"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुरुस्ती केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎इतिहास: दुरुस्ती केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:


==इतिहास==
==इतिहास==
भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. कनिक राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र आहे. शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. येथील सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे इथली प्राणी व पक्षी ही संपत्ती.
भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी कनिका राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र होते. त्यामुळे शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. येथील सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे इथली प्राणी व पक्षी ही संपत्ती.


==वनस्पती==
==वनस्पती==

११:०७, २३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

भितरकनिका (अन्य नावे - वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.

इतिहास

भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी कनिका राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र होते. त्यामुळे शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. येथील सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे इथली प्राणी व पक्षी ही संपत्ती.

वनस्पती

येथे सुंदरी, थेस्पिया, कॅझ्युरीना अशा अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. येथे इंडिगो बुश हे व इतरही गवतांच्या प्रजाती आहेत.भारतातील ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणून ओळखले जाते.

प्राणी व पक्षी

खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी,जंगली डुक्कर, रिसस प्रजातीची ( लाल तोंडी ) माकडे, चितळ, घोरपड, कोल्हे, लंगूर प्रजातीची( काळ्या तोंडाची) माकडे,सांबर,रान मांजर, खोकड, मुंगूस, लांडगे, तरस असे प्राणी आढळतात.अजगर, नाग हे सर्प आढळतात. काळा कुदळ्या,डार्टर, ८ प्रकारचे खंड्या, पाणकावळा, बगळे, उघडया चोचीचा करकोचा हे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात जवळपास १,२०,००० पक्षी इथे स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात देखील येथे ८०,००० पक्षी घरटी बांधण्यासाठी येतात. गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.

खास आकर्षण

अजस्त्र अशा खाऱ्या पाण्यातील मगरी; ज्यांची लांबी जवळपास २३ फूट अशी असू शकते; हे येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. तसेच पाण घोरपड, नाग असे सरीसृप वर्गातील प्राणी आपण बघू शकतो. चितळ आणि रानडुक्कर यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. खंड्या या पक्ष्याच्या ८ वेगवेगळ्या जाती इथे आढळतात.

पर्यटन

येथे आपल्याला वनखात्याने परवाना दिलेल्या बोटीतून फिरावे लागते. याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे खोला गेट, तसेच अजून एक प्रवेशद्वार आहे ते आहे गुप्ती गेट. काही वर्षांपूर्वी येथे पर्यटन अजिबात नव्हते. परंतु आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. ओडिशा चे राज्य सरकार आता थोडे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पर्यटन थोडे वाढले आहे. येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी जास्त प्रमाणात सुरू आहे, आणि या सफारीला जास्त महत्त्व आहे. या सफारीत आपण घनदाट खारफुटीचे जंगल, एक जैवविविधतेने नटलेली परिसंस्था याचा आनंद घेऊ शकतो. या सफारीचा उत्तम कालावधी म्हणजे सकाळी लवकर किंवा मग सूर्यास्तापूर्वी हा म्हणता येईल.

हे सुद्धा पहा