"शृंगाश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
ओळ ६७: ओळ ६७:


== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{reflist}}
* {{पुस्तक स्रोत|आडनाव=Levy|पहिलेनाव=David H.|शीर्षक=Deep Sky Objects|वर्ष=2005|प्रकाशक=Prometheus Books|आयएसबीएन=1-59102-361-0}}
* {{पुस्तक स्रोत|आडनाव=Levy|पहिलेनाव=David H.|शीर्षक=Deep Sky Objects|वर्ष=2005|प्रकाशक=Prometheus Books|आयएसबीएन=1-59102-361-0}}



१४:१६, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

शृंगाश्व
तारकासमूह
शृंगाश्व मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Mon
प्रतीक युनिकॉर्न
विषुवांश ७.१५
क्रांती -५.७५
चतुर्थांश एनक्यू२
क्षेत्रफळ ४८२ चौ. अंश. (३५वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
३२
ग्रह असणारे तारे १६
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा β Mon (३.७६m)
सर्वात जवळील तारा रॉस ६१४
(१३.३ ly, ४.०९ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षाव डिसेंबर मोनोसेरिड्स
अल्फा मोनोसेरिड्स
शेजारील
तारकासमूह
मृग
मिथुन
बृहल्लुब्धक
वासुकी
लघुलुब्धक
शशक
अरीत्र
+७५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
फेब्रुवारी महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

शृंगाश्व हा खगोलीय विषुववृतावरील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Monoceros (मोनोसेरस) म्हणतात, जो युनिकॉर्न या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. त्याच्या पश्चिम सीमेला मृग, उत्तरेला मिथुन, दक्षिणेला बृहल्लुब्धक आणि पूर्वेला वासुकी हे तारकासमूह आहेत. लघुलुब्धक, शशक आणि अरीत्र हे इतर तारकासमूह सुद्धा शृंगाश्वच्या सीमेला लागून आहेत.

वैशिष्ट्ये

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे शृंगाश्वमधील तारे

तारे

मोजके चौथ्या दृश्यप्रतीचे तारे असणारा शृंगाश्व नुसत्या डोळ्यांनी सहज दिसत नाही. अल्फा मोनोसेरोटिस ची आभासी दृश्यप्रत ३.९३ आहे, ३.९८ दृश्यप्रतीच्या गॅमा मोनोसेरॉटिस पेक्षा थोडा जास्त तेजस्वी.

बीटा मोनोसेरोटिस एक त्रैती तारा आहे. त्रिकोण बनवणारे तीन तारे स्थिर वाटतात. ताऱ्यांची दृश्यप्रत ४.७, ५.२ आणि ६.१ आहे.

एप्सिलॉन मोनोसेरॉटिस स्थिर द्वैती तारा आहे. त्यातील ताऱ्यांची दृश्यप्रत ४.५ आणि ६.५ आहे.

एस मोनोसेरॉटिस किंवा १५ मोनोसेरॉटिस निळसर-पांढरा चलतारा आहे आणि तो एनजीसी २२६४ च्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या दृश्यप्रतीमधील बदल लहान आहे (४.२–४.६)

व्ही८३८ मोनोसेरॉटिस एक लाल महाराक्षसी चलतारा आहे ज्यामध्ये ६ जानेवारी २००२ रोजी स्फोटक उद्रेकाची सुरुवात झाली. त्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्याची प्रखरता एका दिवसात १०,००० पटींनी वाढली. उद्रेक संपल्यानंतर हबल दुर्बिणीने प्रकाश प्रतिध्वनी पाहिला, ज्याने ताऱ्याच्या आसपासच्या धुळीला उजळून टाकले होते.[१]

शृंगाश्वमध्ये प्लास्केटचा तारादेखील आहे जो एक प्रचंड वस्तुमानाचा द्वैती तारा आहे. त्याच्यातील ताऱ्यांचे एकत्रित वस्तुमान सुमारे १०० सूर्यांच्या वस्तुमानाएवढे आहे.

परग्रह

शृंगाश्वमध्ये एका ग्रहमालेमध्ये दोन महापृथ्वी श्रेणीचे परग्रह आहेत: COROT-7b आणि COROT-7c. COROT-7b चा शोध COROT उपग्रहाने लावला आणि COROT-7c चा शोध HARPS ने लावला. COROT-7b चा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या १.५८ पट आहे.

दूर अंतराळातील वस्तू

शृंगाश्वमध्ये अनेक तारकागुच्छ आणि तेजोमेघ आहेत.

  • ख्रिस्तमस झाड तारकागुच्छ (एनजीसी २२६४) आणखी एक खुला तारकागुच्छ आहे. त्याचे नाव त्याच्या ख्रिस्तमस झाडासारख्या आकारामुळे देण्यात आले आहे. त्याची सरासरी दृश्यप्रत ३.९ असून तो पृथ्वीपासून २४०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.[३]
  • शंकू तेजोमेघ (एनजीसी २२६४), अतिशय अंधुक तेजोमेघ आहे ज्यामध्ये गडद शंकूच्या आकाराची रचना आहे.[४]
  • एनजीसी २२५४ हा सरासरी ९.७ दृश्यप्रतीचा खुला तारकागुच्छ आहे. तो पृथ्वीपासून ७,१०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे. त्यामध्ये ५०हून कमी तारे आहेत. त्यातील तारे मध्यम प्रखरतेचे आहेत.[५]
  • हबलचा चल तेजोमेघ (एनजीसी २२६१) हा १० दृश्यप्रतीचा, पृथ्वीपासून २,५०० प्रकाश-वर्ष अंतरावरील तेजोमेघ आहे. आर मोनोसेरॉटिस हा तरुण चलतारा या तेजोमेघाला उजळवतो.[६]

संदर्भ

  1. ^ Wilkins Jamie, Dunn Robert. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Levy 2005, पान. 104.
  3. ^ Levy 2005, पाने. 82-83.
  4. ^ Levy 2005, पान. 83.
  5. ^ Levy 2005, पान. 85.
  6. ^ Levy 2005, पाने. 105-106.