"सेवाभारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎भावी योजना: टंकन दोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०१: ओळ १०१:


रेडियोलॉजी विभाग
रेडियोलॉजी विभाग

अतिदक्षता विभाग
अतिदक्षता विभाग

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व आय.सी.यु. युक्त रुग्णवाहिका
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व आय.सी.यु. युक्त
रुग्णवाहिका


शहराच्या विविध भागांमध्ये चिकित्साकेंद्र सुरू करणे
शहराच्या विविध भागांमध्ये चिकित्साकेंद्र सुरू करणे

विविध विभागांच्या सेवा सुधारणे वाढविणे
विविध विभागांच्या सेवा सुधारणे वाढविणे



२१:५५, २६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

सेवाभारती, इचलकरंजी ही महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या शहरात स्थापन झालेली स्वयंसेवी संस्था आहे.

पार्श्वभूमी व उद्दिष्टे

इचलकरंजी ही एक वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून देखील ही गणली जाणारी नगरी. हिच्या सभोवताली अनेक लहान आणि शेतीप्रधान खेडी आहेत. वस्त्रोद्योग नगरी असल्याने येथे गरीब यंत्रमाग कामगार आणि कारखान्यांचे मालक अशा प्रकारचा रहिवासी वर्ग जास्त करून आढळून येतो.

या गरीब कामगार व शेतमजूर यांच्यासाठी आरोग्य आणि शिक्षणसेवा याची अत्यंत गरज येथे निर्माण झाली. या गरजेमधून सन १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देशभर सुरू झालेल्या अनेक सेवाप्रकल्पांपैकी हा एक इचलकरंजी येथील प्रकल्प. यंत्रमाग कामगार आणि शेतमजूर या समाजातील घटकांसाठी आरोग्य व शिक्षणसेवा पुरवण्याचे व्रत स्विकारून या प्रकल्पाची सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] सेवाभारती संस्थेची रितसर सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी होते. संस्थेचे नियमित लेखापरीक्षण ( ऑडिट ) होत असते. संस्थेला 80G मान्यता आहे.

डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी

फिरते रुग्णालय- सर्वप्रथम उपचारांसाठी सुसज्ज असे डॉ हेडगेवार फिरते रुग्णालय उभे केले. यामार्फत इचलकरंजी येथील सेवावस्ती व परिसरातील आठ खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू केली. गेली २२ वर्षे अखंडपणे ही सेवा सुरू आहे. कामाची नैसर्गिक गरज म्हणून रोगपरीक्षण प्रयोगशाळा, वेळोवेळी गरजेनुसार आरोग्यशिबीरे, शहरामध्ये स्थायी ओ.पी.डी., डे केअर वॉर्ड, विवेकानंद नेत्र रुग्णालय, मिरज यांच्या सहायाने नेत्रविकार उपचार, शहरातील अनेक तज्ञ डॉकटरांच्या मदतीने पॉलीक्लिनिक हे प्रकल्प यशस्वीपणे व अविरत सुरू आहेत. प्रतिवर्षी सुमारे १०००० रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. २१ वर्षांचा या सर्व कार्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन सेवाभारतीने दिनांक २६ जून २०११ रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयाची स्थापना केली. रुग्णालयाची चार मजली वास्तु उभी राहिली आहे.

१. १६ रुग्णांचा जनरल वॉर्ड

२. ८ स्पेशल व सेमी स्पेशल रूम्स

३. सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग

४. पॅथॉलॉजी विभाग

५. एक्स-रे विभाग

६. इ.सी.जी

७. स्पेशालिस्ट कन्सलटिंग

८. पॉलीक्लिनिक विभाग

९. दंत चिकित्सा विभाग

१०. औषध दुकान

या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे दीड कोटी खर्च झालेला आहे. यापैकी सुमारे एक कोटी इतका निधी लोकसहभागातून जमा झालेला आहे. निधी जमेल तसा प्रकल्पाचा विस्तार करणे सुरू आहे. प्रकल्पाच्या पुढील टप्यामध्ये सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर, अतिदक्षता विभाग (आय.सी.यु.कक्ष) व आय.सी.यु.रुग्णवाहिका इ. उपलब्ध करण्याची योजना आहे. यासाठी सुमारे पाच कोटी खर्च अपेक्षित आहे.

केवळ १ रुपया प्रतिदिन..... हा सेवाभारतीच्या या सर्व कार्याचा आधार आहे. दरवर्षी सुमारे ४००० नागरिक असे रु.३६५/- नियमितपणे देतात.

विविध सुविधा

१. नर्सिंग ट्रेनिंग सेंटर - वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या अंतर्गत पहिल्या वर्षी ५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे हा कोर्स पूर्ण केला.

२. शासकीय क्षयरोग निदान केंद्र - येथे मोफत थुंकी तपासणी केली जाते. या सुविधेचा लाभ ७९१ रुग्णांनी घेतला.

३. महिला आरोग्य शिबीर - बचतगटाच्या माध्यमातून इचलकरंजी शहराच्या विविध भागांतील १७०० महिलांची तपासणी केली आहे.

४. रक्तगट तपासणी शिबीर - या योजनेच्या अंतर्गत तारदाळ, खोतवाडी परिसरातील १२०० विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले.

५. आरोग्य तपासणी - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १०१ चालकांची आरोग्य तपासणी २०१४-२०१५ या कालावधीत करण्यात आली.

६.जेष्ठ स्वास्थ्य चिकित्सा योजना - जेष्ठ नागरिकांसाठी नाममात्र दरात सामान्य आरोग्य तपासणी.

७.औद्योगिक कामगार आरोग्य तपासणी योजना - या योजनेअंतर्गत वर्षभरात १८ कारखान्यातील एकूण ६९२ कामगारांची तपासणी करण्यात आली.


विशेष उल्लेखनीय योगदान

सन १९९३ :- लातूर भूकंपग्रस्तांसाठी निधी व वस्तू संकलन तसेच वितरण

सन १९९८ :- कारगिल युद्ध राष्ट्रीय रक्षा निधी रु.८५००००/- संकलन

सन २००१ :- गुजरात भूकंपग्रस्तांसाठी मदत पथक, सुमारे २५०० रुग्णांवर वैद्यकीय उपचार व सहाय्य

सन २००५ :- इचलकरंजी व परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र, ११०० गरजू कुटुंबांना कौटुंबिक साहित्याची मदत

सन २०१२ :- इचलकरंजी व परिसरात मोठ्या प्रमाणात आलेल्या काविळीच्या साथीत गरजू कावीळ पीडितांवर यशस्वी औषध उपचार

सन २०१५-१६ :- इचलकरंजी व परिसरात आलेल्या डेंग्यू साथीत ९८ डेंग्यू पीडितांवर यशस्वी औषधोपचार


अन्य सेवा कार्ये

माधव विद्या मंदिर

भगिनी निवेदिता शिलाई प्रशिक्षण केंद्र

प्रासंगिक आपत्ती सेवाकार्य

एकलव्य अभ्यासिका

मोफत वृत्तपत्र वाचनालय

संस्थेला मिळालेले पुरस्कार

१.लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी

२.फाय फाउंडेशन, इचलकरंजी

३.जनता सहकारी बँक, पुणे

४.जनसेवा सहकारी बँक, पुणे

५.रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी

६.मारवाडी महिला मंच, इचलकरंजी

७.नातु फाउंडेशन, पुणे

८.श्री साई सेवा केंद्र, गोमंतक

भावी योजना

रेडियोलॉजी विभाग

अतिदक्षता विभाग

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व आय.सी.यु. युक्त रुग्णवाहिका


शहराच्या विविध भागांमध्ये चिकित्साकेंद्र सुरू करणे

विविध विभागांच्या सेवा सुधारणे वाढविणे

संदर्भ

[१] [२]

  1. ^ संस्थेचे या वर्षीचे माहितीपत्रक १ जानेवारी २०१८ रोजी वाचले.
  2. ^ [१]संस्थेचा अधिकृत ब्लॉग