"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०: ओळ २०:


==इतिहास आणि धार्मिक स्थाने==
==इतिहास आणि धार्मिक स्थाने==
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात इ.स. १०२४ मध्ये घनघोर लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. [[महानुभाव पंथ]]ाचे भगवान [[चक्रधरस्वामीं]]चा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. दक्षिणेकडे प्रस्थान करताना भगवान श्रीराम, हे मेहकर परिसरातून गेले होते, असे मानले जाते. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वशिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात तेथे भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप असते.
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. [[महानुभाव पंथ]]ाचे भगवान [[चक्रधरस्वामीं]]चा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. दक्षिणेकडे प्रस्थान करताना भगवान श्रीराम, हे मेहकर परिसरातून गेले होते, असे मानले जाते. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वशिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात तेथे भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप असते.


मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते, असे वैभवशाली वर्णन ब्रह्म पुराणात आलेले आहे. [[पेंढारी]] लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध [[शिवाजी]]राजाचे आजोळ व [[जिजाबाई]]चे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले [[लोणार]] ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. [[श्रीमद्भगवद्गीता | श्रीमद्भगवद्गीतेच्या]] अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]]ांनी अन्नछत्र बांधून दिले होते.
मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते, असे वैभवशाली वर्णन ब्रह्म पुराणात आलेले आहे. [[पेंढारी]] लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध [[शिवाजी]]राजाचे आजोळ व [[जिजाबाई]]चे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले [[लोणार]] ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. [[श्रीमद्भगवद्गीता | श्रीमद्भगवद्गीतेच्या]] अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]]ांनी अन्नछत्र बांधून दिले होते.

१७:५१, २२ जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रस्तावना

मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. त्यामुळे येथील जमीन सुपीक आहे. शेतीतून सोयाबीन हे मुख्य पीक घेतले

पौराणिक आख्यायिका

ब्रह्मांड पुराणात (मेघंकर आताचे मेहकर) या नगरीचा उल्लेख आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मदेवाने तप करून यज्ञारंभ केला. त्या यज्ञकर्माला आवश्यक ‘प्रणितापात्र’ हे भांडे मेघंकरात होते. या भांड्यातील पाणी मंत्रपूर्वक जमिनीवर सांडले व त्यातून प्रणिता (सध्याची पैनगंगा) नदीचा उगम झाला. पैनगंगेला प्राणहिता, पावनगंगा अशीही नावे आहेत. गौतमी माहात्म्य ग्रंथातही या यज्ञकथेचा उल्लेख आहे व त्यातच मेहकरातील प्रसिद्ध शारंगधराचा (श्री बालाजीचा) उल्लेख आहे. मत्स्य पुराणातही मेघंकर नगरी व शारंगधराचा उल्लेख आहे.

शारंगधराची मूर्ती

शांरगधराची मुर्ती

पद्म पुराणातील अध्यायात शारंगधराच्या ज्या मूर्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे, ती ११ फूट उंचीची अखंड शाळिग्राम शिळेत अतिशय कलात्मकरीत्या कोरलेली बालाजीची मूर्ती मेहकरमध्ये आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी व उजव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. जय-विजय यांच्या सुबक मूर्तीसोबतच मुख्य मूर्तीभोवती १० लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म या चार आयुधांना ४ हातात धारण केलेली ही मूर्ती म्हणजे श्रीविष्णूचे त्रिविक्रम रूप मानले जाते. बालाजीची इतकी भव्य व कलात्मक मूर्ती देशात कुठेही नाही. देव-देवतांना छळणाऱ्या मेघंकर नामक राक्षसाचा श्रीविष्णूने त्रिविक्रम रूप धारण करून नाश केल्याची कथा आहे.

बालाजी मंदिरात दरवर्षी डिसेंबरात मूर्तीचा प्रगटदिन सोहोळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. चैत्र, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये ही बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात.. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.

मेहकर शहर आणि तालुका

मेहकर हे अजिंठ्याच्या पर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराजवळून पैनगंगा नदी वाहते. आधीच हा सुपीक भूभाग होता आणि त्यातच कोराडी, उतावळी, पेनटाकळी या सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यातील ओलित क्षेत्रात वाढ झाली. १९०१ मध्ये मेहकर शहराची लोकसंख्या ५ हजार ३३० होती. १९८१ च्या जनगणनेनुसार ती २२ हजार ३८२ तर, आता ६० हजारावर पोहोचली आहे. जुन्या मेहकर तालुक्यात मेहकरसह लोणारसिंदखेड राजा तालुक्यांचा समावेश होता. आजही तिन्ही तालुक्यांची विविध खात्यांची उपविभागीय कार्यालये मेहकर शहरातच आहेत.

इतिहास आणि धार्मिक स्थाने

मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. महानुभाव पंथाचे भगवान चक्रधरस्वामींचा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. दक्षिणेकडे प्रस्थान करताना भगवान श्रीराम, हे मेहकर परिसरातून गेले होते, असे मानले जाते. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वशिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात तेथे भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप असते.

मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते, असे वैभवशाली वर्णन ब्रह्म पुराणात आलेले आहे. पेंढारी लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध शिवाजीराजाचे आजोळ व जिजाबाईचे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले लोणार ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात अहिल्यादेवी होळकरांनी अन्नछत्र बांधून दिले होते.

मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या ६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत. मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते. या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २ फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर पाण्यात बुडून जाते.

मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर, चंदनशेष मंदिर, हनुमान मंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात मशिदींची संख्याही मोठी आहे. त्यात काही पुरातन आहेत. भगवद्गीतेत, व पुराणांत जसा मेहकर, पैनगंगा नदी, श्रीशारंगधर बालाजीचा उल्लेख येतो तसाच तो अलबेरुनीच्या ग्रंथात,आईन-ए अकबरी या अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की, मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.

धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून १९६२ ते १९७८ असे सलग १६ वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते. १९७२ च्या भीषण दुष्काळात साखर कारखाना उभारणीच्या काळात शेकडो काम नसलेल्या हातांना काम देण्याचे मौलिक कार्य अण्णासाहेबांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शुकदास महाराजांच्या पुढाकाराने हिवरा आश्रम येथे साकारलेला स्वामी विवेकानंद आश्रम आहे.विवेकानंद आश्रम हे मानव सेवेचे केंद्र आहे. आज तेथे शाळा,कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विविध वसतिगृहे, कर्णबधिर -अपंग निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ (इग्रंजी माध्यम) व आरोग्य विषयक सेवा,धमार्थ रुग्णचिकित्सा केंद्र,रोगनिदान शिबिरांचे आयोजन,कृषी प्रदर्शनांचे आयोजन,शेतकरी मार्गदर्शन केंद्र,विवेकानंद वाटिका, हरिहर तीर्थक्षेत्र, इत्यादींमुळे शहराला नंदनवनाचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र शासनाने विवेकानंद आश्रमास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी पौष वद्य पंचमी ते सप्तमी दरम्यान भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तिन्ही ही दिवस नामवंत कलाकार, संगीतकार, गायक, व्याख्याते,प् रचनकार, कीर्तनकार आपली सेवा देतात.पौष वद्य सप्तमीला तीन लाख भाविक महाप्रसाद सेवन करतात.

            उटी हे गाव त्यामधील एक आहे . येथे बग्दलभ्या ऋषी चे सुंदर मंदिर आहे .

राजकीय पार्श्वभूमी

जनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी हुंडाबंदी, सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, हरितक्रांती, पर्यावरण या सर्वच क्षेत्रात अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन गेले. काँग्रेसचे आमदार म्हणून कै. किसनराव सांगळे यांची कारकीर्दही गाजली पण, खऱ्या अर्थाने गाजला तो सुबोध केशव सावजी यांचा कार्यकाळ. सलग १४ वर्षे ते आमदार होते. काही काळ ते महसूल, वस्त्रोद्योग आदी खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मेहकरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना (कोराडी प्रकल्पातून) मंजूर झाली. मेहकरातील बरीच विकासकामे त्यांच्या हातून झाली. या सर्व कालखंडात डॉ. पळसोकर, डॉ. देशमुख, माणिकचंद जैन, नलिनीताई खडसे, शोभाताई अग्रवाल या नगराध्यक्षांनी लक्षात राहण्याजोगे काम केले.

नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे काँग्रेसचे वर्चस्व संपले आणि १९९५ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. युतीच्या काळात युवक कल्याण पाटबंधारे खात्याचे ते राज्यमंत्री झाले. सध्या ते बुलढाण्याचे खासदार आहेत. मेहकरसाठी त्यांनी रस्ते, नालीबांधणी, वीज, पाणी आदी बाबींकरिता पैसा खेचून आणला. नगराध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची कारकिर्द नियोजनबद्ध विकास कामांच्या बाबतीत लक्षणीयच ठरली. एकात्मिक शहर विकास योजनेचा आराखडा त्यांच्या काळातच तयार होऊन शासनाकडे गेला. त्यातील एकेक काम नंतरच्या काळात होत आहे. रामराव म्हस्के, कासमभाई गवळी, संजय जाधव या नगराध्यक्षांनीही रस्ते विकासाच्या बाबतीत काम केले. सामाजिक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्य केलेले डॉ. संजय रायमूलकर सध्या शिवसेनेचे आमदार आहेत.

शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ आहेत. चिखली, बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगिचा नाही. जागा मात्र बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगीचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.

इतर महत्त्वाचे

संपूर्ण मराठी साहित्य जगतात प्रख्यात झालेले कविवर्य ना. घ. देशपांडे मेहकरचे. त्यांच्या शीळ, अभिसार, खूणगाठी काव्यसंग्रहातील कवितांनी रसिकांना वेड लावले होते. राज्य पुरस्कारांपासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मेहकरच्या उत्तरेला टेकडीवर असलेल्या पुरातन कंचनीच्या महालासंबंधीच्या आख्यायिकेवर ‘कंचनीचा महाल’ हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिले. त्याचा स्वतंत्र संग्रह निघाला. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र मेहकरात मोठी पोकळी निर्माण झाली होती. 1995 पासून मात्र किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांनी ही पोकळी भरून काढत संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या साहित्यमुळे मेहकर ची साहित्य चमक दाखवली. 1976 मधे जन्मलेल्या ह्या साहित्यिक शिक्षकास राज्य पुरस्कारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या तुटलेल्या बोटांचे संदर्भ , मृगजळाचे पाणी आणि विषात वितळलेले सत्य ह्या संग्रहाना विशेष मागणी असून हे संग्रह खुप गाजले. ना.घं.चे बंधू वि.घ. देशपांडे हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ते खासदारही होते. १९३९ मध्ये त्यांचा सत्कार मेहकरच्या बालाजी मंदिरात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकरांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी सावरकरांनी युवकांना मोठय़ा संख्येने सैन्यात भरती होण्याचे आवाहन भाषणातून केल्याची नोंद आहे. ना.घं.नी मेहकरात मे.ए.सो. शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय, कन्या विद्यालय यांनी या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय, कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली. अध्यापक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय, पॉलिटेक्निक संस्थाही त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली. डॉ. राम शिंदे यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगली वाटचाल सुरू केली आहे. संतांजी कॉन्व्हेंट, ज्ञानदीप कॉन्व्हेंट या इंग्रजी शाळा लक्षणीय कार्य शैक्षणिक क्षेत्रात करीत आहेत. कासमभाई गवळी यांनी उर्दू विद्यार्थ्यांसाठी उर्दू विद्यालय सुरू केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मेहकरची घोडदौड नजरेत भरण्यासारखी आहे.

बँकिंग क्षेत्रात शहर मागे नाही. जीवन गतिमान झाले व लोकांच्या अपेक्षा गरजा वाढल्या. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांबरोबरच सहकारी बँकांनीही व्यवहार वाढवले. श्याम उमाळकरांची सत्यजित पतसंस्था, डॉ. सुभाष लोहिया, उदय सोनी, आदींच्या प्रयत्नातून विस्तारलेली महेश पतसंस्था, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पतसंस्था, वसंतराव मगर, सर्पमित्र वनिता बोराडे, नलिनी खडसे यांच्या विविध पतसंस्था या अर्थविषयक संस्थांच्या जाळ्याने बचत व कर्जपुरवठा गरजा भागल्या व त्याबरोबरच शहराच्या व्यापार, रोजगारसंबंधीच्या भरभराटीला मोठा हातभार लागला. रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या उसाला किंमत देण्याचे काम प्रतापराव जाधव, भगवान मानधने, बबनराव भोसले, प्रकाश मापारी, विलास काळे आदींच्या प्रयत्नातून साकारलेल्या शारंगधर साखर कारखान्यानेही केले आहे. मेहकर परिसरातला हा एकमेव मोठा उद्योग. एरव्ही अनेक वर्षांपासून मेहकरला अनेक एकरांच्या पडीत जमिनीवर फक्त एम.आय.डी.सी.चा बोर्डच तेवढा उभा आहे. औद्योगिक वसाहत उभीच झाली नाही. गावात मोठमोठी व्यापार प्रतिष्ठाने, व्यापारी संकुलात वाढ झाली पण, मोठ्या रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी बालाजी संस्थानमध्ये धर्मार्थ दवाखाना वैद्यांच्या सहकार्याने चालवला जायचा. वार्षिक तीन रुपये भरून वर्षभर मोफत औषधोपचार केला जायचा. आता मेहकरात ग्रामीण रुग्णालय आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांचे ४७ दवाखाने आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. १९१६ मध्ये मानमोडीच्या (एनफ्लूएंझा) रोगाने येथील शेकडो लोक दगावले. १९२० मधील दुष्काळात उपासमार झाली. १९२६ मध्ये प्लेगने असंख्य बळी घेतले. २ जातीय दंगली झाल्या तरीही होरपळलेली माणसे पुन्हा उभी झाली व गावाला प्रगतीची गती देत राहिली. कालानुरूप सर्व परिवर्तनाचा स्वीकार करत मेहकर ताठ मानेने उभे आहे.

किरण डोंगरदिवे ह्यांच्या सोबत त्यांच्या पिढितील सुनील पवार संदीप गवई नागेश कांगाने यांनी साहित्य क्षेञात तसेच अमोल टेकाळे यांची साहित्य सागर साहित्य संघाने भरिव कार्य केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगाव तालुका | चिखली तालुका | संग्रामपूर तालुका | सिंदखेड राजा तालुका | देउळगाव राजा तालुका | नांदुरा तालुका | बुलढाणा तालुका | मेहकर तालुका | मोताळा तालुका | मलकापूर तालुका | लोणार तालुका | जळगाव जामोद तालुका | शेगाव तालुका