीदास बोरकर, सुधीर नायक, सुधांशु कुलकर्णी, रविंद्र काटोटी, अरविंद थत्ते, वासंती म्हापसेकर, निर्मला काकोडे, बबन मांजरेकर, अजय जोगळेकर, सीमा शिरोडकर, सुयोग कुंडलकर, चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, तन्मय देवचक्के, आदित्य अोक, विश्वनाथ कान्हेरे, प्रमोद मराठे, विनय मिश्र, दिनकर शर्मा, केदार नाफडे, रविंद्र माने, सारंग कुलकर्णी, दीपक मराठे,

कर्नाटक संगीतामध्ये संवादिनी

विद्वान टी. चौडय्या, विद्वान अरुणाचलप्पा, विद्वान नरसिंहय्या, विद्वान आर. परमशिवन, सी. रामदास अशा अनेकानी संवादिनीचा प्रभावी उपयोग कर्नाटक संगीतासाठी केला.

संदर्भ

१.भारतीय संगीत व संगीतशास्त्र-बा. गं. आचरेकर, महाराश्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंङळ २. विश्व संवादिनि श्रुंग स्मरणिका ५,६,७ जाने. २०१८

चित्रदालन