"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८: ओळ ४८:
* त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
* त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
* पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
* पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
* गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे लागले.
* गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे fgcxsg
लागले.


==नवा शोध व मृत्यू==
==नवा शोध व मृत्यू==

२०:४६, ४ मार्च २०१८ ची आवृत्ती

गॅलिलिओ गॅलिली

जस्ट्स सुस्टरमान्स याने रंगविलेले गॅलिलिओचे व्यक्तिचित्र
जन्म फेब्रुवारी १५, १५६४
पिसा, टस्कनी, इटली
मृत्यू जानेवारी ८, १६४२
आर्केट्री, टस्कनी, इटली
निवासस्थान टस्कनीची महान डची
धर्म रोमन कॅथॉलिक
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित
कार्यसंस्था पादुआ विद्यापीठ
प्रशिक्षण पिसा विद्यापीठ
ख्याती गतियामिक(Kinematics)
दुर्बीण
सूर्यमाला
वडील व्हिसेन्झो गॅलिलिओ
आई गिउलिया अमानती

गॅलिलिओ गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यू: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता.

जन्म व बालपण

गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले.त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारं ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओन लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बर्‍याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.

शिक्षण

गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले.त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले.त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरु केली.त्यांची इच्छा होती कि गॅलिलिओने डॉक्टर बनावे.इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरु झाले.त्यांची खरी ओढ गणिताकडे होती.तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर राहवे असे त्याला वाटत.वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.

लंबकाचे घड्याळ

एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती! याच लंबकाचा वापर गॅलेलिओन त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो.

अध्यापन आणि कौटुंबिक जीवन

कालांतराने गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करे. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर मरीना गाम्बा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे.. या काळात गॅलेलियोओ व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्यान त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी (?) यांवर बरचसे संशोधन केले.

गॅलिलिओचे शोध

  • गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला.
  • त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
  • पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
  • गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे fgcxsg

लागले.

नवा शोध व मृत्यू

१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हिरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आनि इतरही गोष्टी या खर्‍या नसून दिशाभूल करणार्‍या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बणिीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वष्रे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.

सन्मान

गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे..