"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:


==बलवंतची पुढची नाटके==
==बलवंतची पुढची नाटके==
ताज-ए-वफा (उर्दू), पुण्यप्रभाव, मूकनायक, सौभद्र, शारदा
ताज-ए-वफा (उर्दू), [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]], मूकनायक, [[संगीत सौभद्र|सौभद्र]], शारदा





१३:४५, ३ जुलै २०१६ ची आवृत्ती

बलवंत संगीत मंडळी (१८१८ ते १९३३) ही दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यसंस्था तात्यासाहेब परांजपे यांच्यासारख्या गुणज्ञ धनवंताच्या प्रेरणेने व सक्रिय सहकार्याने मुंबईच्या बोरीवली उपनगरात१८ जानेवारी १९१८ रोजी स्थापन झाली.

बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या ग्रँट रोडवरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार बलवंत पांडुरंग किर्लोस्कर तथा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ बाळ गंगाधर टिळक यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव राम गणेश गडकरी यांनी सुचवले.

बलवंत संगीत मंडळीचा पडदा

ज्या नाट्यगृहात बलवंत संगीत मंडळीच्या नाटकाचा प्रयोग होणार असेल त्या नाट्यगृहाच्या मंचाला कंपनीचा पडदा लावला जाई. हा दर्शनी पडदा हेतुनिदर्शक होता. पडद्याच्या वरच्या बाजूला अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रेखांकित प्रतिमा होती, तर पडद्याच्या खालच्या बाजूवर लक्ष्मी आणि सरस्वती या येथे एकत्र नांदत आहेत आणि त्या दोघींची आमच्यावर सदैव कृपा राहो; सर्वांवर येणारी संकटे दूर करून सर्वांचे भले होवो; सर्वांच्या कामना पूर्ण होऊन सर्वजण नित्य आनंदात राहोत, अशा अर्थाचे दोन संस्कृत श्लोक लिहिलेले होते. हे श्लोक राम गणेश गडकरी यांनी सुचविले होते. श्लोक असे होते :-

परस्परविरोधिन्योरेकसंश्रय दुर्लभम्‌।
संगतं श्रीसरस्वत्योर्भूतयेऽस्तु सदा सताम्‌॥१॥
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वोभद्राणि पश्यतु।
सर्वः कामनावाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु॥२॥


नाटकाचा पहिला प्रयोग

मुंबईत २९-३-१९१८ रोजी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली बलवंत संगीत मंडळींच्या पहिल्या नाटकाचा - ‘संगीत शाकुंतल’चा - पडदा उघडला. शकुंतलेच्या भूमिकेत दीनानाथ मंगेशकर होते.

बलवंतची पुढची नाटके

ताज-ए-वफा (उर्दू), पुण्यप्रभाव, मूकनायक, सौभद्र, शारदा