"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४: ओळ ४४:
==मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
==मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
* उग्रमंगल (पद्मावती)
* उग्रमंगल (पद्मावती)
* एकच प्याला (सिंधू)
* [[एकच प्याला]] (सिंधू)
* काँटो में फूल ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)
* [[काँटो में फूल]] ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)
* गैरसमज (सदानंद)
* गैरसमज (सदानंद)
* चौदावे रत्‍न (त्राटिका)
* चौदावे रत्‍न (त्राटिका)
ओळ ५२: ओळ ५२:
* ताज-ए-वफा (कमला)
* ताज-ए-वफा (कमला)
* देशकंटक (हिंमतराव)
* देशकंटक (हिंमतराव)
* धरम का चाँद ऊर्फ भक्त ध्रुव (सुरुचि)
* [[धरम का चाँद]] ऊर्फ भक्त ध्रुव (सुरुचि)
* पुण्यप्रभाव (कालिंदी, किंकिणी)
* [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]] (कालिंदी, किंकिणी)
* ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन)
* ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन)
* भावबंधन (लतिका)
* भावबंधन (लतिका)
ओळ ६५: ओळ ६५:
* वीर विडंबन (उत्तरा)
* वीर विडंबन (उत्तरा)
* वेड्यांचा बाजार (वेणू)
* वेड्यांचा बाजार (वेणू)
* शाकुंतल (शकुंतला)
* [[संगीत शाकुंतल|शाकुंतल]] (शकुंतला)
* शारदा (शारदा)
* [[संगीत शारदा|शारदा]] (शारदा)
* संन्यस्त खड्ग (सुलोचना)
* संन्यस्त खड्ग (सुलोचना)
* सुंदोपसुंद (सुविभ्रमा)
* सुंदोपसुंद (सुविभ्रमा)
* सौभद्र (अर्जुन)
* [[सौभद्र]] (अर्जुन)


==मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)==
==मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)==

०२:१४, ५ जुलै २०१६ ची आवृत्ती

दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ मंगेशकर
आयुष्य
जन्म डिसेंबर २९, इ.स. १९००
जन्म स्थान गोवा, पोर्तुगीज भारत
मृत्यू एप्रिल २४, इ.स. १९४२
मृत्यू स्थान ससून रुग्णालय, पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
पारिवारिक माहिती
आई येसूबाई राणे
वडील गणेश भिकोबाभट नवाथे (अभिषेकी)
जोडीदार माई मंगेशकर (पूर्वाश्रमीचे नाव: शेवंती लाड)
अपत्ये लता मंगेशकर,
मीना मंगेशकर,
आशा भोसले,
उषा मंगेशकर,
हृदयनाथ मंगेशकर
संगीत साधना
गुरू बाबा माशेलकर,
रामकृष्णबुवा वझे
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन,
नाट्यसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य बलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना,
बलवंत पिक्चर्स
कार्यक्षेत्र संगीत, अभिनय

दीनानाथ गणेश मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.

दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. गणेशभट आणि येसूताई अभिषेकी यांना चार अपत्ये झाली; दीनानाथ थोरले, नंतर विजया (विजया कृष्णराव कोल्हापुरे), मग कमलनाथ आणि शेवटची देवयानी. दीनानाथांची दोन्ही लहान भावंडे अल्प वयातच वारली.

जन्म आणि संगीताचे शिक्षण

गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.

नाट्यसृष्टीतील कारकीर्द

इ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.

अभिनय

गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले.

मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • उग्रमंगल (पद्मावती)
  • एकच प्याला (सिंधू)
  • काँटो में फूल ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)
  • गैरसमज (सदानंद)
  • चौदावे रत्‍न (त्राटिका)
  • जन्मरहस्य (कांता)
  • झुंझारराव (जाधवराव)
  • ताज-ए-वफा (कमला)
  • देशकंटक (हिंमतराव)
  • धरम का चाँद ऊर्फ भक्त ध्रुव (सुरुचि)
  • पुण्यप्रभाव (कालिंदी, किंकिणी)
  • ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन)
  • भावबंधन (लतिका)
  • मानापमान (धैर्यधर)
  • मूकनायक (सरोजिनी)
  • रणदुंदुभी (तेजस्विनी)
  • राजलक्ष्मी (वारुणी)
  • राजसंन्यास (पद्मावती, शिवांगी)
  • रामराज्यवियोग (राम)
  • विद्याहरण (देवयानी)
  • वीर विडंबन (उत्तरा)
  • वेड्यांचा बाजार (वेणू)
  • शाकुंतल (शकुंतला)
  • शारदा (शारदा)
  • संन्यस्त खड्ग (सुलोचना)
  • सुंदोपसुंद (सुविभ्रमा)
  • सौभद्र (अर्जुन)

मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)

दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत पिक्चर्सने बनवलेले हिंदी-मराठी चित्रपट

  • अंधेरी दुनिया
  • कृष्णार्जुन युद्ध
  • भक्त पुंडलिक

या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती.


लेखन

दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इ.स. १९२२ साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर (वादी-संवादीच्या फरकाने) कसे तेच आहेत (उदा० देसकार-भलप-तोडी-मुलतानी) वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले.

मास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव)

  • आजवरी पाहूनी वाट जिवलगा (लावणी, राजसंन्यास)
  • आपदा राजपदा (तिलककामोद, रणदुंदुभी)
  • कठीण कठीण कठीण किती (यमन, भावबंधन)
  • काही नाही पाही जनी मोल (मिश्र कानडा, रणदुदुंभी
  • चंद्रिका ही जणू (आरबी, मानापमान)
  • चराचरी या तुझा असे निवास (ठुमरी-बिहाग, भावबंधन)
  • जगीं हा खास वेड्यांचा (कवाली, रणदुंदुभी)
  • जिंकिते जगीं जे (गझल, रणदुंदुभी)
  • झाले युवती मना (हंसध्वनी, मानापमान)
  • दिव्य स्वातंत्र्य रवि (मालकंस, रणदुंदुभी)
  • नसे जित पहा (दोन धैवतांचा देसी, संन्यस्त खड्ग)
  • नाचत गा गगनात नाथा (यमन, पुण्यप्रभाव)
  • नोहे सुखभया गतभया (यमन, उग्रमंगल)
  • पतिव्रता ललना होती (मिश्र मांड, चौदावे रत्‍न)
  • परवशता पाश दैवे (कवाली, रणदुंदुभी)
  • पिया घे निजांकी आता (मिश्र पिलू, संन्यस्त खड्ग)
  • प्रबलता बलहता (आरबी, देशकंटक)
  • प्रेम सेवा शरण (मुलतानी, मधुवंती; मानापमान)
  • भाली चंद्र असे धरिला (यमन, मानापमान)
  • भाव भला भजकाचा (देसी, उग्रमंगल)
  • मधु मीलनात या (मांड, ब्रह्मकुमारी)
  • मर्मबंधातली ठेव ही (पटदीप, संन्यस्त खड्ग)
  • माझी मातुल कन्यका (यमन कल्याण, सौभद्र)
  • रंग अहा भरला (पहाडी, पुण्यप्रभाव)
  • रति रंग रंगे (आरबी, संन्यस्त खड्ग)
  • रवि मी चंद्र कसा (तिलक कामोद, मानापमान)
  • वदनी धर्मजलाला (सिंधुरा, सौभद्र)
  • वितरी प्रखर तेजोबल (तिलक कामोद, रणदुंदुभी)
  • शत जन्म शोधिताना (पिलू गारा, संन्यस्त खड्ग)
  • शांत शांत कलिका ही (बिहाग, रामराज्यवियोग)
  • शूरा मी वंदिले, (बडहंस सारंग, मानापमान)
  • समयी सखा नये (मिश्र मांड, संन्यस्त खड्ग)
  • साजणी बाई नटुनी थटुनी (कवाली, राजसंन्यास)
  • सुकतातचि जगी या (भैरवी, संन्यस्त खड्ग)
  • सुखी साधना (देसकर, देशकंटक)
  • सुरसुख खनी (किरवानी, विद्याहरण)
  • हांसे जनात राया (कवाली, राजसंन्यास)

दीनानाथ मंगेशकरांनी गायिलेल्या चिजा

  • अब रुत भर आई (बसंत)
  • झूता मुरारे (कानडी रचना)
  • तन जहाज मन सागर (जयजयवंती)
  • तारी बिछेला बा मनवा (पहाडी)
  • नन्नु द्रोवनी किंत ताम समा (कानडी गीत, राग काफी सिंदुरा)
  • निकेनिके शोभा (बहादुरी तोडी)
  • नैन सो नैल मिला रखुँगी (दरबारी कानडा)
  • परलोक साधनवे (कानडी गीत)
  • मोरी निंदियाँ गमायें डारी नैन (बिहाग)
  • शंकर भंडारी बोले(शंकरा)
  • सकल गडा चंदा (जयजयवंती)
  • सहेली मन दारूडा (पहाडी)
  • सुहास्य तूझे (यमन, चित्रपट-कृष्णार्जुन युद्ध)
  • हो परी मुशता (टप्पा-सिंधुरा)

दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके

दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था  :

  • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व-मुंबई;(आसनसंख्या १०१०)
  • दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)
  • मास्टर दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह)
  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे

दीनानाथांवरील पुस्तके

  • दिना दिसे मज दिनरजनी (लेखक - डॉ. प्रभाकर जठार)
  • मा. दीनानाथ स्मृति-दर्शन (संपादिका - लता मंगेशकर)
  • ब्रीद तुझे जगी दीनानाथ (वंदना रवींद्र घांगुर्डे)
  • शतजन्म शोधिताना (गो.रा. जोशी)
  • शूरा मी वंदिले (बाळ सामंत)
  • स्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (हिंदी, वंदना रवींद्र घांगुर्डे)

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.

२०१६ साली देण्यात आलेले दीनानाथ स्मृति-पुरस्कार

  • नाट्यय़ क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’
  • ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह अभिनेता रणवीर सिंग यांना
  • हिंदी चित्रपटांतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते जितेंद्र कपूर यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार
  • संगीत क्षेत्रातील सेवेसाठी अजय चक्रवर्ती यांना
  • साहित्य क्षेत्रातील ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ अरुण साधू यांना
  • उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला
  • प्रदीर्घ पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार दिलीप पाडगावकर यांना, आणि
  • सामाजिक कार्यासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार परतवाडा येथील ‘गोपाळ शिक्षण संस्थेचे’ सचिव शंकरबाबा पापळकर यांना देण्यात आला.
दीनानाथ स्मृति पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्था, कलाकृती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
अनिल कपूर चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१५
अपर्णा अभ्यंकर ? आदिशक्ती पुरस्कार २०१५
अमृत प्रॉडक्शन नाट्यनिर्मिती (त्या तिघांची गोष्ट) मोहन वाघ पुरस्कार २०१५
आपले घर(संस्था) समाजकार्य आनंदमयी पुरस्कार २००७
आमिर खान चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
आशा कामत संमाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१५
उल्हास प्रतिष्ठान(संस्था) समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २००८
ऋषि कपूर अभिनय दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१४
कुमार बोस संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
गणपतराव पाटील शेतीक्षेत्र विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
उस्ताद गुलाम मुस्तफा संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
कवी ग्रेस साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार वर्ष?
कुमार केतकर पत्रकारिता दीनानाथ मंगेशकर पत्रकारिता पुरस्कार २०१५
चारुदत्त आफळे समाजसेवा आनंदमयीपुरस्कार २००३
जया बच्च्चन चित्रपटक्षेत्र आदिशक्ती पुरस्कार २०१३
दिलीप प्रभावळकर रंगभूमी विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१५
धर्मेंद्र चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
नीतिन वीरखरे समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०११
नीला श्रॉफ यांचे वात्सल्य फाउंडेशन समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१३
प्रभा अत्रे संगीत दीनानाथ मंगेशकर २००५
डॉ. प्रसाद देवधर समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१२
प्रसाद सावकार नाट्य आणि संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
भालचंद्र नेमाडे साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१५
भालचंद्र पेंढारकर नाट्य मोहन वाघ पुरस्कार २००७
भैरप्पा साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१२
म.वा. धोंड साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००५
महेश एलकुंचवार साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०११
माधुरी दीक्षित नेने चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
मालिनी राजूरकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
रत्‍नाकर मतकरी साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१३
राम शेवाळकर साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार १९९९
रेखा चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००५
वंदना गुप्ते नाट्य आणि चित्रपट दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार २०१३
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान(संस्था) संगीत आणि नाट्य मोहन वाघ पुरस्कार २०१२
विक्रम गोखले नाट्य आणि चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
विजया मेहता नाट्य मोहन वाघ पुरस्कार २००५
शंभूराजे(नाटक-निर्माते मोहन तोंडवळकर) नाट्यनिर्मिती दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
शम्मी कपूर चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
शरद अभ्यंकर साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००८
श्रीराम लागू नाट्यक्षेत्र मोहन वाघ पुरस्कार २००८
सरोजिनी वैद्य साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००७
पंडित सी.आर. व्यास संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार १९९९
पं. सुरेश तळवलकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१५
उस्ताद सुलतान खान संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
सुधीर मोघे कवितालेखन पुरस्काराचे नाव? २००७
सुनील बर्वे नाट्यसेवा मोहन वाघ पुरस्कार २०१३
सुरेश वाडकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
उस्ताद सुलतान खान संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
सोनपंखी(नाटक) नाट्यलेखन दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
हेमा मालिनी चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष

(अपूर्ण)

बाह्य दुवे