"कलिंगचे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = कलिंगचे युद्ध
| संघर्ष = कलिंगचे युद्ध
| या युद्धाचा भाग = मौर्य-कलिंग युद्ध
| या युद्धाचा भाग =मौर्य साम्राज्यविस्तार
| चित्र = Kalinga battlefield daya river dhauli hills.jpg
| चित्र = Kalinga battlefield daya river dhauli hills.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =

०२:५७, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

कलिंगचे युद्ध
मौर्य साम्राज्यविस्तार ह्या युद्धाचा भाग
कलिंगच्या युद्धाची संभाव्य जागा - ओडिशातील दया नदीचा किनारा
कलिंगच्या युद्धाची संभाव्य जागा - ओडिशातील दया नदीचा किनारा
दिनांक साधारणपणे इ.स.पू. २६५-२६१
स्थान प्राचीन कलिंग, सद्य भुवनेश्वर (ओडिशा राज्य, भारत)
परिणती मौर्यांचा विजय आणि कलिंगांचा पराभव
प्रादेशिक बदल कलिंगचा मगधच्या साम्राज्यात समावेश
युद्धमान पक्ष
मौर्य साम्राज्य कलिंग
सेनापती
सम्राट अशोक कलिंगराज
सैन्यबळ
४,००,०००
बळी आणि नुकसान
१,००,००० २,००,०००

कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते.[१] कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सुरूवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते. सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगडझारखंड मधील काही भाग येतात.

युद्धाची कारणे

कलिंग युद्धाच्या पूर्वी मौर्य साम्राज्याचा विस्तार

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६१ सुमारास सुरु झाले. सुशीम चा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती. अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले.

रणसंग्राम

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले.

कलिंग युद्धाचे परिणाम

कलिंगच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दु:खी झाला. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. पश्चात्तापदग्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला. या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दु:ख त्याला सहन होईनासे झाले. मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतींचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसे. अहिंसेच्या सिद्धांताने तो विलक्षण प्रभावित झाला. या युद्धानंतर लवकरच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि देशविदेशात त्याचा प्रसार करण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि साम्राज्याची साधनसंपत्ती पणाला लावली. या लढाईनंतर अशोकाने दिग्विजयाच्या धोरणाचा त्याग करुन धर्मविजयाच्या धोरणाचा अवलंब केला. त्याच्या परराष्ट्रीय धोरणातही अमूलाग्र बदल झाला. सैन्यबळावर विसंबून राहण्याऐवजी त्याने शांतता, मैत्री या सिद्धांतावर अधिक भर दिला; म्हणूनच कलिंगचे युद्ध ही मानवी संस्कृतीमधील एक महत्त्वाची घटना मानली जाते.

इतर

कलिंग युद्धावर आधारीत संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला असोका नावाचा एक हिंदी चित्रपट इ.स. २००१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूख खानकरीना कपूर या अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आहेत. [२]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ जे.एल. मेहता, सरीता मेहता. (इंग्रजी भाषेत) http://books.google.co.in/books?id=NwpWPgAACAAJ&dq=history+of++ancient++india+j+l+mehta&hl=en&sa=X&ei=37D1Tp3TBor4rQeK4LDZDw&ved=0CDUQ6AEwAA. January 31, 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.imdb.com/title/tt0249371/. February 01, 2012 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)