"बार्शी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८८: ओळ ८८:


= '''श्री.स्वामीनारायण मंदिर''' =
= '''श्री.स्वामीनारायण मंदिर''' =
बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मुर्त्या अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मुर्त्या अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
--------------------------------------------------------------------------
= 'श्री निलकंठेश्वर' मंदिर,पांगरी ता.बार्शी =
बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.


= ''शैक्षणिक''<ref>शैक्षणिक</ref> =
= ''शैक्षणिक''<ref>शैक्षणिक</ref> =

१४:०३, ६ मार्च २०१७ ची आवृत्ती

  ?बार्शी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: भगवंत नगरी
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१८° १४′ ०३″ N, ७५° ४१′ ४२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३५६ मी
लोकसंख्या २,२०,००० (2016)
भाषा मराठी ,हिंदी,इंग्रजी,
संसदीय मतदारसंघ सोलापुर
तहसील बार्शी
पंचायत समिती बार्शी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३४०१,११,२,१०
• +०२१८४
• महाराष्ट्र १३(MH13)
बार्शी is located in India
बार्शी
बार्शी
बार्शी (India)

बार्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते.

बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे.बार्शी हे शहर कला,क्रीडा,शिक्षण,वैद्यकीय,औद्योगिक,सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे.

धार्मिक महत्त्व

भगवंत मंदिर

बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे.गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो.

इतर आकर्षणे

बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्‍याला वैराग असे म्‍हटले जाते. वैराग हे वैराग्‍याची भुमी म्‍हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्‍या दष्‍टीने वाडत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैराग मध्‍ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे.

वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्‍य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्‍या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.

श्री.स्वामीनारायण मंदिर

बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मुर्त्या अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.


'श्री निलकंठेश्वर' मंदिर,पांगरी ता.बार्शी

बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.

शैक्षणिक[१]

बार्शी हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.

अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी बार्शीत 'भगवंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी' ही संस्था आहे.तर पदविका अभ्यासक्रमासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक' ही संस्था आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग' हे महाविद्यालय बी.एस्सी.नर्सिंग हा अभ्यासक्रम चालवते.

औषधनिर्माण शास्त्राचा अभ्यासक्रम 'सोजर कॉलेज ऑफ फार्मसी' येथे शिकवला जातो.

उच्च माध्यमिक शिक्षणासाठी खालील महाविद्यालये आहे

१.श्री शिवाजी महाविद्यालय (कला व विज्ञान)

२.श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय(कला व विज्ञान)

३.बी.पी.सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स (वाणिज्य)

४.महाराष्ट्र विद्यालय (कला व विज्ञान)

बार्शीची नाट्य परंपरा हि सुद्धा अत्यंत जुनी आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शी मधील जयशंकर मिल हि भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शी मध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल हे देखील सर्व सुविधेने संपन्न हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर्स सेवा देतात.

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे हि गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात.केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे.खेड्यामध्ये बसथांबे नसतात हि गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार,अपंग,वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तालुके
उत्तर सोलापूर तालुका | दक्षिण सोलापूर तालुका | अक्कलकोट तालुका | बार्शी तालुका | माढा तालुका | करमाळा तालुका | मोहोळ तालुका | पंढरपूर तालुका | माळशिरस तालुका | सांगोला तालुका | मंगळवेढा तालुका
  1. ^ शैक्षणिक