"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ६०: ओळ ६०:


==वैशिष्ट्ये==
==वैशिष्ट्ये==
बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. [[महाराष्ट्र]] राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची [[खजाना विहीर]] (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिधफ्ना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे
बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. [[महाराष्ट्र]] राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची [[खजाना विहीर]] (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिधफ्ना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे.


==इतिहास==
==इतिहास==

१५:२२, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

  ?बीड

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
बिंदुसरा धरण
बिंदुसरा धरण
बिंदुसरा धरण
Map

१८° ५९′ ००″ N, ७५° ४६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६९.१५ चौ. किमी[१]
• ५१५ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
मोसमी (Köppen)
• ६६६ मिमी (२६.२ इंच)

• ४० अंश सेल्शियस °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "४" °F)
• १२ अंश सेल्शियस °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "१" °F)
प्रांत मराठवाडा
जिल्हा बीड
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२५,८५,९६२ (२९५ वा) (२०११)
• २०४/किमी
९०४ /
त्रुटि: "७३.५२%" अयोग्य अंक आहे %
भाषा हिंदी, मराठी, उर्दू भाषा, (इंग्रजी in official use only)
Settled बहुधा इसवी सनाचे १३वे शतक
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431122
• +०२४४२
• MH-23
संकेतस्थळ: beed.nic.in
  1. ^ http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Beed/places_bhir_नगर.html. २७-२-२००७) रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्हाच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

बीड (किंवा भीर) (Bhir) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.

वैशिष्ट्ये

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिधफ्ना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे.

इतिहास

बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.

बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणार्‍या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.

किल्ले मैदान, लक्ष्मीबाग== बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकार्‍यांच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.

शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने

इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी धावायची.

विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे

विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली, महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची स्थळे. यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते. इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत.

धोंडीपुरा

बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा' करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणार्‍या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुर्‍यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.

हिरालाल चौक

पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणार्‍या भागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. 'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणार्‍या कदम घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.

नेताजी मैदान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी 'छोटा सुभाष' ही पदवीच दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक 'सुभाष रोड' संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही 'नेताजी मैदान' संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.

सटवाई

’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग 'सटवाई मैदान' म्हणून ओळखला जात असे. नंतर 'बारादरी' व आज 'माळीवेस' या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे.

शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.

बशीरगंज

बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो.

गाजीपुरा

गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले.

[१]

रावण जटायूचे पंख कापताना - राजा रविवर्म्याने चितारलेले चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १८९५)

कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे . मंदिराचे दगडी बांधकाम आहे .

संदर्भ आणि नोंदी

  • येथील'कन्कालेश्वर'महोत्सव हा प्रसिद्ध आहे.