"बचत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १०: ओळ १०:


[[वर्ग:बँकिंग]]
[[वर्ग:बँकिंग]]
[[वर्ग:आर्थिक विकास]]

१४:४१, २ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

बचत खाते हि बँकांनी दिलेली सर्वात लोकप्रिय सेवा आहे.

सर्व सामान्य माणूस बँकेत बचत खाते उघडून आपले पैसे त्यात ठेवू शकतो. आपल्या घरी मोठी रक्कम रोख स्वरुपात ठेवण्य पेक्षा बँकेत ठेवणे जास्ती सुरक्षित असते. ग्राहकाने आपली ओळख पत्रे आणि पत्त्याचा पुरावा बँकेला अर्जासोबत देऊन बचत खाते उघडता येते. बँक ग्राहक आपल्या कडे असणारे पैसे बचत खात्यात ठेवू शकतो. या शिल्लक रकमेवर बँक ग्राहकाला व्याज देते. बचत खाते उघडल्यास ग्राहकाला धनादेश (चेक बुक) , ए टी एम कार्ड, नेट बँकिंग अशा अनेक सोयी उपलब्ध होतात. ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो तसेच धनादेश , आर टी जी एस, एन इ एफ टी असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे देऊ शकतो.

बचत खात्य बरोबर मिळणाऱ्या विविध सोयीसाठी ग्राहकाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. काही वेळा ग्राहकाच्या खात्यावर मोठी रक्कम शिल्लक असेल तर बँका हे शुल्क माफ करू शकतात.

बचत खाते उघडण्या साठी काही किमान रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागते. अशी किमान रक्कम खात्यात न ठेवल्यास बँक अशा ग्राहकास दंड करू शकते.

जन धन या योजने अंतर्गतभारत सरकारने शून्य किमान रक्कम आणि कुठलेही शुल्क नसलेली बचत खाती उघडण्याची सोय भारतीय जनतेला करून दिली. या योजने अंतर्गत कोट्यावधी बचत खाती उघडली गेली.