"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ५१: ओळ ५१:
== पत्रकारिता ==
== पत्रकारिता ==
=== शोध पत्रकारिता ===
=== शोध पत्रकारिता ===
शोध पत्रकारिता : (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम). वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असुन उरलेल्या तीन आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम वृत्तपत्रांना करावे लागते. परंतु त्या क्षेत्रांत वावरणाऱ्या मंडळींची अपकृत्ये सहजपणे चव्हाट्यावर येतात असे नाही. अशी कृत्ये उघडकीस येईपर्यंत पत्रकारांनी वाट पहावी, की अशा अपकृत्यांचा वृत्तपत्रांनी आपणहून शोध घ्यावा आणि त्यांच्यावर प्रकाशझोत टाकावा असा प्रश्न आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेमध्ये आणि १९७० च्या दशकात भारतामध्ये शोध (वा शोधक) पत्रकारितेचा प्रारंभ झाला. अमेरिकेमध्ये १९६७ नंतर काही पत्रकारांनी व्हिएटनाममधील अमेरिकेच्या घोडचुकांबद्दल संशोधन करून लिहायला सुरूवात केली. परिणामत: जनमताच्या रेटयामुळे अमेरिकेला व्हिएटनाममधून माघार घ्यावी लागली. ‘पेंटॅगॉन पेपर्स या नावाने पत्रकारितेचा हा कालखंड प्रसिध्द आहे. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकातून गाजलेले वॉटरगेट प्रकरण पुढे उघड करण्यात आले व परिणामी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतातही मध्य प्रदेशातील आदिवासी भागात होणारी कमलासारख्या स्त्रियांची विक्री, भागलपूरच्या तुरूंगात कैदी गुन्हेगारांच्या डोळ्यात अॅसिड घालण्याचा प्रकार, क्युओ या कंपनीशी  भारत सरकारने केलेल्या तेल खरेदीचा व्यवहार, महाराष्ट्र राज्यांतील उच्च पदस्थांनी सिमेंटच्या कोट्याच्या बदल्यात मिळविलेल्या देणग्या आणि बोफोर्स खरेदी मध्ये उच्च पदस्थांनी घेतलेली लाच इ. प्रकरणांच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. वृत्तपत्रांनी शोध पत्रकारितेचा अवलंब केला.
एखाद्या प्रश्नाचा शोध घेऊन त्यासंबंधी जास्तीत जास्त माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्‍नाला शोध पत्रकारिता म्हणतात. अशा पत्रकारितेद्वारे वाचकांत जागृती निर्माण होऊन एखादा प्रश्न लावून धरता येतो..

शोध पत्रकारितेची काही पथ्ये आहेत : भक्कम पुरावा मिळविणे, माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे, संशोधनाचा झोत विशिष्ट पक्षापुरता किंवा विशिष्ट व्यक्तींपुरता मर्यादित न ठेवणे, गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी (ब्लॅकमेलिंग) याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घेणे आणि संशोधनाअंतीचे निष्कर्ष प्रांजळपणाने मान्य करणे इत्यादी.
शोध पत्रकारितेमुळे संबधित व्यक्तींच्या अपकृत्यांबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर अपकृत्यांना आळाही बसू शकतो. मात्र त्यासाठी शोध पत्रकारांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविणे आणि त्यांनी लिहिलेल्या मजकुराला जागा देणे, अशा तीन प्रकारे वृत्तपत्रांना अधिक खर्च करावा लागतो. काही प्रसंगी गैरकृत्ये करणाऱ्यांकडून धमक्या वा अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. परंतु वृत्तपत्राच्या प्रतिमेसाठी आणि जनमानसात आपुलकी, आदर व नैतिक दरारा निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रांना शोध पत्रकारितेचा उपयोग होऊ शकतो.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०७:२३, २७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन.

वृत्तपत्रीय लेखन

वृत्तपत्राच्या किंवा नभोवाणी वा दुरचित्रवाणी यांसारख्या जनसंज्ञापनांच्या माध्यमातून वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्तविषयक गरजा भागवण्याचे कार्य म्हणजे ‘वृत्तपत्रकारिता’ असे म्हणता येईल.
लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. ही कल्पना प्रथम ⇨मेकॉलेने १८२८ मध्ये आपल्या ‘कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी’ या निबंधात मांडली. वृत्तपत्रांच्या संदर्भात त्याने ‘चौथी शक्ती’ असा शब्दप्रयोग केला होता. कार्लाइलने ऑन हीरोज, हीरो वरशिप अॅंड हिरोइक इन् हिस्टरी (१८४१ ) या आपल्या ग्रंथातील ‘द हिरो अॅज मॅन ऑफ लेटर्स’ या प्रकरणात ⇨एडमंड बर्कचे पुढील उदगार उदधृत केले आहेत. ‘मानवी जीवनाचे नियमन करणाऱ्या धर्मसत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राजसत्ता (लॉर्डस टेंपोरल) व लोकसत्ता (कायदेमंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे, त्यांच्यापेक्षाही अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय.’ या उदगारांतून पत्रकारितेचे महत्त्व व्यक्त झाले आहे. 
पत्रकारितेची मुख्यत: तीन कार्ये असतात: माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन. ही कार्ये चांगल्या रीतीने पार पाडता यावीत म्हणून वृत्तपत्रे व पत्रकार यांना स्वातंत्र्याची आवश्यकता असते. वृत्तपत्रे व पत्रकार यांच्यावर सात प्रकारचे दवाब येत असतात : राज्यशासन, वृत्तपत्रसंस्थेचे व जनसंज्ञापन माध्यम संस्थेचे मालक, जाहिरातदार, समाजातील विविध हितसंबधी दबावगट, बातम्या व माहिती पुरविणारे स्रोत, वृत्तपत्राचा स्वार्थ आणि पत्रकाराचा वैयक्तिक स्वार्थ. या सात दबावगटांपैकी प्रत्येकाला वृत्तपत्राचा उपयोग करून आपले स्वत:चे हितरक्षण व हितसंवर्धन करावयाचे असते. या सर्व दबावगटांना खंबीरपणे तोंड देऊन पत्रकारितेला आपले कर्तव्य पार पाडायचे असते.      
निर्मितिखर्चापेक्षा कमी किंमतीला विकली जाणारी एकमेव वस्तू म्हणजे वृत्तपत्र होय. वृत्तपत्राच्या विक्रीतून कागदाचा खर्च जेमतेम भरून निघतो. वृत्तपत्रांना आपले सर्व प्रकारचे खर्च जाहिरांतीच्या उत्पन्नातून भागावावे लागतात आणि आवश्यक असा फायदा कमवावा लागतो. वृत्तपत्राने आपला व्यवसाय यशस्वी केला, तर त्याला आपले स्वातंत्र्य जपता येते आणि त्यांने आपले स्वातंत्र्य निष्ठापूर्वक जपले; तर त्याला आपल्या व्यवसायात यश मिळु शकते. व्यावसायिक यश व स्वातंत्र्याची जबाबदारी यांमध्ये समतोल साधणे हे वृत्तपत्राच्या यशाचे–म्हणजे विश्वासार्हतेचे, जाहिरातींच्या उत्पन्नाचे, प्रतिष्ठेचे-गमक असते. 
भारताच्या राज्यघटनेत आविष्कारस्वातंत्र्य हा मूलभूत आधिकार म्हणून मान्य करण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय करारनाम्याचा कलम १९ (३) मध्ये मान्य करण्यात आलेल्या बंधनाचाच भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला आहे. [→ वृत्तपत्रविषयक कायदे ]. मात्र आंतरराष्ट्रीय करारनाम्यापेक्षा भिन्न अशी एक तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे. आविष्कारस्वांतत्र्याचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकांपुरताच मर्यादित करण्यात आला आहे. परदेशी पत्रकाराला तो भारतामध्ये उपलब्ध नाही. भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने मात्र सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय पत्रकारांच्या मूलभूत आविष्कारस्वातंत्र्याचे रक्षण करणारे ठरले आहेत.  

मुख्य अंग

अग्रलेख

अग्रलेख हे लेख संपादक लिहितात.

स्तंभ लेखन

हवामान

सल्ला

व्यंगचित्र

वाचकांचा पत्रव्यवहार

'वाचकांचा पत्रव्यवहार'हे सदर २०व्या शतकापासून आजही दैनिके, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके इत्यांदीमध्ये आपले अस्तित्त्व टिकवून आहे. वूत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच पत्रव्यवहाराचे सामाजिकदृष्टीने असणारे महत्त्व अोळखून संपादकांनी पत्रव्यवहारास खास जागा दिली. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रातून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणिवाच व्यक्त होतात. जागतिक घडामोडी,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांना स्पर्श करणारी ही मनोगतपर परखड पत्रे असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबाबत तात्काळ मतनोंदणी करणारे,ग्रामीण आणि नागरी सुविधेबाबत विकासातील त्रुटी सांगणारे, नाराजी, निषेध करणारे, चांगल्या बातमींचे स्वागत तसेच अभिनंदन करणारे असे लेख वाचकांचे पत्रव्यवहारमध्ये असतात. वाचकांना लिहिते करणाऱ्या, अभिव्यक्तीस जागा देणाऱ्या अशा पत्रव्यवहारातून विचारमंथनास चालना मिळते.वाचकांच्या पत्रातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटत असते. अशा पत्रव्यवहारातून शिक्षण, सामाजिक सुधारणा, विचारक्षमता,संवेदनशीलता विकसित होऊन जागृत आणि प्रगल्भ समाजनिर्मितीस पोषक वातावरण निर्माण होते.

वार्षिक सुट्ट्या

इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसत. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नसत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत.

वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे (जन्म : २१ डिसेंबर, इ.स. १९१६) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रूप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्‍नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली.

अन्न पदार्थ विषयक

छोट्या जाहिराती

संपादकीय लेखन

इतिहास

साम्राज्यातील सरकारी वृत्तपत्र

रोमन साम्राज्यात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. तसेच चीन मध्येही दुसरे ते तिसरे शतक या दरम्यान असलेल्या साम्राज्याच्या काळात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे.

आधुनिक प्रवास

ठशांचा वापर

औद्योगिक क्रांती

आंतरजालाचा परिणाम

आंतरजालावरील वृत्तपत्रे

वृत्तपत्राचे प्रकार

  • दैनिक
  • साप्ताहिक
  • पाक्षिक/अर्धमाही
  • मासिक
  • तिमाही
  • अर्ध वार्षिक
  • वार्षिक

वाचकसंख्या

पत्रकारिता

शोध पत्रकारिता

बाह्य दुवे