"बँक मेळपत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १७: ओळ १७:
==रोख पुस्तक आणि बँक खाते पुस्तक यात फरक पडण्याची कारणे==
==रोख पुस्तक आणि बँक खाते पुस्तक यात फरक पडण्याची कारणे==


१) '''काळामधील तफावत''' - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या [[धनको|धनकोला]] दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत समाशोधन होऊन त्या [[धनादेश|धनादेशाचे]] शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश.
१) '''काळामधील तफावत''' - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या [[धनको|धनकोला]] दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत [[समाशोधन]] होऊन त्या [[धनादेश|धनादेशाचे]] शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश.


२) '''बँकेत परस्पर नोंदवले गेलेले [[व्यवहार]]''' - [[व्याज|व्याजाची]] रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे [[लाभांश]], [[विमा]] रक्कम, सेवा शुल्क इत्यादी [[व्यवहार]], खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , [[दूरध्वनी]] देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)
२) '''बँकेत परस्पर नोंदवले गेलेले [[व्यवहार]]''' - [[व्याज|व्याजाची]] रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे [[लाभांश]], [[विमा]] रक्कम, [[सेवाशुल्क|सेवा शुल्क]] इत्यादी [[व्यवहार]], खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , [[दूरध्वनी]] देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)


३) '''मानवी चुका''' - व्यवहार नोंदवाण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.
३) '''मानवी चुका''' - व्यवहार नोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.


==बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==
==बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==

२०:२१, १३ मार्च २०१८ ची आवृत्ती

बँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रक्कमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.

व्याख्या

बँक मेळपत्रक हे एक असे विवरण आहे की जे रोख पुस्तकातील बँक रकान्याची शिल्लक तसेच बँक खातेपुस्तकातील शिल्लक यातील फरकाचा मेळ घालण्यासाठी तयार केले जाते आणि दोन्ही शिल्कांमध्ये फरक का पडला याची कारणे दर्शवते.[१]

बँक मेळपत्रकाची गरज

१) बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर तसेच कर्मचाऱ्यांनी रोख नोंदी अद्ययावत ठेवल्या आहेत की नाही यावर बँक मेळपत्रकामार्फत लक्ष ठेवता येते. कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी वाढते.

२) रोख रकमेची हाताळणी तसेच बँकेतील शिल्लक रक्कम यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता कमी होते.

३) रोख पुस्तक किंवा बँकेचे खाते पुस्तक यामध्ये गाळलेल्या नोंदी तसेच चुका ओळखण्यासाठी बँक मेळपत्रक उपयुक्त ठरते.

४) केवळ बँकेच्या खाते पुस्तकात असणार्या नोंदी समजतात.[२]

रोख पुस्तक आणि बँक खाते पुस्तक यात फरक पडण्याची कारणे

१) काळामधील तफावत - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या धनकोला दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत समाशोधन होऊन त्या धनादेशाचे शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश.

२) बँकेत परस्पर नोंदवले गेलेले व्यवहार - व्याजाची रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे लाभांश, विमा रक्कम, सेवा शुल्क इत्यादी व्यवहार, खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , दूरध्वनी देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)

३) मानवी चुका - व्यवहार नोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.

बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत

प्रारूप

संदर्भ

  1. ^ https://www.accountingtools.com/articles/2017/5/17/bank-reconciliation
  2. ^ ESSENTIALS OF FINANCIAL ACCOUNTING By ASISH K. BHATTACHARYYA pg no197 ISBN no 8120353153, 9788120353152